विमानांना पांढराच रंग का दिला जातो? जाणून घ्या शास्त्रीय कारणे

सूर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण: पांढरा रंग सूर्यकिरणांना परावर्तित करतो. यामुळे विमान कडक उन्हातही थंड राहते आणि विमानातील यंत्रणा गरम होत नाही.

तडे आणि दोष ओळखणे: पांढऱ्या रंगावर विमानाला गेलेले तडे, तेल गळती किंवा आलेले डेंट खूप सहज आणि स्पष्टपणे दिसून येतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करणे सोपे होते.

वजन राहते कमी: इतर गडद रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचे कमी थर द्यावे लागतात. इतर कोणत्याही रंगाचा वापर केल्यास पेंटचे थर वाढून विमानाचे वजन कित्येक किलोने वाढते.

इंधनाची बचत: विमान जितके हलके असेल, आकाशात उडताना त्याला तितकेच कमी इंधन लागते. पांढरा रंग विमानाचे वजन नियंत्रित ठेवून विमान कंपन्यांचे लाखो रुपयांचे इंधन वाचवतो.

रंग फिका पडत नाही: विमान नेहमी खूप उंचीवर आणि कडक उन्हात उडते. दुसरा कोणताही रंग असता तर तो उन्हामुळे लवकर फिका पडला असता. पांढरा रंग वर्षानुवर्षे तसाच राहतो.

पक्षी धडकणे टाळते: अभ्यासानुसार, गडद रंगाच्या विमानांपेक्षा पांढऱ्या रंगाचे विमान हवेत उडणाऱ्या पक्षांना दुरूनच सहज दिसते. यामुळे पक्षी विमानाला धडकण्याचा धोका कमी होतो.

रिसेल व्हॅल्यू अधिक: पांढऱ्या विमानांना दुसरी कंपनी भाड्याने घेताना फक्त स्वतःचे लोगो पेंट करते, संपूर्ण रिपेटिंगचा मोठा खर्च वाचतो.

शोधकार्यात सोपे: दुर्दैवाने कधी अपघात झाल्यास, विमानाचा पांढरा रंग समुद्रात किंवा जंगलात दूरवरून शोध घेणे सोपे करतो.