भगवान शिवशंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे? हे फारच कमी लोकांना माहीत आहे!

भगवान शंकर यांच्या गळ्याभोवती नाग असण्यामागे खूप गंभीर आणि सुंदर अर्थ आहे.

मृत्यूवर विजयाचं प्रतीक 

नाग म्हणजे मृत्यू, भय आणि विष शंकराच्या गळ्यात नाग असणं म्हणजे मृत्यूवरही प्रभुत्व. 

वासना व अहंकारावर ताबा 

नागाला अहंकार आणि वासना यांचं प्रतीक मानतात. शंकरांनी नाग गळ्यात घातला म्हणजे इच्छा, राग, अहंकार यांवर पूर्ण नियंत्रण

काळाचं प्रतीक 

नाग आपली कात टाकतो म्हणजे पुनर्जन्म आणि बदल. शंकर महाकाल आहेत, काळाच्या पलीकडे.

विष धारण करण्याची शक्ती 

समुद्रमंथनात निघालेलं हालाहल विष शंकरांनी स्वतः पिऊन सृष्टी वाचवली. 

वैराग्य आणि तपश्चर्या 

नाग जंगलात, स्मशानात राहतो. शंकरही वैराग्य, तपस्या आणि साधेपणाचे देव. 

जो भय, विष, काळ आणि अहंकारावर विजय मिळवतो… तोच खरा महादेव! जय भोलेनाथ.