Dog Cry at Night: रात्री कुत्री का रडतात? त्यांना भूत दिसतं का? कि एखाद्याच्या मृत्यूचा संकेत असतो?

धार्मिक किंवा पौराणिक समजूत: काही लोक कुत्र्यांचे रडणे अशुभ मानतात आणि त्याचा संबंध एखाद्या अप्रिय घटनेशी जोडतात, परंतु विज्ञानानुसार हे पूर्णपणे नैसर्गिक वर्तन आहे

संरक्षणाची भावना: रात्री शांतता जास्त असते. लहानसा आवाज, हालचाल, सावली दिसली तरी कुत्री सावध होऊन भुंकतात. 

Real reasons dogs bark at night

अनोळखी आवाज: मांजर, उंदीर, साप, दुसरे कुत्रे किंवा माणसांची हालचाल ऐकू आली तरी भुंकतात. 

भीती किंवा असुरक्षित वाटणे: अंधार, एकटेपणा, पूर्वीचा वाईट अनुभव यामुळेही कुत्री रात्री रडू किंवा भुंकू शकतात. 

दुखणे किंवा आजारपण: काही वेळा वेदना, ताप, पोटदुखी असल्यास कुत्री अस्वस्थ होऊन रडतात किंवा भुंकतात. 

भूक किंवा तहान: वेळेवर अन्न-पाणी न मिळाल्यास कुत्री रडण्याचा आवाज करून लक्ष वेधतात. 

एकटेपणा किंवा कंटाळा: एकटेपणाची भावना किंवा कंटाळा आला असल्यास देखील कुत्री कधी कधी रडतात किंवा भुकतात.

संवाद साधण्यासाठी: कुत्रे इतर कुत्र्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा दूरच्या आवाजांना प्रतिसाद देण्यासाठी भुंकू शकतात.

कुत्र्यांचे रडणे मृत्यूचे संकेत आहे का? रात्री कुत्र्यांचे रडणे आणि मृत्यूचा काहीही संबंध नाही. ही लोकांमध्ये असलेली केवळ एक अंधश्रद्धा आहे.