जर्शी गाईच्या नर वासराचा (गोऱ्हा/बैल) उपयोग कसा करायचा?

कारण जर्शी बैलांचा वापर शेतीच्या कामासाठी (नांगरणी किंवा गाडी ओढण्यासाठी) देशी बैलांइतका केला जात नाही. त्यामुळे त्यांना रानावनात किंवा जंगलात सोडले जाते.

तरीही, शेतकरी जर्शीच्या नर वासराचा (गोऱ्हा/बैल) हुशारीने वापर करून चांगला फायदा घेऊ शकतात.

नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रिय खत: नर वासरू मोठे झाल्यावर त्यापासून मिळणारे शेण अत्यंत गुणकारी सेंद्रिय खत (शेणखत), गांडूळ खत बनवून शेतात वापरता येते किंवा विकता येते.

गोमूत्राचा वापर: गोमूत्रापासून जीवामृत, घनजीवामृत आणि नैसर्गिक कीटकनाशके तयार करून शेतीसाठी वापरता येते किंवा स्थानिक बाजारात विकता येते. 

बायोगॅस निर्मिती: नर वासरापासून मिळणाऱ्या शेणापासून बायोगॅस निर्मिती करून इंधनाची बचत करता येते.

सेंद्रिय शेतीला मदत: शेण व गोमूत्रामुळे रासायनिक खतांवरील होणारा बराच खर्च कमी होऊन सेंद्रिय शेतीला चालना मिळते.

उत्कृष्ट वळू (ब्रीडिंग बुल) म्हणून: जर वासरू चांगल्या वंशावळीचे असेल, तर ते मोठे झाल्यावर इतर गाईंच्या प्रजननासाठी किंवा कृत्रिम रेतनासाठी उत्तम वळू म्हणून वापरले जाऊ शकते.

हलकी कामे: जरी जर्शी बैल जड नांगरणीसाठी जास्त वापरले जात नसले, तरी त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर ते गोठ्यातील हलकी कामे करू शकतात. गोठ्यातील शेण वाहून नेणे, चारा कापण्याचे मशीन फिरवणे इ.

योग्य नियोजन आणि संगोपन केल्यास जर्सी गाईचे नर वासरूही शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकते.