पृथ्वीवर असा कोणता प्राणी आहे जो पाणी पिल्यावर मरतो?

मनुष्य असो प्राणी असो किंवा वनस्पती सगळ्यांनाच जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते. परंतु हा प्राणी त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही पाणी पीत नाही. 

तो पाणी का पीत नाही: हा प्राणी वाळवंटी भागात राहतो. तो खात असलेल्या बिया आणि शरीरातील पचनक्रिया यातूनच त्याला आवश्यक असलेली ओल किंवा पाणी मिळते.

शरीराची रचना: या प्राण्याची मूत्रपिंडे (Kidneys) अतिशय कार्यक्षम असतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचा अपव्यय अत्यंत कमी होतो. 

मृत्यूचे कारण: जेव्हा हा प्राणी पाणी पितो, तेव्हा त्याच्या शरीरातील चयापचय क्रिया बिघडते आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे तो पाणी पिणे टाळतो

या प्राण्याचे नाव कांगारु उंदिर आहे. उंदराची हि प्रजाती उत्तर अमेरिकेच्या वाळवंटात आढळतात.

वैज्ञानिक सत्य: शास्त्रीयदृष्ट्या पाणी प्यायल्याने लगेच मृत्यू होतो असा ठोस पुरावा नाही. मात्र, नैसर्गिक परिस्थितीत तो जवळपास कधीच पाणी पीत नाही.

पृथ्वीवरील हा असा पहिला जीव असेल जो पाण्याविना जिवंत राहू शकतो.

हा उंदिर कांगारूसारखा दोन पायांवर उद्या मारू शकतो. त्यामुळेच त्याला कांगारु उंदिर असे म्हंटल जातं.