विमानांना पांढराच रंग का दिला जातो? जाणून घ्या शास्त्रीय कारणे
सूर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण: पांढरा रंग सूर्यकिरणांना परावर्तित करतो. यामुळे विमान कडक उन्हातही थंड राहते आणि विमानातील यंत्रणा गरम होत नाही.
तडे आणि दोष ओळखणे:
पांढऱ्या रंगावर विमानाला गेलेले तडे, तेल गळती किंवा आलेले डेंट खूप सहज आणि स्पष्टपणे दिसून येतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करणे सोपे होते.
वजन राहते कमी:इतर गडद रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचे कमी थर द्यावे लागतात. इतर कोणत्याही रंगाचा वापर केल्यास पेंटचे थर वाढून विमानाचे वजन कित्येक किलोने वाढते.
इंधनाची बचत: विमान जितके हलके असेल, आकाशात उडताना त्याला तितकेच कमी इंधन लागते. पांढरा रंग विमानाचे वजन नियंत्रित ठेवून विमान कंपन्यांचे लाखो रुपयांचे इंधन वाचवतो.
रंग फिका पडत नाही:
विमान नेहमी खूप उंचीवर आणि कडक उन्हात उडते. दुसरा कोणताही रंग असता तर तो उन्हामुळे लवकर फिका पडला असता. पांढरा रंग वर्षानुवर्षे तसाच राहतो.
पक्षी धडकणे टाळते:
अभ्यासानुसार, गडद रंगाच्या विमानांपेक्षा पांढऱ्या रंगाचे विमान हवेत उडणाऱ्या पक्षांना दुरूनच सहज दिसते. यामुळे पक्षी विमानाला धडकण्याचा धोका कमी होतो.
रिसेल व्हॅल्यू अधिक:
पांढऱ्या विमानांना दुसरी कंपनी भाड्याने घेताना फक्त स्वतःचे लोगो पेंट करते, संपूर्ण रिपेटिंगचा मोठा खर्च वाचतो.
शोधकार्यात सोपे:दुर्दैवाने कधी अपघात झाल्यास, विमानाचा पांढरा रंग समुद्रात किंवा जंगलात दूरवरून शोध घेणे सोपे करतो.