विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेषा धूर नाही. जाणून घ्या वैज्ञानिक कारण

लोकांचा सर्वात मोठा गैरसमज: अनेकदा आपल्याला वाटते की तो विमानाच्या इंधनाचा धूर आहे. पण विज्ञान सांगते की, तो केवळ धूर नसून काहीतरी वेगळेच आहे!

या पांढरी रेषेला काय म्हणतात? विज्ञानाच्या भाषेत या पांढऱ्या रेषेला 'कॉन्ट्रेल्स' म्हणजेच 'कंडेन्सेशन ट्रेल्स' असे म्हटले जाते. हे एक प्रकारचे कृत्रिम ढग असतात. जेव्हा गरम बाष्प आणि थंड हवा एकत्र येते, तेव्हा हे ढग आकाशात क्षणार्थात तयार होतात.

उंचावरील गोठवणारी थंडी: जेव्हा विमान जमिनीपासून ८ किलोमीटर पेक्षा जास्त उंच असते, तेव्हा तापमान उणे ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी असते.

इंजिनमधून काय बाहेर पडते? अशा गोठवणाऱ्या थंडीत रॉकेटचे इंजिन प्रचंड उष्णता, पाणी आणि इंधनाचे बारीक कण हवेत सोडते.

वाफेचे बर्फात रूपांतर: इंजिनमधून निघणारी ही गरम वाफ जेव्हा बाहेरील अतिथंड हवेच्या संपर्कात येते, तेव्हा ती क्षणार्धात गोठते आणि त्याचे बर्फाच्या लहान स्फटिकांमध्ये रूपांतर होते.

आपल्याला काय दिसते: हेच लाखो बर्फाचे स्फटिक एकत्र येऊन आकाशात एका पांढऱ्या ढगासारखी लांब रेष तयार करतात, जी आपल्याला जमिनीवरून स्पष्ट दिसते. 

काही रेषा लगेच का गायब होतात? जर हवेत आर्द्रता कमी असेल, तर ही रेष लगेच गायब होते. पण हवेत दमटपणा जास्त असेल, तर ही रेष खूप वेळ हवेत तरंगत राहते.

हवामानाचा अंदाज: आजही हवामान तज्ज्ञ या रेषा आकाशात किती वेळ टिकतात, यावरून वरच्या थरातील आर्द्रतेचा आणि हवामानाचा अचूक अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात.

आहे ना रंजक सायन्स? अशीच आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि मित्रांना शेअर करा!