या देशांमध्ये नैसर्गिक जंगल जवळपास नाही; जाणून घ्या कारणे. 

जगभरात वृक्षारोपणावर भर दिला जात असला, तरी काही देशांमध्ये हवामान, भौगोलिक परिस्थिती किंवा मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक जंगलाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 

या देशांमध्ये नैसर्गिक जंगल नाही. कारण ते वाळवंटी, खडकाळ, बर्फाळ किंवा अतिशहरी असतात.

कतार: कतारमध्ये एकही नैसर्गिक जंगल नाही. हा पूर्णपणे वाळवंटी देश आहे. येथे जी काही झाडे दिसतात, ती मानवनिर्मित आहेत.   

ग्रीनलँड: नावामध्ये 'ग्रीन' असले तरी हा जगातील सर्वात मोठा बर्फाच्छादित बेट-देश आहे. येथील हवामान प्रचंड थंड असल्याने येथे नैसर्गिकरित्या झाडांची वाढ कठीण आहे.

ओमान: ओमान हा अरब देशांपैकी एक आहे, जो वाळवंटाने वेढलेला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, ओमानमध्ये जंगलाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

सॅन मारिनो: हा युरोपमधील अतिशय लहान देश आहे. डोंगराळ आणि पूर्णपणे शहरीकरण झाल्यामुळे या देशात नैसर्गिक जंगलाचे क्षेत्र अत्यंत मर्यादित आहे.

नौरू: प्रशांत महासागरातील हा एक छोटा बेट-देश आहे. अति-खननमुळे या देशाची जमीन इतकी खराब झाली आहे की, येथे वृक्षसंपदा मर्यादित आहे.

निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे! अशी आहे या देशांची अवस्था? स्रोत: जागतिक बँक, FAO आणि संबंधित सरकारी माहिती.