Marriage Rituals: लग्नात वधू-वरच्या डोक्यावर अक्षता का टाकतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

लग्नविधी: लग्नात बऱ्याच विधी असतात. लग्नकार्य व्यवस्थित पार पडावे म्हणून या विधी केल्या जातात. लग्नातील प्रत्येक विधीला अतिशय महत्व आहे.

अक्षता: परंतु तुम्हाला माहित आहे का लग्नामध्ये वधू-वरच्या डोक्यावर अक्षता म्हणून तांदूळच का टाकले जाते.

अखंड संसाराची प्रार्थना: अक्षत या शब्दाचा अर्थ जे कधीही क्षत होत नाही, म्हणजेच जे अखंड आहे. तांदळाचा प्रत्येक दाणा हा अखंड (अक्षत) असतो. वधू-वरांचा संसारही असाच अखंड, सुखी आणि समाधानी राहावा अशी यामागे प्रार्थना असते.

संपत्तीचं प्रतीक: तांदळांला संपत्तीचं प्रतीक असं मानलं जात. सुख आणि समृद्धीचं प्रतीक असल्याने तांदळास धार्मिक मान्यतेनुसार पवित्र मानले जाते.

समृद्धी आणि भरभराट: तांदूळ हे अन्नपूर्णा देवीचे रूप मानले जाते. अक्षता टाकून जोडप्याच्या घरात धन-धान्याची कमतरता भासू नये, अशी कामना केली जाते.

सकारात्मक ऊर्जा: धार्मिक मान्यतेनुसार, हळद लावलेल्या अखंड तांदळामध्ये वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते, जी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी वापरली जाते.

विधी: लग्नात विविद्ध प्रकारचे विधी पार पडतात त्यामध्ये मंगळसुत्र उलटं घालणं, वरमाला घालणं आणि अक्षता टाकणं या सगळ्या विधींचा समावेश असतो.

आशीर्वाद देणे: लग्नात वधू-वरांवर अक्षता टाकणे म्हणजे त्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद देणे होय. अक्षता या शब्दाचा अर्थ 'अखंड' असा होतो. म्हणून धार्मिक मान्यतेनुसार, लग्नात वधू-वरच्या डोक्यावर अक्षता टाकल्या जातात.