Winter Health Tips 2025: हिवाळा हा ऋतू सुरू झाल्यानंतर काही जणांना छोट्या मोठ्या आजारांच्या समस्या होतात. हे आजार टाळण्यासाठी हिवाळ्यात आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. थंडीच्या या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती.
प्रस्तावना:
देशातील बऱ्याच भागांमध्ये थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. संध्याकाळी वातावरणातला गारवा हा दिवसेंदिवस वाढत आहे. हिवाळ्यात आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी दिसून येतात. तापमानातील झालेली घट यामुळे सर्दी-खोकला, ताप, त्वचेचे काही विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. आरोग्याच्या या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित आणि नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. हिवाळ्यातील या दिवसांमध्ये शरीर फिट आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागत असते. तसेच थंडीच्या या दिवसांमध्ये शारीरिक हालचाल देखील कमी झालेली असते. हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिक वाचा: थंडीमध्ये सुरू करा हा व्यवसाय, आणि महिन्याला कमवा 50,000 रुपये
हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे सर्दी आणि ताप अशा आजार सतत वाढत आहेत. तसेच घशामध्ये सुद्धा खवखव होणे हे थंडीतील एक लक्षण आहे. हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येमध्येही सतत वाढ होत असते. सर्दी आणि तापाचे प्रमाण वाढत असल्याने अशा परिस्थितीत थोडाही निष्काळाचीपणा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. घशात वारंवार खवखव होत असेल तर कोमट पाणी पिल्याने खवखव आणि विषारी पदार्थांपासून आराम मिळतो. बंद नाक आणि घसा खवखवणे यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे हे देखील अतिशय फायदेशीर मानले जाते. तसेच कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Winter Health Tips 2025: हिवाळ्यामध्ये योग्य आहार घेणे आवश्यक:
हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्याच्या या ऋतूमध्ये बऱ्याच प्रकारच्या आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते. अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे असते. संपूर्ण वर्षभर पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे हे महत्त्वाचे तर असतेच परंतु हिवाळ्यात विशेषत: महत्त्वाचे आहे. आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. ह्या पौष्टिक पदार्थांमुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भाज्या आणि फळे खावीत. फळे आणि भाज्यांमध्ये विटामिन आणि खनिजांचा जास्त समावेश असल्याने आपल्या शरीराला आजारांविरुद्ध लढण्यास मोठी मदत मिळते. व्हिटॅमिन सी आणि डी साठी आपल्या आहारात लिंबू, संत्री, आवळा, ब्रोकोली आणि पालक यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास फायदा होतो. हिवाळ्यात तेलकट, तळलेले आणि जास्त गोड पदार्थ खाऊ नयेत कारण त्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते.
पाणी योग्य प्रमाणात प्या: Winter Health Tips 2025:
हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात पिल जात. परंतु हिवाळ्याचे ह्या ऋतूमध्येही पाणी जास्त प्रमाणात पिणे आवश्यक आहे. हिवाळ्यात कोमट पाणी आणि हर्बल टी पिणे आरोग्यास चांगले आहे. हर्बल टी मुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होते. चहा आणि कॉफी यांचे अधिक सेवन करू नये.
चांगली झोप घ्या:
हिवाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. दररोज रात्री सात ते आठ तास शांत झोप घ्या. झोपण्याच्या वेळेचा योग्य दिनक्रम ठेवा. झोपण्यासाठी आरामदायी जागा, अनुकूल वातावरण ठेवा आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करा.
अधिक वाचा: थंडीच्या दिवसांमध्येच हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? कारणे, लक्षणे आणि उपाय
नियमित व्यायाम करा:
आपले शरीर फिट राहण्यासाठी आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे आपल्या शरीराच्या हालचाली कमी होऊ शकतात. आपल्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. जिम मध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य नसल्यास रोज चालण्याचा साधा व सोपा व्यायाम करणे आरोग्यास उत्तम आहे. चालण्याच्या व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शरीरातील रक्तप्रवाह देखील वाढण्यास मदत होते.
थंडीपासून संरक्षण करा:
हिवाळ्यामध्ये थंडीपासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालने अत्यंत आवश्यक आहे. थंडीच्या या दिवसांमध्ये विशेष करून हात मौजे, पायमोजे आणि कान टोपी ह्या गोष्टींचा वापर करावा. अति थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर कपड्यांचा थर घाला. उबदार कपड्यांबरोबरच आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा ज्या पदार्थांमुळे शरीरात उष्णता टिकून राहील.

स्वच्छता ठेवा:
हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असते. वारंवार साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुवा आणि चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. घर आणि कामाच्या ठिकाणी वारंवार स्पर्श होणारा भाग स्वच्छ ठेवा. यामुळे जंतूंचा प्रसार रोखण्यास मदत होते.
तणावाचे व्यवस्थापन करा:
हिवाळ्यातील कोरडेपणामुळे भावनिक विकारांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खोल श्वास घेणे, योगासने करणे, ध्यान किंवा एखादा आवडीचा छंद जोपासणे यामुळे तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. तसेच आपल्या कुटुंबियासोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवणे याचाही आपल्या आनंदी राहण्यास फायदा होतो.
हिवाळ्यात कोरडी होणाऱ्या त्वचेची काळजी घ्या:
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे ही एक सामान्य स्थिती आहे. त्वचा कोरडी पडल्यास त्वचेला खाज येणे व त्वचेची जळजळ होते. शरीराचा नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यासाठी आंघोळीपूर्वी कोमट नारळ तेल शरीरास लावा. तसेच कोरफड किंवा ग्लिसरीन सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करा. ओमेगा थ्री समृद्ध आळशीचे बियाणे, अक्रोड किंवा मोहरीचे तेल त्वचेच्या गुणवत्तेसाठी चांगले आहे यांचा आहारात वापर करा.
हिवाळ्यात व्हिटॅमिन डी साठी थोडा वेळ उन्हात बसा:
हिवाळ्यातील थंडीमध्ये बहुतेक वेळा सूर्यप्रकाश कमी मिळतो ज्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी ची पूर्तता करण्यासाठी सकाळच्या सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनिटे उन्हात बसा. तसेच व्हिटॅमिन डी असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा.
अधिक वाचा: हिवाळ्यात हाडे-सांधे दुखतात? रोज खा पांढरे तिळ – मिळतील 10 जबरदस्त फायदे
हिवाळ्यात तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या:
हिवाळ्यामध्ये भारतातील अनेक शहरांमध्ये पसरणाऱ्या धुक्यामुळे शोषणाच्या समस्या वाढतात. यासाठी श्वसनाचे व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित प्राणायाम केल्यास फुफ्फुसांची क्षमता सुधारू शकते आणि जळजळ कमी होते. आपल्या श्वासनलिकेतील मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी वाफेत निलगिरी किंवा भीमसैनि कापूरचा वापर करा.
हिवाळ्यात वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवा:
हिवाळ्यात बऱ्याच वेळा जास्त कॅलरीज असलेल्या पदार्थ खाण्याची इच्छा होते यामुळे शरीराचे वजन वाढते. सकाळच्या नाश्त्यामध्ये तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले शेंगदाणे, गुळ तीळ किंवा गुळ आणि शेंगदाणे खा. तसेच गाजर, पालक आणि मुळा यांसारख्या हंगामी भाज्यांसह थोडे थोडे जेवण केल्याने शरीराची ऊर्जा स्थिर राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात घर अनुकूल ठेवा:
हिवाळ्यात थंडीमध्ये चांगले आरोग्य राखण्यासाठी तुमच्या राहण्याची जागा महत्त्वाची भूमिका बजावते. राहण्याचे ठिकाण नियमित हवेचे ठेवण्यासाठी दुपारच्या वेळेस थोडा वेळ खिडक्या उघड्या ठेवा. तसेच घरातील फरश्या उबदार ठेवण्यासाठी गालिचे किंवा कार्पेट यांचा वापर करावा. जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी तुमचे घर नियमित स्वच्छ ठेवा आणि नियमितपणे हात धुवा.
ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या:
वृद्ध व्यक्तींना हिवाळ्यातील अति थंडीमुळे आरोग्याच्या समस्या होण्याचा जास्त धोका असतो. यासाठी वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी स्वेटर आणि उबदार शालीचा वापर करा. तसेच सांध्यांची हालचाल सुरळीत राहण्यासाठी सकाळच्या वेळेस हलका व्यायाम किंवा योगा करण्यासाठी वृद्ध व्यक्तींना प्रोत्साहन द्या. तसेच वृद्ध व्यक्तींची नियमितपणे तपासणी करून घ्या.
हिवाळ्यात निरोगी राहण्याचे फायदे:
हिवाळ्यात निरोगी राहण्याचे खूप फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
- संतुलित आहार, चांगली झोप आणि नियमित व्यायाम केल्यामुळे निरोगी राहण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते. यामुळे हिवाळ्यात तुम्हाला होणाऱ्या सर्दी, फ्लू किंवा श्वसनाच्या आजारांपासून लढण्यास मदत होते.
- तुम्ही हिवाळ्यात निरोगी राहिल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते आणि आजारी राहण्याचा कालावधी कमी असल्यामुळे इतरांना आजार पसरण्याची शक्यता देखील कमी होते.
- हिवाळ्यात चांगले आरोग्य जपल्यामुळे थंडीच्या दिवसातही चांगले ऊर्जा तुम्हाला शरीरात टिकवून ठेवता येते आणि यामुळे येणारा थकवा दूर होण्यास मदत होते.
- हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या कमी संपर्कामुळे व्यक्तींना भावनिक विकार होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात घेण्यात येणाऱ्या संतुलित आहारामुळे आणि नियमित व्यायामामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होऊन तुमच्या मानसिक आरोग्यावर चांगला सकारात्मक परिणाम होतो.
- हिवाळ्यात जरीही तुम्हाला सर्दी किंवा फ्लू झाला तरी निरोगी राहिल्यामुळे बऱ्याचदा लवकर बरे होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे शरीराला होणाऱ्या संसर्गापासून लढण्यास मदत मिळते.
- चांगली झोप घेतल्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळे रोगप्रतिकशक्ती देखील वाढवून तणावापासून दूर राहण्यास मदत होते.
- हिवाळ्यात जास्त कॅलरीचे अन्न खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता देखील कमी असते हिवाळ्यात निरोगी आरोग्य ठेवल्यामुळे व नियमित व्यायाम केल्यामुळे याचा फायदा होतो.
- हिवाळ्यात शारीरिक हालचाल ठेवल्यामुळे आणि स्नायूंची ताकद राखल्यामुळे दुखापती होण्याची शक्यता कमी असते.
- हंगामी भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांनीयुक्त असा समृद्ध आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्वे मिळतात. ज्यामुळे हिवाळ्यात तुमचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
- हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेतल्यामुळे आणि निरोगी राहिल्यामुळे आजारपणापासून किंवा कमी झालेल्या ऊर्जेमुळे देखील तुम्हाला ह्या हिवाळ्याच्या ऋतूचा आनंद घेता येतो आणि जीवनाचा दर्जा टिकून ठेवता येतो.
हिवाळ्यात काही पदार्थ टाळावेत:
- हिवाळ्यात काही पदार्थ टाळावेत किंवा मर्यादित प्रमाणात सेवन करावेत. बऱ्याचदा आपण या खबरदारींकडे दुर्लक्ष करतो आणि जाणूनबुजून किंवा नकळत अशा चुका करतो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते.
- थंडी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि लोक आता अनेक थरांचे कपडे घालू लागले आहेत. हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढताच आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल होतो. परंतु बऱ्याचदा चवीनुसार आपण असे पदार्थ खातो ज्यामुळे आपल्या श्वसन संस्थेला आणि पचनसंस्थेला हानी पोचू शकते.
- काही पदार्थ आपल्या शरीरातील कफाचे प्रमाण वाढवतात ज्यामुळे आपले नाक बंद होते, श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीरात जडपणा जाणवतो. जर तुम्हाला थंडीची ऍलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. वाईट खाण्याच्या सवयीमुळे फुफ्फुसातील कफ जमा होण्यास हातभार लागतो व अंतर्गत अवयवांमध्ये जळजळ देखील वाढते.
- तज्ञांच्या मते हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अगोदरच कमी होत असते. जड आणि थंड पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखीन कमकुवत होऊ शकते ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
थंड दूध आणि आईस्क्रीम टाळा:
हिवाळ्यात थंड दुग्धजन्य पदार्थ, मिल्कशेक किंवा आईस्क्रीम हे विषासारखे असतात. हे पदार्थ शरीरातील कफ वाढवतात ज्यामुळे घसा खवखवणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात नेहमी कोमट हळदीचे दूध पिणे आरोग्यास उत्तम आहे. हळदीमध्ये अँटिबेटिरियल गुणधर्म असल्यामुळे कफ जमा होत नाही आणि अंतर्गत उबदारपणा हा टिकून राहतो.
जास्त साखर आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने होणारे धोके:
आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने पुढील ४-५ तास रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या कमी होते. तसेच साखर शरीरात जळजळ वाढवते, ज्यामुळे आरोग्यास हानी होते. तळलेले आणि तेलकट पदार्थ शरीराची पचन मंदावतात. हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे, ही अतिरिक्त चरबी हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ब्लॉकेजचा धोका वाढण्याची शक्यता असते.
रात्री केळी खाणे हे जास्त धोकादायक आहे:
हिवाळ्यात रात्री केळी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. केळी निसर्गतः थंड असतात आणि आयुर्वेदानुसार, ते कफ वाढवतात. रात्री ते खाल्ल्याने छातीत जळजळ आणि सायनसचा धोका वाढू शकतो.
जास्त गव्हाचे पदार्थ टाळावे:
हिवाळ्यात चपाती आणि पुरी यांसारखे जास्त गव्हाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने देखील शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. ग्लूटेन संवेदनशील असलेल्यां लोकांसाठी, जास्त गव्हाचे सेवन केल्याने अंतर्गत जळजळ वाढते. यामुळे केवळ पोटात जडपणा येतोच असे नाही तर श्वसनसंस्थेतही अडथळा निर्माण होऊ शकतो. हिवाळ्यात आहारात हलके आणि सहज पचणारे धान्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
निष्कर्ष (Conclusion):
हिवाळा हा आनंददायी ऋतू असला तरी आरोग्याच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याची गरज असते. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास हिवाळ्यात होणाऱ्या बहुतेक आजारांपासून आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो.
थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालणे, कोमट पाणी पिणे आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तणाव कमी ठेवणे आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.
लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेतल्यास त्यांना हिवाळ्यात होणाऱ्या त्रासापासून वाचवता येते. योग्य जीवनशैली आणि चांगल्या सवयी अंगीकारल्यास तुम्ही हिवाळ्याचा आनंद घेत निरोगी आणि ऊर्जावान राहू शकता.
FAQs:
1. हिवाळ्यात आजार का जास्त होतात?
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी होते. तसेच थंड हवेमुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया लवकर पसरतात, त्यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू सारखे आजार वाढतात.
2. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी?
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C आणि D युक्त पदार्थ जसे की लिंबू, संत्री, आवळा, पालक यांचा आहारात समावेश करावा. तसेच नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी ठेवणे गरजेचे आहे.
3. हिवाळ्यात किती पाणी पिणे आवश्यक आहे?
हिवाळ्यात तहान कमी लागली तरी दिवसातून किमान 7–8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. कोमट पाणी किंवा हर्बल टी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
4. हिवाळ्यात कोणते पदार्थ टाळावेत?
हिवाळ्यात थंड दूध, आईस्क्रीम, जास्त गोड पदार्थ आणि तळलेले अन्न टाळावे. हे पदार्थ कफ वाढवतात आणि पचनक्रिया मंद करतात.
5. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
त्वचा कोरडी पडू नये म्हणून नियमित मॉइश्चरायझर वापरावा, कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि नारळ तेल किंवा कोरफड वापरल्याने त्वचा मऊ राहते.
6. हिवाळ्यात व्यायाम करणे आवश्यक आहे का?
होय, हिवाळ्यात शरीराची हालचाल कमी होते त्यामुळे रोज किमान 20–30 मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
7. हिवाळ्यात व्हिटॅमिन D कसे मिळवावे?
दररोज सकाळी 15–20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसल्याने शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D मिळते.
8. हिवाळ्यात वजन वाढू नये यासाठी काय करावे?
तळलेले आणि जास्त कॅलरीचे पदार्थ टाळावेत. त्याऐवजी भाज्या, फळे आणि संतुलित आहार घ्यावा तसेच नियमित व्यायाम करावा.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली?
हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जरूर शेअर करा. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीकरिता आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Disclaimer: प्रिय वाचकांनो, हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. हा कोणत्याही प्रकारे वैद्यकीय मताचा पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे. 24