नमस्कार, माझे नाव मनोज इचके आहे. आपल्या mahanewss.com या ब्लॉगवर स्वागत आहे. मला डिजिटल मीडियामध्ये 3+ वर्षांचा अनुभव असून मी आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म आणि ताज्या बातम्यांवर माहितीपूर्ण लेखन करतो. आतापर्यंत मी 50+ पेक्षा अधिक लेख आणि वेब स्टोरीज प्रकाशित केले असून हजारो वाचकांनी माझ्या लेखनावर विश्वास दाखवला आहे.
मी नेहमीच वाचकांना सोप्या, स्पष्ट आणि विश्वसनीय माहिती देण्यावर भर देतो. माझ्या लेखांमध्ये दिलेली माहिती ही विविध विश्वसनीय स्त्रोत, पारंपरिक ज्ञान आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीच्या आधारे तयार केलेली असते, जेणेकरून वाचकांना योग्य आणि उपयोगी मार्गदर्शन मिळू शकेल.
मी एक Blogger आणि Freelancer आहे. तसेच मी आतापर्यंत संपूर्ण भारतात फ्रीलांसिंग सर्विसेस यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. फ्रीलान्सिंग मध्ये मी ग्राफिक डिजाईन, कन्टेन्ट रायटिंग, वेबस्टोरी या सर्व्हिसेस देतो. या एकत्रित अनुभवाचा वापर करून, मी अधिकृत माहितीचे सखोल विश्लेषण करतो आणि वाचकांना स्पष्ट व दृश्य स्वरूपातील मार्गदर्शन पुरवतो. अधिक सुजाण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असा समाज घडवण्यास हातभार लावणे, हीच माझी मुख्य बांधिलकी आहे.
mahanewss.com चा हा प्रवास महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील छोटयाश्या खेडे गावातून सुरु झालेला तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे इतर देशांपर्यंत पोहचला आहे. या मागे तुम्हा सर्वांचा मोलाचा वाटा आहे. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला, जी साथ तुम्ही मला कायम दिली ते शब्दात व्यक्त करता येणं अशक्य आहे.
mahanewss.com च्या निर्मितीमागील मुख्य उद्दिष्ट आणि ध्येय काय आहे?
मित्रांनो, प्रत्येक गोष्ट करण्यामागे आपला काहीतरी उद्देश हा असतोच आणि तो असायला पण हवा. जेणेकरून आपल्याला आपला मार्ग हा स्पष्ट असेल. आपण शेवटपर्यंत त्याच जोशाने ते काम मन लावून तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला त्या कामाविषयी असलेली पूर्वकल्पना ही माहिती असते.
माझा वैयक्तिक mahanewss.com या ब्लॉगला सुरु करण्यामागचं महत्वाचं उद्दिष्ट्य असं कि, मराठी वाचकांपर्यंत अचूक, प्रामाणिक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती पोहोचवणे हे आहे. मी नेहमीच नवीन माहिती अपडेट ठेवण्याचा आणि वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करतो.
सरकारी उपक्रमांमधील गुंतागुंत सोपी करणे आणि ती स्पष्ट, दृश्यमान व वापरकर्त्यासाठी सुलभ अशा पद्धतीने सादर करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे. आमच्या वाचकांना वेळेवर, अधिकृत आणि विश्लेषणात्मक माहिती उपलब्ध होईल याची खात्री करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे; जेणेकरून त्यांना प्रत्येक योजनेचा प्रभावीपणे लाभ घेता येईल आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील.