12 Natural Foods That Help Support Healthy Nerves and Blood Circulation: अलीकडच्या काळातील धावपळीच्या जीवनामुळे आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपले शरीर डिटॉक्स होत नाही. परंतु काही पदार्थांचा, फळांचा आणि काही गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता. यामध्ये काही पदार्थ, फळे आणि स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर करू शकता. पण या गोष्टींचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊया.
प्रस्तावना:
आपल्या दररोजच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि दिवसेंदिवस होणाऱ्या आपल्या जीवनशैलीतील बदल यांचाही आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. यामुळे आपल्या नखांपासून ते केसांपर्यंत एकूणच आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. परंतु आपल्या घरातील काही पदार्थ, फळे आणि स्वयंपाक घरातील मसाल्यांचा वापर यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आपल्याला मुक्त होऊ शकता येते.
अलीकडच्या काळात संपूर्ण जगभरात हार्ट अटॅक आणि कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अतिशय झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा प्रकारच्या गंभीर आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. अशा वेळेस शरीरात दिसणारी लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. कॅन्सर आणि हार्ट अटॅक झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
अधिक वाचा: मीठ कमी असूनही BP का वाढतो? शास्त्रज्ञांचा नवीन खुलासा
नसांचे आरोग्य बिघडण्याची मुख्य कारणे: 12 Natural Foods That Help Support Healthy Nerves and Blood Circulation:
दिवसेंदिवस होणारे जीवनशैलीतील बदल, मानसिक ताणतणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, कमी प्रमाणात पाणी पिणे, बिघडलेली पचनक्रिया अशा अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर नसा ब्लॉक होऊ लागतात. हृदयाच्या ब्लॉक होऊ लागलेल्या नसांमध्ये वाढलेल्या चिकटपणामुळे हृदयाला व्यवस्थित प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. ह्याच कारणास्तव एखाद्या व्यक्तीला कोणत्याही क्षणी स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.
आपल्या शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा आणि हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, आपल्या घरातील काही पदार्थ, स्वयंपाक घरातील काही मसाल्याचे पदार्थ आणि काही ठराविक फळे यांचा वापर करून आपल्या शरीरातील आणि हृदयाच्या ब्लॉक झालेल्या ह्या प्रत्येक नसा आणि नसा म्हणजेच रक्तवाहिन्या यांचे आरोग्य सुधारता येते. यामुळे आपले हृदय व संपूर्ण शरीर आपण निरोगी ठेवू शकतो.
आज आम्ही तुम्हाला शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा आणि हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या यांचे आरोग्य सुधारण्यासाठी (12 Natural Foods That Help Support Healthy Nerves and Blood Circulation) आणि आपले आरोग्य कायमचे निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आणि फळांचा वापर करावा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
नसा कमजोर झाल्याची (Nerve Weakness) काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे दिसू शकतात:
- हात-पाय सुन्न होणे: हात, पाय किंवा बोटांमध्ये वारंवार झिणझिण्या येणे किंवा सुन्नपणा जाणवतो.
- हात-पायात जळजळ किंवा मुंग्या येणे: कधी कधी जळजळ, मुंग्या येणे किंवा चिमटल्यासारखी भावना होते.
- स्नायूंमध्ये कमजोरी: हातात ताकद कमी होणे, वस्तू नीट पकडता न येणे किंवा पटकन थकवा येणे.
- चालताना असंतुलन: चालताना डगमगणे, तोल जाणे किंवा पायात शक्ती कमी वाटणे.
- वेदना किंवा कळा: हात, पाय, पाठ किंवा मान येथे तीक्ष्ण किंवा जळजळ करणाऱ्या वेदना होऊ शकतात.
- प्रतिक्रिया कमी होणे: स्पर्श, उष्णता किंवा थंडी याची जाणीव कमी होणे.
- झोपेची समस्या: नसांमध्ये ताण असल्यामुळे रात्री झोप नीट न लागणे.
- वारंवार थकवा: शरीर पटकन थकणे आणि ऊर्जा कमी वाटणे.
नसा मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक पदार्थ आणि फळे:
नसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते असे पदार्थ आणि फळे खालीलप्रमाणे आहेत:
औषधी मसाले पदार्थ: दालचिनी, लसूण, आलं, हळद, अर्जुन साल
लाल रंगाची फळे: कलिंगड, गाजर, टोमॅटो, डाळिंब, स्ट्राबेरी, चेरी, रास्पबेरी

1) दालचिनी:
- दालचिनी (Cinnamon) ही फक्त मसाला नाही, तर हृदयासाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक औषध आहे. आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन दोन्ही दालचिनीला हृदय आरोग्यासाठी उपयुक्त मानतात.
- दालचिनीचा हृदयाला फायदा कसा होतो? दालचिनी: रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. नसा (रक्तवाहिन्या) ब्लॉकेज होण्यापासून वाचवते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे संरक्षण: दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, Anti-inflammatory हे घटक असतात. यामुळे हृदयावरील सूज कमी होण्यास मदत होते आणि हृदयाच्या पेशींचे नुकसान टाळले जाते.
- आरोग्य तज्ञांच्या मते दालचिनी रक्त पातळ ठेवण्यास मदत करते. यामुळे अचानक ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो. नसा मजबूत आणि लवचिक करते, रक्तवाहिन्या कडक होण्यापासून वाचतात आणि हृदयावरचा ताण कमी होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- दालचिनी कशी घ्यावी? (हृदयासाठी योग्य पद्धत)
1 कप कोमट पाणी, अर्धा चमचा दालचिनी पावडर, सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे.
अधिक वाचा: अरे बापरे! मिठाशिवाय आणि ताणतणावा शिवाय वाढू शकतो BP शास्त्रज्ञांनी शोधले आश्चर्यकारक कारण

2) लसूण:
- लसूण (Garlic) हा फक्त चवीसाठी नाही, तर हृदयासाठी एक नैसर्गिक औषध आहे. आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन दोन्ही लसणाला Heart Protector मानतात.
- लसणाचा हृदयाला फायदा कसा होतो? लसणात असलेले Allicin हे सक्रिय घटक असल्याने वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करतात, नसा (रक्तवाहिन्या) ब्लॉकेज होण्यापासून वाचवतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
- काही संशोधनांनुसार लसूण रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. आरोग्य तज्ञांच्या मते, लसूण रक्त गोठणे (Clot) टाळतो. अचानक ब्लॉकेज होण्याचा धोका कमी करतो. हृदयाचे आरोग्य सुधारल्याने हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
- लसूण नसांचे आरोग्य सुधारतो आणि लवचिक ठेवतो. यामुळे नसा कडक होण्यापासून वाचतात. हृदयावरचा ताण कमी होतो, विशेषतः 40 वर्षांनंतर फार उपयुक्त असते. लसणातील अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे संरक्षण होते. लसूण हृदयावरील सूज कमी करते. लसूण हृदयाच्या पेशींचे नुकसान रोखतात, मधुमेहात हृदय सुरक्षित ठेवतो, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
अधिक वाचा: सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास शरीरात काय होते? 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या

3) आलं:
- आलं (Ginger) खरंच नसा आणि रक्तवाहिन्यांसाठी वरदान आहे. आल्यामध्ये Gingerol नावाचं शक्तिशाली घटक असतं. आरोग्य तज्ञांच्या मते आलं हे रक्तात होणारे क्लॉट्स (गाठी) तयार होऊ देत नाही. त्यामुळे नसा आणि रक्तवाहिन्यांमधील प्रवाह मोकळा राहतो.
- नियमित आलं खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण हळूहळू कमी होते. आलं नैसर्गिक Anti-Inflammatory आहे. नसांमधील सूज कमी होते. हृदयविकार, स्ट्रोकचा धोका कमी होतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत होते. आलं रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते. High BP कमी होण्यास मदत करते. त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो.
- आलं कसं घ्यावं: सकाळी उपाशीपोटी – आलं किस + कोमट पाणी, आल्याचा काढा – आलं + तुळस + काळी मिरी, जेवणात –
भाजी, आमटी, चहा यात आलं - थोडक्यात सांगायचं तर आलं हि महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. नसा मजबूत, रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले आणि हृदय निरोगी राहते.

4) हळद:
- हळद (Turmeric) ही आपल्या आयुर्वेदात अमृतासारखी मानली जाते.
- हळद ही नसा आणि रक्तवाहिन्या यांचे आरोग्य सुधारते? कसे ते जाणून घेऊया
- दाह कमी करते:
शरीरातील नसा व रक्तवाहिन्यांमध्ये सूज आली की रक्तप्रवाह अडतो. हळद ही सूज कमी करून रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. - रक्त पातळ ठेवण्यास मदत:
हळद रक्त जास्त घट्ट होऊ देत नाही. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो. - कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते:
वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) साचल्यामुळे नसा व रक्तवाहिन्या अरुंद होतात. हळद ते कमी करण्यास मदत करते. - नसांना बळकटी देते:
हळद नसांची लवचिकता (flexibility) टिकवून ठेवते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. - अँटीऑक्सिडंट गुणधर्म:
हळद शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे रक्त “स्वच्छ” होण्यास मदत होते.
हळद कशी घ्यावी?
कोमट दूध + चिमूटभर हळद (रात्री झोपण्यापूर्वी)
कोमट पाणी + हळद + थोडी काळी मिरी (सकाळी)
काळी मिरी घातल्याने हळदीचा फायदा अनेक पटींनी वाढतो.
हळद नियमित आणि योग्य प्रमाणात घेतली तर नसा मजबूत, रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि हृदय तंदुरुस्त राहते.
5) अर्जुन साल:
- अर्जुनाची साल (Arjuna Bark) म्हणजे हृदय, नसा आणि रक्तवाहिन्यांसाठी आयुर्वेदात महत्त्वाची औषधी वनस्पती होय. अर्जुनाची साल ही एक अद्भुत अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ती अनेक औषधांमध्ये आणि घरगुती उपचारांमध्ये वापरली जाते. अर्जुन सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे अनेक आजार बरे करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन आणि पॉलीफेनॉल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
- अर्जुन वृक्षाची सुकवलेली साल आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वापरली जाते. विशेषतः हृदय, नसा आणि रक्तवाहिन्या यांचे आरोग्य सुधारण्याससाठी प्रसिद्ध आहे. अर्जुनाची साल नसा आणि रक्तवाहिन्या यांचे आरोग्य सुधारण्यास कशी मदत करते? हे आता आपण जाणून घेवूया.
- रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज कमी करते. अर्जुन सालीत अँटिऑक्सिडंट्स + फ्लॅवोनॉइड्स असते. यामुळे आपल्या रक्तात साचलेली घाण (फॅट, टॉक्सिन्स) कमी होतात. आणि त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते व त्या लवचिक राहतात.
- अर्जुन साल नसा मजबूत करते. नसा कमजोर होण्यापासून संरक्षण देते. नसांमधील जळजळ व ताण कमी करण्यासाठी मदत करते. शरीराच्या कुढल्याही भागाला येणारा सुन्नपणा, मुंग्या येणं कमी होतं. (12 Natural Foods That Help Support Healthy Nerves and Blood Circulation)
- अर्जुन वृक्षाची सुकवलेली साल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते. चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढायला मदत करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. उच्च रक्तदाब नैसर्गिकरीत्या कंट्रोल करते. हृदयाच्या स्नायूंना बळ देऊन हृदयाची ताकद वाढवण्यास मदत करते आणि थकवा कमी करते.
शरीरातील नसा आणि हृदयासाठी फायदेशीर लाल रंगाची फळे:
लाल फळं (Red Fruits) म्हणजे आरोग्याचं खऱ्या अर्थानं पॉवरहाऊस.
लाल फळेही शरीरातील प्रत्येक नसांचे आरोग्य चांगले ठेवून आपले हृदय मजबूत राहण्यासाठी सहाय्यकारक असतात. लाल फळांमध्ये अँटिऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि काही नैसर्गिक गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तप्रवाह वाढविण्यासाठी मदत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फळांची चव खूपच चांगली लागते. ही फळ हृदय व आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यासंबंधी अतिशय फायदेशीर असतात. ही फळे आपण कच्ची किंवा सॅलेड स्वरूपात घेऊ शकतो. ह्या फळांचा आपण ज्यूस करून देखील पिऊ शकतो.
लाल रंगाची फळे ही फक्त दिसायला सुंदर नसतात तर ते अँटिऑक्सिडंटचा एक मोठा पावरहाऊस देखील असतात. ही फळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यापासून ते शरीराचा रक्तदाब नियंत्रित करण्यापर्यंत सर्वच प्रकारे आपल्या हृदयाला सदैव संरक्षण देण्याचेच काम करत असतो. चला तर मग शरीरातील नसा मजबूत करणाऱ्या आणि हृदयाचे नैसर्गिक संरक्षण करणाऱ्या ह्या लाल फळांची माहिती घेऊया.
6) कलिंगड:
कलिंगड (Watermelon) थेट नसा स्वच्छ करत नाही, पण ते रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारायला मोठी मदत करत असते. कलिंगडामध्ये L-Citrulline नावाचं नैसर्गिक घटक असते. हा घटक शरीरात जाऊन Nitric Oxide वाढवतो. त्यामुळे रक्तवाहिन्या रिलॅक्स होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. कलिंगडामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक असल्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो, कलिंगडात 90% पेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे किडनी नीट काम करते. रक्तातील घाण बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे नसा-रक्तवाहिन्यांवरचा भार कमी होतो.
7) गाजर:
रक्तवाहिन्या मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. गाजरात बीटा-कॅरोटीन भरपूर असते. हे शरीरात जाऊन Vitamin A मध्ये बदलतं त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साठणारी घाण (कोलेस्टेरॉल, फॅट) कमी होण्यास मदत होते. गाजरात Vitamin B, Potassium आणि Antioxidants असतात. हे नसा बळकट ठेवतात, नसा कमकुवत होणं टाळतात. नसा मजबूत होतात. हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या कमी होण्यास मदत होते.
गाजर नसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गाजरात बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे नसांना पोषण देतात आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, सूज कमी होते आणि नसांमध्ये होणारी कमजोरी टाळण्यास मदत होते. नियमितपणे गाजर खाल्ल्याने नसांचे कार्य चांगले राहते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.
8) टोमॅटो:
टोमॅटोमध्ये Lycopene नावाचं शक्तिशाली Antioxidant असते. हे रक्तवाहिन्यांमध्ये साठणारा वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि नसा मजबूत आणि सुरक्षित राहतात. टोमॅटोमध्ये Vitamin B6, Folate आणि Vitamin C असतात. हे नसा बळकट करतात. झिणझिण्या, जळजळ, सुन्नपणा कमी होण्यास मदत होते. काही संशोधनांनुसार टोमॅटो रक्त पातळ ठेवायला मदत करते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. मेंदू, हृदय आणि नसा यांना ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळतो. रक्तप्रवाह सुधारतो. सूज आणि दाह कमी करतो. टोमॅटोमधील Antioxidants मुळे रक्तवाहिन्यांची सूज कमी होते. BP आणि हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते.
9) डाळिंब:
डाळिंब रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. डाळिंबात Polyphenols आणि Antioxidants भरपूर असतात. हे रक्तातला वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करते. रक्तवाहिन्यांमध्ये फॅट साचू देत नाहीत त्यामुळे ब्लॉकेजचा धोका कमी होतो. नसा मजबूत आणि सुरक्षित ठेवते. डाळिंबातील Vitamin B, Potassium, Iron मोठ्या प्रमाणात असते. हे नसा मजबूत करतात. रक्तप्रवाह (Blood Circulation) सुधारतो.
डाळिंबात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असल्यामुळे ते रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते आणि त्यामुळे नसांचे आरोग्य मजबूत ठेवण्यास फायदा होतो. आरोग्य तज्ञांच्या मते डाळिंब रक्त पातळ ठेवायला मदत करते. हृदय, मेंदू आणि नसा यांना ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळतो. BP नियंत्रित ठेवायला उपयोगी पडते. सूज, दाह आणि ऑक्सिडेशन कमी करते. Antioxidants मुळे रक्तवाहिन्यांची सूज कमी होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
10) स्ट्राबेरी:
स्ट्राबेरी रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते व लवचिक ठेवते. स्ट्रॉबेरीत Antioxidants (विशेषतः Anthocyanins) भरपूर प्रमाणात असते. हे वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करायला मदत करते. रक्तवाहिन्यांत फॅट साचणं कमी करते. त्यामुळे ब्लॉकेजचा धोका कमी होतो. स्ट्राबेरीमध्ये Vitamin C, Folate (B9) आणि मॅग्नेशियम असते. हे नसा मजबूत ठेवते. रक्तप्रवाह सुधारतो. स्ट्रॉबेरी रक्तातील दाह (inflammation) कमी करते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. हृदय, मेंदू आणि नसा यांना ऑक्सिजन नीट मिळतो. स्ट्रॉबेरीमधील Antioxidants मुळे रक्तवाहिन्यांची सूज कमी होते. BP आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते.
11) चेरी:
चेरी (Cherry) हे एक छोटे पण खूप शक्तिशाली असे फळ आहे. चेरीमध्ये असलेले पोषक घटक नसांचे (Nerves) आणि रक्तवाहिन्यांचे (Blood Vessels) आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात.
- अँटिऑक्सिडंट्सने भरपूर: चेरीमध्ये Anthocyanins आणि Vitamin C मोठ्या प्रमाणात असतात.
हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करते, त्यामुळे नसांना होणारे नुकसान कमी होते. - रक्ताभिसरण सुधारते: चेरी खाल्ल्याने रक्त प्रवाह (Blood circulation) सुधारतो.
रक्त व्यवस्थित फिरले की नसांवर ताण कमी होतो आणि नसा निरोगी राहतात. - सूज (Inflammation) कमी करते: चेरीमध्ये नैसर्गिक Anti-inflammatory गुणधर्म असतात.
यामुळे शरीरातील आणि नसांमधील सूज कमी होते. - ब्लड प्रेशर कंट्रोल: चेरीमध्ये Potassium असते. हे Blood Pressure नियंत्रणात ठेवते, त्यामुळे नसांवर होणारा दबाव कमी होतो.
- मेंदू आणि नसांना बळकटी: चेरीमधील पोषक घटक नसांच्या सिग्नलिंगला सुधारतात, त्यामुळे मेंदू आणि शरीरातील नर्व्हस सिस्टीम मजबूत होते.
- कसा वापर करावा? रोज 7–10 चेरी खाणे, चेरीचा ताजा ज्यूस पिणे किंवा फळांच्या सलाडमध्ये वापरणे.
- टीप: जास्त प्रमाणात खाऊ नये, विशेषतः डायबेटीस असलेल्या लोकांनी मर्यादित प्रमाणात खावे.
12) रास्पबेरी:
रास्पबेरी (Raspberry) हे अतिशय पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात जे नसांचे (Nerves) आणि रक्तवाहिन्यांचे (Blood Vessels) आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
- शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स: रास्पबेरीमध्ये Vitamin C, Quercetin आणि Ellagic Acid असतात. हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात, त्यामुळे नसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.
- रक्ताभिसरण सुधारते: रास्पबेरी खाल्ल्याने रक्ताचा प्रवाह (Blood Circulation) सुधारतो. यामुळे शरीरातील प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळते.
- सूज कमी करते: रास्पबेरीमध्ये नैसर्गिक Anti-Inflammatory गुणधर्म असतात. हे शरीरातील आणि नसांमधील सूज कमी करण्यास मदत करतात.
- मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम मजबूत: रास्पबेरीमध्ये असलेले Vitamin B आणि Magnesium नसांना मजबूत करतात आणि नर्व्ह सिग्नलिंग सुधारतात.
- हृदय आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण: रास्पबेरीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असतात. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. (12 Natural Foods That Help Support Healthy Nerves and Blood Circulation)
- कसा वापर करावा? रोज 6–8 ताज्या रास्पबेरी खा. स्मूदी किंवा फ्रूट सलाडमध्ये घाला. रास्पबेरी ज्यूस किंवा दह्यासोबत खा.
- टीप: जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते, त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
निष्कर्ष (Conclusion):
नसांचे आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि काही नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरू शकते.
FAQs:
1. नसा कमजोर होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत?
नसा कमजोर होण्याची प्रमुख कारणे म्हणजे चुकीची जीवनशैली, पोषक घटकांची कमतरता, मानसिक ताणतणाव, अपुरी झोप, जास्त फास्ट फूड खाणे आणि कमी पाणी पिणे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होऊ शकते आणि नसांवर ताण येतो.
2. नसा कमजोर झाल्याची लक्षणे कोणती असतात?
हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या येणे, मुंग्या येणे, स्नायूंमध्ये कमजोरी, चालताना तोल जाणे, वारंवार थकवा येणे आणि झोप नीट न लागणे ही नसा कमजोर झाल्याची सामान्य लक्षणे असू शकतात.
3. नसा मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी उपयुक्त आहेत?
नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, ताणतणाव कमी ठेवणे आणि भरपूर पाणी पिणे या सवयी नसा आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
4. लाल रंगाची फळे नसांच्या आरोग्यासाठी का फायदेशीर असतात?
लाल रंगाच्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि नैसर्गिक घटक भरपूर असतात. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात, सूज कमी करतात आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य मजबूत ठेवण्यास मदत करतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली?
हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जरूर शेअर करा. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीकरिता आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Disclaimer: प्रिय वाचकांनो, हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. हा कोणत्याही प्रकारे वैद्यकीय मताचा पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे. 24