Heart Attack Risk in Winter 2025
Heart Attack Risk in Winter 2025: थंडीच्या दिवसांमध्येच हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? कशी घ्याल काळजी? जाणून घ्या सर्व माहिती

हिवाळ्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात घट झाल्याने हृदयावरचा दाब वाढतो आणि ब्लड सर्कुलेशन कमी प्रमाणात होते, त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन मिळण्याची कमतरता निर्माण होते. जसजसं तापमानात घट होऊ लागते तसतसं आपले शरीर आवश्यक अवयवांचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी प्रतिसाद देणारे दल सक्रिय करते. त्यामुळे थंडीमध्ये हृदयविकाराचा धोका वाढण्याची संभावना जास्त असते.

Heart Attack Risk in Winter 2025: काही जणांसाठी हिवाळा (Winter) हा ऋतू अतिशय आनंदीदायी असतो. हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात (Temperature) घट होते आणि त्याचे धोकेही काही कमी नसतात. हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात घट होताच आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होण्यास सुरुवात होते. कारण नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचे एक ठराविक तापमान असते आणि ते तापमान संतुलित असते. थंडीमुळे जसजसे तापमान कमी होऊ लागते तसतसे आपले शरीर आवश्यक अवयवांचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी नेहमीच प्रतिसाद दल सक्रिय करते. आणि यातूनच हृदयविकार (Heart Disease) होण्याचा धोका वाढण्याचे प्रमाण जास्त असते.

Heart Attack Risk in Winter 2025

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंडीमुळे हृदयाशी संबंधित असणाऱ्या आजारांच्या धोक्याचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे पहाटे 4 ते 10 ह्या वेळेमध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. कारण या वेळेत शरीराचा रक्तदाब (Blood Pressure) नैसर्गिकरित्या वाढत असतो. हिवाळ्यात थंडीमुळे जसजशी तापमानात घट होते तसतसे हार्ट अटॅक (Heart Attack) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असते.

अधिक वाचा: हिवाळ्यात आरोग्याची कशी घ्याल काळजी? संपूर्ण माहिती वाचा.

Heart Attack Risk in Winter 2025: सध्या हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे आणि दिवसागणिक 10 तरी लोकांचा मृत्यू हा हार्ट अटॅक (Heart Attack) किंवा हृदयाशी संबंधित आजाराने होत असेल. हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात (Temperature) अचानक घट झाल्याने तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात घट झाल्याने तुमचे हृदय आणि रक्ताभिसरण हे प्रभावित होत असते. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक (Heart Attack), हार्ट फेल्युअर (Heart Failure), हार्ट स्ट्रोक (Heart Stroke) आणि उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रास होण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात असते.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात होणारी घट यामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल हे नेहमीच होत असतात. हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे तापमानात घट झाल्याने आपल्या शरीराचे जे ठराविक तापमान असते त्यात देखील घट होत असते हे ठराविक तापमान कायम ठेवण्यासाठी आपले शरीर संरक्षणात्मक व्यवस्थापन म्हणून कॅटेकोलामाईन्सची पातळी वाढवत असते. ह्या होणाऱ्या आपल्या शरीरातील शारीरिक बदलामुळे ब्लडप्रेशरचे प्रमाण वाढते. आणि ह्याच कारणास्तव हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याची जोखीम अनेक पटींनी वाढते. ही जोखीम मुख्यत्वे करून हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंड हवामानमुळे तापमानात घट होते आणि हृदयावर अधिक ताण पडतो. यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि शरीराभोवती रक्त परिसंचलन होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे हृदयातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते आणि हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पंप करण्यासाठी अतिरीक्त असे कठोर परिश्रम करण्याकरिता अधिकचा ताण घ्यावा लागतो. हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात घट होताच शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करते. शरीरामध्ये झालेल्या याबद्दलमुळे शरीरातील नसा आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तदाबात वाढ होते. म्हणूनच हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये थंड हवामानात हृदयाची स्थिती अतिशय खराब होते ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात सकाळच्या वेळी छातीत अचानक दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात ही लक्षणे हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात. इतर ऋतुमानांच्या दिवसांच्या तुलनेत हिवाळ्यात थंड हवामानामुळे तापमानात घट झाल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त वाढत असते, याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील रक्त जाड होणे. शरीरातील रक्त जाड झाले की रक्तप्रवाह हा सुरळीत होत नाही आणि ह्याच कारणाने हृदयावर अतिरिक्त ताण येतो. तसेच हिवाळ्यात खाण्यापिण्यात होणारे बदल आणि शारीरिक हालचाल कमी अशा शरीरात होणारे बदलही हार्ट अटॅक साठी कारणीभूत ठरू शकतात.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात घट झाल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तपेशी आकुंचन पावतात त्यामुळे रक्तदाब वाढतो. रक्त जाड होऊ लागते तेव्हा आपल्या शरीरातील रक्त गरजेपेक्षा जास्त जाड होते त्यावेळेस शरीरातील रक्ताचा प्रवाह मंदावतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारखे गंभीर आजारांचा धोका जास्त प्रमाणात वाढतो. रक्त गोठणे ही खूपच वाईट प्रक्रिया नाही. शरीरास कोणतीही जखम झाल्यावर रक्तस्त्राव थांबण्यासाठी ती आवश्यक असते. परंतु शरीरास कोणतीही जखम नसताना गरजेपेक्षा जास्त रक्त जाड झाल्यास ते अतिशय जीवघेणी ठरू शकते.

अधिक वाचा: थंडीमध्ये सुरू करा हा व्यवसाय, आणि महिन्याला कमवा 50,000 रुपये

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात रक्त जाड होण्यामागील कारणे:

  • पाणी कमी प्रमाणात पिणे.
  • रक्तवाहिन्या आकुंचन पावणे.
  • रक्तदाब वाढणे.
  • शारीरिक हालचाली कमी होणे.
  • घाम कमी येणे.
  • जास्त चरबीयुक्त आहार हिवाळ्यात घेणे.
  • विटामिन डी ची कमतरता असणे.
  • जास्त कोलेस्ट्रॉल आणि खराब आहार.
  • मानसिक ताण जास्त घेणे.
  • गर्भनिरोधक गोळ्या आणि हार्मोन थेरपी यांवरील औषधे घेणे.
  • गर्भधारणा आणि बाळंतपण झाल्यानंतरचा काळ.
  • डायबिटीस, लठ्ठपणा, हृदयविकार किंवा स्ट्रोक असे पूर्वी झालेले आजार.
  • धूम्रपान आणि दारू जास्त प्रमाणात सेवन करणे.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंडीमुळे रक्त जाड होण्यापासून कसा बचाव करावा:

  • फळे, भाज्या, नट्स, होल ग्रेन्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले पदार्थ नियमित आहारात घ्यावेत.
  • हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि रक्त जाड होऊ लागते. दिवसभरात थोडे थोडे कोमट पाणी पीत राहणे गरजेचे आहे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही व रक्त जाड होण्यापासून बचाव होतो.
  • लसूण खाणे अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे रक्त पातळ राहण्यास मदत होते. लसणामध्ये ॲलिसिन असते जे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि रक्त गोठण्यापासून बचाव करत असते. नेहमी सकाळी उपाशीपोटी एक लसणाची पाकळी खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
  • थंडीमध्ये नियमित रोज सकाळी शारीरिक हालचाल करणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. बाहेर जास्त थंड हवामान असल्यास घरातच योगा किंवा हलकी स्ट्रेचिंग करणे फायदेशीर आहे. ज्यामुळे शारीरिक हालचाल केल्यास शरीर गरम राहते आणि शरीरातील रक्ताभिसरण नीट होण्यास मदत होते.
  • व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास हृदयविकाराचा धोका होण्याची संभावना अधिक असते. दररोज किमान 15 ते 30 मिनिटे उन्हात बसल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता राहत नाही आणि नसांची लवचिकताही टिकून राहते. म्हणूनच हिवाळ्यात उन्हात वेळ घालवणे आरोग्यास उत्तम आहे.

Heart Attack Risk in Winter 2025: योग्य आहार आणि शारीरिक हालचालींची कमतरता ही प्रमुख कारण:

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांचा आहार अचानक वाढला जातो. तसेच हिवाळ्यात दिवस लहान असल्याने लोक फिरणं कमी करतात, व्यायामाचे प्रमाण देखील कमी होतं. यामुळे हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी प्रमाणात होतात. अशामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर वाढण्याचे प्रमाण अधिक असते. इतर ऋतून पेक्षा हिवाळ्यात बऱ्याच जणांचे वजन वाढते. उन्हाळ्यामध्ये शारीरिक हालचालींमुळे घाम येतो आणि येणाऱ्या या घामामुळे सोडियम व पाणी शहराबाहेर पडत असते. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शारीरिक हालचाली कमी प्रमाणात झाल्यामुळे सोडियम आणि पाणी शरीराबाहेर टाकले जात नाही. ह्या कारणास्तव रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, परिणामी हृदयावरचा दाब वाढला जातो आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

Heart Attack Risk in Winter 2025: वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात ओट्स, फैटी फिश (ज्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते), नट्स आणि सीड्स (बादाम, अक्रोड, चिया सीड आणि आळशी) लसुन आणि बेरीज (ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी) यांचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते आणि ब्लडप्रेशर आणि ब्लड शुगर देखील कमी करण्यास मदत होते.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात कोणत्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो:

Heart Attack Risk in Winter 2025: यापूर्वी ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आला आहे तसेच हृदयविकार असलेल्या लोकांना हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी हिवाळ्यात अतिशय सावधानपूर्वक काळजी घेणे गरजेचे असते. तसेच ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींना देखील हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. याशिवाय हायपरटेन्शन चा त्रास असणाऱ्या व्यक्तींना देखील हिवाळ्यात विशेष करून काळजी घेणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची संभावना नाकारता येत नाही, त्यामुळे वृद्ध व्यक्तीनी देखील हिवाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Heart Attack Risk in Winter 2025: हृदयविकाराची लक्षणे खालील प्रमाणे:

  • छातीच्या मध्यभागी अस्वस्थ करणाऱ्या वेदना निर्माण होणे.
  • एकाएकी थंड वातावरणात देखील जास्त घाम येणे.
  • अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागणे.
  • छातीच्या मध्यभागी अस्वस्थता होण्याबरोबरच श्वास घेण्यात अडचण येणे.
  • हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात वेदना किंवा अस्वस्थता निर्माण होणे.
  • काही वेळा मळमळ जाणवणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होणे.
  • चक्कर येणे किंवा डोके जड होणे कधीकधी व्यक्ती यामुळे बेशुद्ध देखील होऊ शकतो.

Heart Attack Risk in Winter 2025: हृदयविकाराच्या बचावापासून काय काळजी घ्यावी:

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रथम योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात भूक जास्त प्रमाणात लागते त्यामुळे खाण्यावर स्वतः नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेष करून ज्यांना हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते, अशा लोकांनी विशेष काळजी घेऊन हिवाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवावे. हिवाळ्यात थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं हे फायदेशीर आहे. हिवाळ्यात जास्त थंड वातावरणात घराबाहेर पडणे टाळावे. हिवाळ्यात जास्त थंड वातावरणात देखील घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडावे.

Heart Attack Risk in Winter 2025: हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात यामुळे शारीरिक हालचाली करणे, नियमित व्यायाम करणे आणि योगा करणे ह्याकडे विशेष करून लक्ष द्यावे. कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ आहारातून कमी करावे. तेलाचा आणि तुपाचा कमीत कमी वापर करावा. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. हंगामी पालेभाज्या आणि फळे नियमित खावीत. ड्रायफूटचेही सेवन हिवाळ्यामध्ये योग्य प्रमाणात करावे. तसेच हिवाळ्यात उबदार कपडे घालावे. व्यायाम करण्यापूर्वी शरीराला वार्म-अप करावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषध घ्यावीत. नियमित पुरेशी झोप घ्यावी. हिवाळ्यात ताणतणाव टाळावा. नियमित कोमट पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *