Snake Bite In Marathi 2026: सर्पदंश किंवा विषबाधा सारखी घटना घडल्यास रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गोंधळून जातात अशा वेळेस रुग्णाची कशी काळजी घ्यावी हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
प्रस्तावना (Introduction):
साप चावणे (सर्पदंश) ही एक गंभीर आणि जीवघेणी आपत्कालीन परिस्थिती असू शकते. विशेषतः ग्रामीण भागात, शेती किंवा जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना याचा धोका अधिक असतो. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास सर्पदंशातून रुग्णाचा जीव वाचवता येतो. मात्र, अनेकदा माहितीच्या अभावामुळे चुकीचे उपाय केले जातात आणि परिस्थिती अधिक गंभीर बनते.
या लेखामध्ये आपण सर्पदंशाची लक्षणे, योग्य प्रथमोपचार, टाळावयाच्या चुका आणि आवश्यक काळजी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सर्पदंश म्हणजे काय:
- विषारी साप चावण्याला सर्पदंश असे म्हणतात. सर्पदंश (Snake Bite) ही सापाला इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी असलेली स्वरक्षक रचना होय. सर्पदंशाचा व्यक्तीच्या मज्जासंस्था, हृदय आणि रक्त उत्पादक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. यासाठी वेळेवर उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा ते रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकते. भारतामध्ये असे आढळून आले आहे की दरवर्षी सर्पदंशाची 1 लाख प्रकरणे होतात आणि त्यातील 45 ते 50 हजार मृतांची नोंद होते.
- आपल्या भारतातील ग्रामीण आणि जंगली भागात तसेच जंगलाच्या परिसराच्या जवळ राहणाऱ्या अनेकांना विषारी साप चावण्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. सर्पदंश होणे ही एक वास्तविक आणि कधीकधी त्या व्यक्तीचा प्राणघातक अशी आपत्कालीन परिस्थिती देखील असते. दरवर्षी आपल्या भारतामध्ये हजार लोकांचे सर्पदंशामुळे मृत्यू होत असतात. यापैकी बऱ्याच व्यक्तींचे मृत्यू योग्य जागरूकता आणि त्या रुग्णाला वेळेवर वैद्यकीय उपचार देणे यांद्वारे टाळता येऊ शकतात.
अधिक वाचा: गोंदिया येथे बिबट्याचा हल्ला: 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, कारणे आणि उपाय

विषारी सापांच्या जाती आणि त्यांची नावे:
- भारतामध्ये विषारी सापांच्या पाच प्रमुख जाती आहेत. घोणस, मण्यार, चापडा, फुरसे आणि समुद्रसर्प अशा ह्या पाच विषारी सापांच्या प्रमुख जाती आहेत. तसेच या पाच विषारी सापांच्यासोबतच पिवळसर, तपकिरी, गव्हाळ, करड्या आणि काळ्या रंगाचा विषारी नागही आढळून येतो. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हे साप मनुष्यवस्तीत येण्याचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे.
- विषारी साप चावणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. तसेच विषारी साप चावणे ही अपात्कालीन परिस्थिती मानली जाते. ह्या काळात घाबरून जाणे चुकीचे ठरते, तेव्हा घाबरून न जाता योग्य उपाययोजना कशा करता येतील हे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात सुद्धा साप चावण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. सर्वच साप हे विषारी नसतात काही साप हे बिनविषारी असतात.
अधिक वाचा: जिओने 2026 अगोदरच आणले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन!

सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार करणे आवश्यक:
- जर तुम्हाला शेतात, घराच्या आजूबाजूला, घरामध्ये किंवा इतरत्र वावरताना कुठेही अचानक साप दिसला तर काय कराल? सर्वात प्रथम तुम्ही घाबरून जाऊ नका. जेवढे होईल तेवढे शांतता ठेवा. कारण शांत राहून परिस्तिथी हाताळणे गरजेचे आहे. साप जर अचानक तुमच्यासमोर आला तर पळून जाऊ नका हळूहळू त्याच्या ठिकाणापासून दूर होण्याचा प्रयत्न करा आणि सापाला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. कारण जर एखादा साप चपळ असल्यास तो भीतीपोटी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी तुमच्यावर हल्ला देखील करू शकतो. शक्यतो साप केव्हाही मनुष्यावर लगेच हल्ला करत नाही.
- उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ झाल्याने गारव्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये बिळामध्ये पाणी भरल्याने साप निवाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. अशा वेळेस साप घराबाहेरच्या भिंती लगत किंवा घराच्या आजूबाजूच्या आवारात बाहेर पडलेले दिसतात. अशा वेळेस जर चुकून एखाद्या सापाने दंश केल्यास घाबरून जाऊ नये. तो साप कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला मारणे किंवा तो निघून गेला असल्यास त्या सापाची शोधाशोध करणे यात वेळ न घालवता काही प्रथमोपचार करणे आवश्यक असते. आणि त्या रुग्णाला तातडीने सरकारी रुग्णालयात हलवल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार होऊ शकतात.
सर्पदंश झाल्यास गोंधळून जाऊ नये:
साप चावल्यास किंवा विषबाधा झाल्यास रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गोंधळून जातात. अशा वेळेस काय करावे हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या लक्षात येत नाही. यामुळे काही वेळेस रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. अशा वेळेस काय करू नये आणि काय करावे याचे भान ठेवून त्या रुग्णास प्रथमोपचार देऊन त्वरित त्या रुग्णास रुग्णालयात घेऊन जाणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. विषारी साप चावल्यास त्या रुग्णाच्या शरीरात नेमके काय बदल घडतात आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्पदंश झाल्यास लक्षणे आणि योग्य उपाय:
| लक्षणे | काय करावे? |
| चावलेल्या जागी सूज, वेदना | त्या भागाला हलवू नका, स्थिर ठेवा |
| दोन दातांच्या खुणा दिसणे | जखम स्वच्छ पाण्याने हलके धुवा |
| चक्कर येणे / अशक्तपणा | रुग्णाला झोपवून ठेवा, डोके स्थिर ठेवा |
| श्वास घेण्यास त्रास | त्वरित रुग्णालयात हलवा |
| उलटी / मळमळ | रुग्णाला काहीही खायला-प्यायला देऊ नका |
| रक्तस्राव (हिरड्या, डोळे, लघवी) | तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा |
| डोळ्यांसमोर धूसर दिसणे | रुग्णाला शांत ठेवा, हालचाल टाळा |
| हात-पाय सुन्न होणे | प्रभावित भाग स्थिर ठेवणे अत्यावश्यक |
| जीभ जड होणे / बोलण्यात अडचण | Emergency treatment घ्या |
| तीव्र तहान / ताप | ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या |
वरील लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता तात्काळ रुग्णाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाणे अत्यावश्यक आहे.
साप चावल्यास कसे ओळखाल आणि कोणती लक्षणे आढळून येतात.
- सर्पदंश (Snake Bite) झाल्यास चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी होणे, चावलेल्या जागेवर सूज येणे, रक्तस्राव होणे, लघवीतून-डोळ्यातून किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, मळमळ होणे, पोट दुखी होणे, डोकेदुखी होणे, कमी रक्तदाब होणे, तीव्र प्रकारची तहान लागणे, ताप येणे, अस्पष्ट दिसणे, अशक्तपणा जाणवणे, तोंडाला वेगळाच स्वाद येणे, हात पाय कमजोर होणे, चालण्यास अस्थिरता येणे, जीभ जड झाल्यासारखे वाटणे, गळा कोरडा पडून आवाज बसणे, खांद्यांमध्ये तीव्र वेदना होणे, साप चावलेल्या ठिकाणी दोन छिद्रांसारखे चिन्ह दिसणे, साप चावलेल्या ठिकाणी सुजणे किंवा लाल होणे आणि त्या ठिकाणी आग होणे असे अनेक बदल आणि लक्षणे त्या रुग्णाच्या शरीरामध्ये दिसून येतात अशा वेळेस काही योग्य उपाययोजना केल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
- जर एखाद्या व्यक्तीस साप चावला असेल तर काय करावे? साप चावला असेल त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार देता येतील याची काळजी घ्यावी. परंतु काही वेळेला वैद्यकीय उपचार लवकर मिळणे शक्य होत नाही. त्यावेळेस साप चावल्यावर प्रथम काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या सापांच्या विषावर उपचार केले जाऊ शकतात, असे वैद्यकीय शास्त्रातील आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.
सर्पदंश (Snake Bite) झाल्यास काय करू नये:
| चुकीच्या गोष्टी | का टाळावे? |
| जखम कापणे / चिरणे | रक्तस्राव वाढतो, धोका वाढतो |
| विष शोषण्याचा प्रयत्न | उपयोग नाही, उलट infection होतो |
| घट्ट दोरी बांधणे (Tourniquet) | रक्तपुरवठा थांबतो, tissue damage होतो |
| धावणे / पळणे | विष लवकर पसरते |
| दारू / कॉफी देणे | शरीरावर वाईट परिणाम होतो |
घरगुती उपाय किंवा अप्रमाणित पद्धती वापरण्याऐवजी नेहमी प्रशिक्षित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्पदंश (Snake Bite) झाल्यास कोणते प्रथम उपचार करावेत:
- सर्पदंश झालेली जागा हलवू नका स्थिर ठेवा.
- साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्या आणि त्या व्यक्तीला शांत करा.
- स्वतः घाबरू नका किंवा इतर लोकांमध्ये भीती पसरवू नका.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चालत किंवा धावत रुग्णालयात नेऊ नका.
- सर्पदंश झालेल्या ठिकाणी स्वच्छ पाण्याने जखम धुवावी.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीने जास्त बोलणे टाळावे.
- विषारी साप जर हाताला चावला असेल तर चावलेला भाग शक्य तितका स्थिर ठेवा.
- विषारी साप जर पायाला चावला असेल तर धावू नये किंवा जोरात उड्या मारू नये.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा कॉफी किंवा दारू पाजू नये किंवा खाद्यपदार्थ खायला देऊ नये.
- सर्पदंश झालेल्या जागेवर चिरा किंवा कापू नये त्यामुळे जास्त रक्तस्राव होऊन ती व्यक्ती दगावण्याची दाट शक्यता असते.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा कारण घाबरल्यामुळे रक्तभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते.
- सर्वात प्रथम साप चावलेल्या भागावरून कापड काढून टाका किंवा त्या भागावर अंगठी, ब्रेसलेट, घड्याळ किंवा काही दागिने असतील तर तेही काढून टाका आणि जिथे साप चावला आहे त्या ठिकाणी डेटॉलने किंवा साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे.
- रुग्णालयात जाण्यापूर्वी शक्यतो फोनवरून डॉक्टरांना कळवावे जेणेकरून ते तात्काळ मदतीस उपलब्ध राहतील.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला एखादा आजार असल्यास तो डॉक्टरांना सांगावा.
अधिक वाचा: “मुंबई, दिल्ली सोडा, कर्ज झाले तरी चालेल…”, भारतीय इंजिनिअरची पोस्ट चर्चेत
सर्पदंश (Snake Bite) कसा टाळता येईल जाणून घेऊया:
- आपल्या घराच्या भोवतालचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवा.
- आपल्या घराजवळील झाडांच्या फांद्या आणि भिंतीवरील असलेल्या मोठ्या भेगा बुजवून टाका.
- जंगलापासून जवळच्या परिसरात जवळ राहत असल्यास अंधारात देखील घराबाहेर जाताना बॅटरीचा वापर करा.
- जंगलासारख्या ठिकाणच्या परिसरात फिरताना पायात कायम बूट घाला.
- अडगळीची जागा, तलाव, नदी, दगड विटांच्या ढिगार्यातून जाताना येताना बॅटरी आणि काठी सोबत ठेवा.
- शेतातून किंवा जंगलातून जाताना येताना पायवाटेचा वापर करावा.
- मोठमोठ्या वाढलेल्या गवतातून जाणे येणे टाळा.
- घरातील आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरातील कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट वेळच्यावेळी लावा.
- समुद्रकिनारी चौपाटीवर फिरताना अनेकदा समुद्रसर्प शांतपणे पडलेले दिसतात, समुद्रसर्प मेलेले आहेत असे आपण समजून हात लावण्याचा प्रयत्न करू नका.
एखाद्या व्यक्तीला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले तर सर्पदंशातूनही वाचवता येते.
Source: WHO
माझा सल्ला:
माझ्या मते, सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत घाबरण्यापेक्षा शांत राहून योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वेळा लोक घाईघाईत चुकीचे उपाय करतात, जसे की जखम कापणे किंवा घरगुती उपाय वापरणे जे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
म्हणूनच, प्रत्येकाने सर्पदंशाबद्दल प्राथमिक माहिती ठेवणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात.
निष्कर्ष (Conclusion):
सर्पदंश ही एक गंभीर पण योग्य वेळी उपचार मिळाल्यास टाळता येण्यासारखी परिस्थिती आहे. यासाठी आवश्यक आहे ती जागरूकता, योग्य माहिती आणि तत्काळ वैद्यकीय मदत. साप चावल्यास घाबरू नका, चुकीचे उपाय करू नका आणि शक्य तितक्या लवकर रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
लक्षात ठेवा: योग्य माहिती आणि योग्य वेळी केलेली कृती एखाद्याचा जीव वाचवू शकते.
FAQs:
1) साप चावल्यास सर्वप्रथम काय करावे?
रुग्णाला शांत ठेवा, चावलेल्या भागाला हलवू नका आणि तात्काळ रुग्णालयात घेऊन जा.
2) सर्व साप विषारी असतात का?
नाही, सर्व साप विषारी नसतात. परंतु कोणताही साप चावल्यास धोका टाळण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
3) साप चावल्यावर जखम कापावी का?
नाही, जखम कापणे किंवा चिरणे अत्यंत धोकादायक आहे आणि टाळावे.
4) साप चावल्यावर किती वेळात उपचार घ्यावेत?
शक्य तितक्या लवकर, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो.
5) घरगुती उपाय उपयोगी पडतात का?
नाही, सर्पदंशावर घरगुती उपाय प्रभावी नसतात. फक्त वैद्यकीय उपचारच आवश्यक आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली?
हा महत्त्वाचा लेख आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती कोणाचाही जीव वाचवू शकते. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीकरिता आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा.
Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये दिलेली माहिती ही सामान्य जनजागृती व शैक्षणिक उद्देशाने देण्यात आलेली आहे. साप चावणे ही अत्यंत गंभीर व जीवघेणी आपत्कालीन परिस्थिती असू शकते. या लेखातील उपाय, काळजी किंवा माहिती यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय म्हणून करू नये. कोणालाही साप चावल्यास तात्काळ जवळच्या सरकारी/खासगी रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाणे अत्यावश्यक आहे. घरगुती उपाय, झाड-पाला, तंत्र-मंत्र, जखम कापणे, विष शोषून काढणे अशा कोणत्याही अप्रमाणित पद्धतींवर विश्वास ठेवू नका. अशा चुकीच्या उपायांमुळे रुग्णाची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. कृपया नेहमी प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव असून आरोग्य विषयांवर संशोधन करून लेखन करतो. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे.