Lucky Mulank Of 2026
Lucky Mulank Of 2026: 2026 मध्ये हे ‘4’ मूलांक असलेल्यांचे नशीब चमकणार. सूर्यदेवाची राहणार विशेष कृपा, नोकरी, व्यवसायात आणि शेतीत प्रगतीच प्रगती!

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्र हे देखील ज्योतिष शास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची पडताळणी करता येते. अंकशास्त्रामध्ये संख्यांच्या मदतीने त्या व्यक्तीच्या येणाऱ्या भविष्याची, कारकीर्द, आरोग्य, आर्थिक परिस्थिती यांची माहिती दिली जाते.

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्र म्हणजे अंकांच्या आधारे माणसाच्या जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. अंकशास्त्रामध्ये देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची पडताळणी करता येते. अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या पुढील भविष्याची माहिती दिली जाते. अंकशास्त्रात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या सर्व नवग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे गणना केली जाते. अंकशास्त्रानुसार वरील सर्व नऊ ग्रहांना 1 ते 9 अशा संख्या दिलेल्या आहेत. तो ग्रह कोणत्या संख्येने प्रभावित होतो यावर बरच काही अवलंबून आहे.

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्र मध्ये त्या व्यक्तीची जन्मतारीख, नावातील अक्षरे आणि त्यांच्यातील संबंधित अंक यांच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव, भविष्य, कारकीर्द, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नशीब यांबद्दलचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रामध्ये जन्मतारीख आणि नावातील अक्षरांना अंकी मूल्य देऊन त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व भविष्य आणि जीवनातील मार्ग समजून घेतले जातात.

Lucky Mulank Of 2026

अधिक वाचा: नवीन वर्षात तुमच्या घरात येईल पैसाच पैसा? जाणून घ्या सोप्या वास्तू टिप्स

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 या अंकांचा वापर केला जातो, जे विविध ग्रहांशी जोडलेले आहेत. अंकशास्त्रात विशेषतः गणिताचे काही नियम वापरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे मूल्यमापन केले जाते आणि त्या व्यक्तीच्या भावी जीवनाबद्दल अंदाज बांधले जातात. अंकशास्त्र म्हणजे अंकांच्या सहाय्याने व्यक्तीच्या जीवनाचे गुपित समजून घेण्याचे शास्त्र होय.

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्र हे तीन प्रकारच्या पद्धतीने व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करत असते. मूलांक, भाग्यांक आणि नामांक असे हे तीन प्रकार आहेत. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक हा काढला जातो आणि त्या व्यक्तीच्या भविष्याची मांडणी केली जाते.

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्राचे मुख्य चार प्रकार आहेत:

1) मूलांक (Root Number): व्यक्तीच्या जन्मतारखेच्या अंकाची बेरीज करून मिळणारा एक अंकी अंक म्हणजेच मूलांक होय. (उदा. 15 तारखेला जन्म = 1 + 5 = 6). मूलांक हा व्यक्तीचे मुख्य व्यक्तिमहत्व दर्शवतो.

2) भाग्यांक (Destiny Number): पूर्ण जन्मतारीख म्हणजेच जन्मदिवस, जन्म महिना, आणि जन्म वर्ष या सर्वांची बेरीज करून मिळणारा एक अंकी अंक म्हणजेच भाग्यांक होय. भाग्यांक हा त्या व्यक्तीच्या जीवनाचा मार्ग आणि उद्देश्य सांगतो.

3) नामांक ( Name Number): व्यक्तीच्या नावातील अक्षरांना विशिष्ट अंकीय मूल्य देऊन त्या अंकांची बेरीज करून मिळणारा एक अंकी अंक म्हणजेच नामांक होय. यातून त्या व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव समजून घेतला जातो.

4) शुभ अंक (Lucky Number): व्यक्तीसाठी अनुकूल असलेला अंक. जो त्या व्यक्तीसाठी शुभ मानला जातो.

Lucky Mulank Of 2026: मूलांक ही तुमची जन्मतारीख आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 3 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 3 असेल परंतु जर तुमचा जन्म 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 असेल कारण 2 आणि 7 यांची बेरीज केल्यास 9 हा अंक मिळतो. संपूर्ण जन्मतारीख जोडून भाग्यांक काढला जातो आणि नामांक देखील काढला जातो. नावाचे अक्षर म्हणजेच स्पेलिंग बदलून नाव क्रमांकात बदल करता येतो. पण मूलांक आणि भाग्यांकात कोणताही बदल करता येत नाही.

मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेवरून येणारा एक-अंकी अंक होय, जो व्यक्तीच्या मूळ स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि जीवनातील मुख्य वैशिष्ट्ये दर्शवतो. मुलांकाचे महत्त्व, मूलांक हा अंक तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो आणि अंकशास्त्रामध्ये (Numerology) याला खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण तो तुमच्या जीवनातील प्रमुख गुणधर्म, क्षमता आणि आव्हाने दाखवतो.

अधिक वाचा: नवीन वर्षात तुमच्या घरात येईल पैसाच पैसा? जाणून घ्या सोप्या वास्तू टिप्स

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्र कशापद्धतीने काम करते?

  • प्रत्येक अक्षराला आणि अंकाला विशिष्ट ऊर्जा व कंपन (Vibration) असते.
  • जन्मतारीख व नावातील अक्षरांपासून मूलांक, भाग्यांक, नामांक काढले जातात.
  • या अंकांच्या आधारावर जीवनातील चढ-उतार समजून घेतले जातात.

अंकशास्त्र काय सांगते?

  • प्रत्येक अंक विशिष्ट ग्रहाशी संबंधित असल्याने, व्यक्तीच्या मूलांक आणि भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, क्षमता आणि जीवनातील चढ-उतार समजण्यास मदत होत असते.
  • अंकशास्त्राचा उपयोग मित्र, जोडीदार निवडणे आणि जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी केला जातो.

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्राचे फायदे काय आहेत?

  • व्यक्तीला स्वतःचा स्वभाव व क्षमता ओळखण्यास मदत होते.
  • व्यक्तीला योग्य करिअर व व्यवसाय निवडण्यास मदत होते.
  • व्यक्तीला आर्थिक व वैयक्तिक निर्णय अधिक योग्य पद्धतीने घेता येतात.
  • शुभ तारखा, नाव बदल, व्यवसायाचे नाव निवडण्यासाठी उपयोगी असते.

अंकशास्त्र कुठे उपयोगी पडते?

व्यवसाय सुरू करण्यासाठी, करिअर निवडण्यासाठी, शुभ तारखा निवडण्यासाठी, लग्न, नाव बदल, कंपनी नाव ठेवताना, घर क्रमांक, मोबाईल नंबर ठरवताना असा बऱ्याच ठिकाणी अंकशास्त्र उपयोगी पडते.

अधिक वाचा: हिवाळ्यात आरोग्याची कशी घ्याल काळजी? संपूर्ण माहिती वाचा.

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्र आणि ग्रहांचा संबंध:

प्रत्येक अंक आणि ग्रहांचा एक विशिष्ट संबंध आहे. ग्रह व अंकसंख्या यांचा संबंध पुढीलप्रमाणे आहे. १- सूर्य, २- चंद्र, ३- गुरु, ४- राहू, ५- बुध, ६- शुक्र, ७- केतू, ८-शनी, ९- मंगल

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्रानुसार 2026 हे नवीन वर्ष अनेक लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. अंकशास्त्राच्या गणितानुसार 2026 मधील ग्रहांच्या हालचाली काही विशिष्ट मूलांक असलेल्यांना अतिशय अनुकूल ठरणार आहे. हे त्यांच्या उत्पन्नात, गुंतवणुकीत, भरभराटीत आणि अडकलेल्या पैशांच्या परतफेडित स्पष्टपणे अतिशय चांगले परिणाम दिसून येणार आहेत. नोकरी असो किंवा व्यवसाय ह्या मूलांक असलेल्या लोकांसाठी नवीन वर्ष 2026 हे प्रगतीचे, भरभराटीचे आणि चांगल्या आरोग्याचे जाणार आहे.

Lucky Mulank Of 2026: नवीन वर्ष 2026 हे आता सुरू झाले आहे आणि अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष सूर्यदेवाचे राज्य असणारे वर्ष आहे. कारण 2026 यांची एकूण बेरीज केल्यानंतर 10 व एक अंकी 1 हा अंक येतो, म्हणजेच 1 हा अंक सूर्याशी संबंधित आहे. म्हणूनच 2026 या नवीन वर्षी सूर्यदेवाची कृपा राहणार आहे. काही विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांसाठी हे वर्ष अतिशय उत्तम ठरणार आहे. विशेषतः सूर्याला अनुकूल ग्रह असलेले लोकांना ह्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि व्यवसायाच्या प्रगतीमध्ये मोठे यश संपादन करून देणार आहे.

Lucky Mulank Of 2026: तसेच या लोकांची रखडलेली कामे देखील यावर्षी पूर्णत्वास जाण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य या ग्रहाचे अनुकूल ग्रह मंगळ आणि गुरु आहेत. मंगळ आणि गुरु या दोन्ही ग्रहांचे अंक ज्योतिषशास्त्रानुसार 9 आणि 3 आहेत. म्हणजेच या दोन्ही जन्मांक म्हणजेच मुलांक असलेल्या लोकांसाठी हे नवीन वर्ष 2026 अतिशय चांगले जाणार आहे. तसेच जन्म क्रमांक एक आणि पाच असलेल्यांसाठीही 2026 मध्ये अतिशय उत्तम असा फायदा होऊ शकतो. चला तर मग सूर्य देवाची विशेष कृपा 2026 ह्या नवीन वर्षात कोणत्या मुलांकवर राहणार आहे हे पाहूया.

उपयुक्त माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा .

Lucky Mulank Of 2026: मूलांक 1 असलेल्या लोकांचे 2026 मध्ये चमकणार नशीब:

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 हा असतो. 1 हा सूर्याचा अंक असल्याने ह्या अंकावर सूर्याचे राज्य असते. 2026 हे वर्ष मूलांक 1 असलेल्यांसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. मूलांक 1 असलेल्यांना 2026 मध्ये आदर आणि मानसन्मान देखील मिळणार आहे. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना पद मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता यावर्षी आहे.

Lucky Mulank Of 2026

1 हा मूलांक असलेल्या लोकांचे नेतृत्व गुण आणि योग्य निर्णय यावर्षी यांना पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच सरकारी नोकरी, प्रशासन, नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना 2026 यावर्षी अतिशय चांगला असा फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगार वाढ आणि प्रतिष्ठा मिळण्याची दाट शक्यता आहे. दीर्घ काळापासून अडकलेला पैसा देखील परत मिळू शकतो. मूलांक 1 असलेले लोक यावर्षी वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकतात. 2026 ह्या नवीन वर्षात मूलांक 1 असलेल्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे.

Lucky Mulank Of 2026: मूलांक 3 असलेल्या लोकांना 2026 मध्ये मिळणार आनंदच आनंद:

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 3. 12. 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 हा असतो. 3 या संख्येचा गुरु हा स्वामी ग्रह आहे. मूलांक 3 असलेल्या लोकांना 2026 मध्ये यश आणि ओळख मिळणार आहे. मूलांक 3 असलेल्या लोकांना 2026 मध्ये त्यांच्या इच्छा पूर्ण होताना दिसणार आहेत. तसेच मूलांक 3 असलेल्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठे यश आणि भरभराट होताना दिसून येणार आहे.

Lucky Mulank Of 2026

2026 या नवीन वर्षामध्ये मूलांक 3 असलेल्या लोकांना कुटुंबाचा आधार आणि कुटुंबाकडून समाधान देखील मिळणार आहे. मूलांक 3 असणाऱ्या लोकांना शेअर बाजारात आणि लॉटरीमधून फायदा होण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिष, शिक्षण, सल्लागार, प्रशिक्षण देणारे, प्रवक्ते, मार्गदर्शन या क्षेत्रांमध्ये असलेल्यांना 2026 हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे.

Lucky Mulank Of 2026: मूलांक 5 असलेल्या लोकांना 2026 हे वर्ष अतिशय उत्तम:

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 हा असतो. 2026 हे नवीन वर्ष मूलांक 5 असलेल्या लोकांना अनपेक्षित असा आर्थिक लाभ घेऊन येईल. मूलांक 5 असलेल्या लोकांना व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि चांगला नवीन जॉब मिळण्याची दाट शक्यता आहे. मूलांक 5 असलेल्या लोकांना मीडिया, मार्केटिंग सेल्स, डिजिटल, ट्रेडिंग यामध्ये मोठे यश या नवीन वर्षात मिळणार आहे.

Lucky Mulank Of 2026

मूलांक 5 असलेल्या लोकांना उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. परंतु मूलांक 5 असलेल्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे. तसेच गुंतवणुकीमध्ये घाई करू नये. मूलांक 5 असलेल्या लोकांना नातेसंबंधांमध्ये चांगले परिणाम मिळणार आहेत. जुने गैरसमज दूर होणार आहेत, अविवाहितांसाठी लग्न योग जुळून येण्याची दाट शक्यता आहे. ह्या काळात नियमित व्यायाम आणि ध्यान करणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. योग्य निर्णय आणि संयम ठेवल्यास यश नक्कीच मिळणार आहे.

Lucky Mulank Of 2026: मूलांक 9 असलेल्या लोकांना 2026 हे वर्ष शुभ असणार आहे:

Lucky Mulank Of 2026: अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 हा असतो. 2026 हे नवीन वर्ष मूलांक 9 असलेल्या लोकांना अत्यंत शुभ असणार आहे. 2026 या नवीन वर्षात मूलांक 9 असलेल्या लोकांना त्यांच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकतो. मूलांक 9 असणाऱ्या लोकांना नोकरीत नेतृत्व करण्याची संधी मिळेल तसेच नोकरीमध्ये जबाबदारीमध्ये वाढ होईल पण त्याचबरोबर मानसन्मानही मिळेल.

Lucky Mulank Of 2026

पोलीस, संरक्षण दल, सरकारी, स्पोर्ट्स, इंजिनियर, टेक्निकल या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले यश मिळणार आहे. मूलांक 9 असणाऱ्या लोकांना यावर्षी चांगला पैसा येईल पण खर्च देखील होणार आहे. दीर्घकालीन केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नातेसंबंधांमध्ये व कुटुंबामध्ये राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. 2026 या नवीन वर्षांमध्ये तुम्हाला नियमित व्यायाम योग आणि ध्यान करणे हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 2026 हे नवीन वर्ष मूलांक 9 असलेल्यांसाठी संघर्षांबरोबरच मोठं यश देणारे वर्ष देखील आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *