Surprising Cause of High Blood Pressure 2026: तुमच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्याने आणि ताणतणाव टाळल्यामुळे तुमचा रक्तदाब नेहमी नियंत्रणात राहील असे तुम्हालाही वाटते का? जर तसे असेल तर, न्यूझीलंडमधील ऑकलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक असा शोध लावला आहे जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलू शकतो. आतापर्यंत, आपण लठ्ठपणा, मद्यपान आणि ताणतणाव हे उच्च रक्तदाबाचे कारण मानत होतो, परंतु शास्त्रज्ञांनी नवीन संशोधनात एक आश्चर्यकारक आणि वेगळाच खुलासा केला आहे.
प्रथम उच्च रक्तदाब (BP) म्हणजे काय आणि त्याबाबत महत्त्वाची माहिती आपण येथे जाणून घेवूया:
जेव्हा आपले हृदय शरीरातील इतर अवयवांना रक्त पुरवठा करण्यासाठी आकुंचन पावते, तेव्हा रक्ताचा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जो दाब पडतो, त्याला ‘ब्लड प्रेशर‘ असे म्हणतात.
उच्च रक्तदाबाचे (BP) दोन मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
जेव्हा तुम्ही BP मोजता, तेव्हा दोन आकडे दिसतात (उदा. 120/80)
सिस्टोलिक (Systolic): 120 हा वरचा आकडा. हृदय आकुंचन पावून रक्त बाहेर ढकलत असतानाचा दाब.
डायस्टोलिक (Diastolic): 80 हा खालचा आकडा. दोन ठोक्यांच्या दरम्यान जेव्हा हृदय शिथिल होते, तेव्हाचा दाब.
सामान्य प्रमाण (Normal Range)
- निरोगी व्यक्तीचा बीपी साधारण 120/80 mmHg च्या आसपास असावा.
- जर हा दाब 140/90 च्या वर गेला, तर त्याला High BP (हायपरटेंशन) म्हणतात.
- जर हा दाब 90/60 च्या खाली गेला, तर त्याला Low BP (हायपोटेन्शन) म्हणतात.
उच्च रक्तदाबाची (BP) लक्षणे:
बऱ्याचदा BP वाढल्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत (म्हणून याला ‘सायलेंट किलर’ म्हणतात), पण काही जणांना खालील त्रास होऊ शकतात:
- डोकेदुखी किंवा चक्कर येणे.
- छातीत धडधडणे.
- धाप लागणे किंवा खूप थकवा जाणवणे.
अधिक वाचा: हिवाळ्यात आरोग्याची कशी घ्याल काळजी? संपूर्ण माहिती वाचा

Surprising Cause of High Blood Pressure 2026: उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही सध्याच्या धावपळीच्या जीवनात एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका जास्त असतो. परंतु न्यूझीलंडमधील ऑकलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक असा शोध लावला आहे ज्यामुळे आता आपल्या सर्वाना वेगळा विचार करण्याची गरज आहे का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
Surprising Cause of High Blood Pressure 2026: आपण अनेकदा असे मानतो की उच्च रक्तदाबची (High Blood Pressure) मुख्य कारणे आपल्या खाण्याच्या सवयी, जास्त मीठ, ताणतणाव किंवा लठ्ठपणा आहेत, परंतु अलीकडेच न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन संशोधनात एक आश्चर्यकारक आणि वेगळाच खुलासा केला आहे जो आतापर्यंतच्या सर्व जुन्या समजुती बदलणारा आहे.
न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, केवळ आपली जीवनशैलीच नाही तर आपल्या मेंदूचा एक विशेष भाग देखील बीपी वाढण्यास जबाबदार आहे.
Surprising Cause of High Blood Pressure 2026: आपल्या मेंदूचा “लेटरल पॅराफेशियल रिजन” हा खरा सूत्रधार आहे.
लेटरल पॅराफेशियल रिजन हा मेंदूच्या ब्रेनस्टेम मधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या मेंदूच्या खालच्या भागात “लेटरल पॅराफेशियल रिजन” नावाचा एक विशेष भाग असतो. हा भाग सामान्यतः पचन, श्वासोच्छवास आणि हृदय गती यासारख्या स्वयंचलित शरीराच्या कार्यांवर नियंत्रण ठेवत असतो. तथापि, आता असे उघड झाले आहे की या भागातील काही नसा रक्तदाब वाढण्यास देखील कारणीभूत असतात.

हसण्याने आणि खोकल्याने रक्तदाब कसा वाढतो?
Surprising Cause of High Blood Pressure 2026: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सामान्य दैनंदिन क्रियाकलाप देखील रक्तदाब वाढवू शकतात. जेव्हा आपण हसतो, व्यायाम करतो किंवा मोठ्याने खोकतो तेव्हा मेंदूचा पार्श्व पॅराफेशियल हा भाग सक्रिय होतो. यामुळे रक्तवाहिन्यांमधील आकुंचन पावणाऱ्या नसा सक्रिय होतात. जेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात तेव्हा रक्तप्रवाहासाठी जागा कमी होते असते, ज्यामुळे शरीरात रक्तदाब वाढतो. ही प्रक्रिया वारंवार होत राहिल्यास, एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबासारखे जुनाट आजार देखील होऊ शकतात.
मीठ आणि अल्कोहोल हे उच्च रक्तदाबासाठी दोषी नाहीत.
Surprising Cause of High Blood Pressure 2026: आतापर्यंत, वैद्यकीय शास्त्र असे मानत होते की उच्च रक्तदाबाची मुख्य कारणे ताणतणाव, आहारात जास्त प्रमाणात मीठ, शरीराचा लठ्ठपणा आणि अल्कोहोलचे अधिक सेवन करणे हे आहेत. परंतु नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, मेंदू हा प्रत्यक्षात “नियंत्रण कक्ष” आहे. जो हृदयाचे ठोके आणि नसांच्या आकाराला सिग्नल पाठवून रक्तदाब समायोजित करतो. शिवाय, शरीरातील काही प्रथिने मेंदूला अतिसक्रिय करू शकतात, ज्यामुळे अनियंत्रित रक्तदाब होतो.
उपचारांसाठी नवीन आशा निर्माण होऊ शकते:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा शोध भविष्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतो. आता आपल्याला हे माहित झाले आहे की समस्येचे मूळ मेंदूच्या नसांमध्ये देखील आहे, त्यामुळे केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी भविष्यात उच्च रक्तदाबाच्या आजारावर एक सोपा आणि प्रभावी उपचार देखील शोधला जाऊ शकतो.

उच्च रक्तदाब लठ्ठपणा किंवा तणावाशिवाय देखील होऊ शकतो. यामागे अनेक कारणे आहेत जी अनेक लोकांना माहिती नाहीत. चला ही कारणे माहिती करून घेवुया.
शारीरिक हालचालींचा अभाव:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: तुम्ही पातळ आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुरक्षित जीवन जगत आहात. जर तुमचे दिवसभर बैठकीचे काम असेल आणि जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर ते चिंतेचे एक मोठे कारण आहे. शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या कडक होऊ शकतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.
झोपेचा अभाव असणे:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: झोपेचा आपल्या आरोग्याशी खूप खोलवर असा संबंध आहे. दररोज 6 ते 8 तासांची योग्य झोप न घेतल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू शकते. या हार्मोनल असंतुलनामुळे तुमचा रक्तदाब हळूहळू वाढू शकतो.
अनुवंशिकता हे एक कारण असणे:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: कधीकधी, याचे कारण आपली जीवनशैली नसते, तर अनुवंशिकता हे एक कारण असते. जर तुमच्या पालकांना उच्च रक्तदाब असेल, तर तुम्हालाही तो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमचे वजन किंवा ताणतणावाची पातळी काहीही असो, ते पिढ्यानपिढ्या संक्रमित होऊ शकते.
मूत्रपिंड आणि हार्मोनल समस्या:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: जर तुमचे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसेल तर तुमचा रक्तदाब वाढू शकतो. याव्यतिरिक्त, तुमच्या थायरॉईड किंवा एड्रेनल हार्मोन्समधील समस्यांमुळे देखील तुमचा रक्तदाब वाढू शकतो.
चहा, कॉफी आणि धूम्रपानाचे व्यसन असणे:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्सचे आणि धूम्रपान यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे ही देखील प्रमुख कारणे आहेत. या गोष्टी आपल्या रक्तवाहिन्या अरुंद करतात, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो.
अजून काही महत्त्वाची कारणे:
Surprising Cause of High Blood Pressure 2026: तसेच दिवसभर खूप कमी पाणी पिणे, वेदनाशामक औषधांचा जास्त वापर करणे आणि स्क्रीनसमोर (मोबाइल/लॅपटॉप) जास्त वेळ घालवणे यामुळे देखील तुमचा रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच, केवळ तुमचे वजनाकडे आणि मीठ सेवन करण्याकडेच नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्वात प्रथम रक्तदाब वाढण्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया:
- जास्त मीठ खाणे: आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पाणी साठून राहते आणि रक्तदाब वाढतो.
- मानसिक ताण (Stress): सततची चिंता आणि कामाचा ताण रक्तदाबावर थेट परिणाम करतो.
- बैठी जीवनशैली: व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून राहणे.
- वजन वाढणे: शरीराचे वजन गरजेपेक्षा जास्त असल्यास हृदयावर ताण येतो.
- व्यसने: धूम्रपान आणि मद्यपान यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
- झोपेचा अभाव: उशिरा झोपणे, अपुरी झोप.
- आनुवंशिक कारणे – कुटुंबात उच्च रक्तदाबचा (BP) इतिहास असणे.
- डायबेटीस व कोलेस्ट्रॉल – इतर आजारांमुळेही BP वाढतो
रक्तदाब वाढवणारी जीवनशैली कोणती
- दिवसभर बसून काम करणे
- जंक फूड व बाहेरचे अन्न वारंवार खाणे
- मोबाईल/स्क्रीनचा अति वापर
- व्यायामाला वेळ न देणे
- मानसिक अस्वस्थता, चिडचिड
- पाणी कमी पिणे
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करायचे महत्त्वाचे बदल:
- रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांइतकीच जीवनशैली (Lifestyle) महत्त्वाची आहे:
- मिठावर नियंत्रण: दिवसाला 5 ग्रॅम (एक छोटा चमचा) पेक्षा जास्त मीठ खाऊ नका. वरून मीठ घेण टाळा आणि पापड, लोणची, बंद पाकीटबंद पदार्थ (Processed food) कमी करा.
- नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करा.
- पोटॅशियमयुक्त आहार: केळी, पालेभाज्या, नारळ पाणी आणि डाळी यांचा आहारात समावेश करा. पोटॅशियम शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.
- पुरेशी झोप: रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. झोपेच्या अभावामुळे ‘स्ट्रेस हार्मोन्स’ वाढतात.
- तणाव व्यवस्थापन: योगासने, प्राणायाम आणि ध्यान (Meditation) केल्याने मन शांत राहते आणि रक्तदाब कमी होतो.
अधिक वाचा: हिवाळ्यात आरोग्याची कशी घ्याल काळजी? संपूर्ण माहिती वाचा
Surprising Cause of High Blood Pressure 2026: उच्च रक्तदाब (High BP) नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. औषधांसोबतच तुम्ही खालील 10 घरगुती उपाय करू शकता:
1. मिठाचा वापर कमी प्रमाणात करा (Reduce Salt)
मिठामध्ये सोडियम असते, जे शरीरात पाणी साठवून ठेवते आणि रक्तदाब वाढवते. दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा (एक छोटा चमचा) जास्त मीठ खाऊ नका. वरून मीठ घेणे पूर्णपणे टाळावे.
2. लसणाचे (Garlic) सेवन करा.
लसणामध्ये ‘ऑलिसीन (Allicin)’ असते, जे रक्तवाहिन्या शिथिल करण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी कोमट पाण्यासोबत घेतल्यास फायदा होतो.
3. रोज व्यायाम करा (Daily Exercise)
दिवसातून किमान 30 मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यामुळे हृदय मजबूत होते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. शारीरिक हालचाल ठेवणे फायदेशीर ठरते.
4. पोटॅशियमयुक्त आहार घेणे. (Potassium-rich Food)
पोटॅशियम सोडियमचे दुष्परिणाम कमी करते. केळी, रताळी, पालक आणि नारळ पाणी यांचा आहारात समावेश करा.
5. ताणतणाव कमी करा. (Stress Management)
मानसिक ताण बीपी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी दररोज 10-15 मिनिटे प्राणायाम, ध्यान (Meditation) किंवा दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा.
6. आवळा आणि मध (Amla & Honey)
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. एक चमचा आवळा पावडर आणि मध एकत्र करून घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते.
7. वजन नियंत्रणात ठेवा (Weight Management)
वाढलेले वजन हृदयावर ताण निर्माण करते. तुमचे वजन उंचीनुसार योग्य (BMI नुसार) असल्यास रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी राहतो.
8. कलिंगड आणि त्याचे बिया (Watermelon)
कलिंगडामध्ये ‘सिट्रुलीन’ नावाचे घटक असते जे रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करते. कलिंगडाच्या बियांची पूड देखील अतिशय गुणकारी मानली जाते.
9. डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
मर्यादित प्रमाणात (एक छोटा तुकडा) डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्यातील ‘फ्लॅव्होनॉइड्स’मुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात. मात्र, यात साखर कमी असावी.
10. पुरेशी झोप घ्या (Deep Sleep)
रात्री किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि बीपी वाढतो.
Surprising Cause of High Blood Pressure 2026: वरील सर्व उपाय औषधांना पर्याय नाहीत. जर तुमचा रक्तदाब खूप जास्त असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला औषधे सुरू ठेवणे अनिवार्य आहे.