Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवली जात आहे. ही योजना लाडकी बहीण योजना या नावाने खूप प्रसिद्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येत आहेत. परंतु नोव्हेंबर ह्या महिन्याचा हप्ता अजूनही आला नाही आणि डिसेंबर सुरू होऊन 15 दिवस देखील झाले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आतुरतेने दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता 7 ते 10 ऑक्टोंबर ह्या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला होता. पण आज डिसेंबरची 15 तारीख उलटून गेलेली आहे, परंतु अजूनही नोव्हेंबर महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. महाराष्ट्रातील ह्या योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्ते कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अगोदरच पुढे ढकलण्यात आला असल्याने डिसेंबर चा हप्ता ह्या महिन्यात मिळेल की नाही असा गोंधळ निर्माण झाला आहे.
अधिक वाचा: प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025-2026: रब्बी हंगामासाठी नोंदणी सुरू झाली आहे, लवकर करा अर्ज
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 15 दिवसांनी डिसेंबर महिना संपेल. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू आहे. यातच विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही योजना बंद केली जाणार नाही आणि ही योजना सुरूच राहील. या संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी घोषणा केली आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
महापालिका निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा चर्चेत आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच योजनेचा हप्ता जमा होणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र येऊ शकतात. पुढच्या 5 दिवसात म्हणजेच 21 डिसेंबर आधी पैसे येण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबर रोजी 20 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे ह्या होणाऱ्या निवडणुकांच्याआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच वेळी दोन महिन्यांच्या हप्त्याचे पैसे देऊन महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकेल. महाराष्ट्र राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. म्हणून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता देण्यात खबरदारी घेतली जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो.
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. योग्य वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील देणार आहोत. तसेच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत वाढ करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे.
अधिक वाचा: आता तुमचे वीज बिल येईल अर्धेच! तुमच्या छतावर बसवा सौर पॅनल सरकार देत आहे 70 टक्के अनुदान.
Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार पैसे
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहेत. आतापर्यंत ह्या योजनेच्या निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे. मागील बऱ्याच महिन्यांपासून ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची वेळोवेळी तपासणी सुरू आहे. तसेच या योजनेअंतर्गत दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरतात, त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.
Ladki Bahin Yojana: ई-केवायसीसाठी उरले शेवटचे 15 दिवस
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत ई-केवायसी करण्यासाठी आत्ता शेवटचे 15 दिवस उरले आहेत. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 ही यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करायची आहे. ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे.
Ladki Bahin Yojana: ई-केवायसी न केल्यास मिळणारा लाभ बंद होणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ह्या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला असणार आहेत त्या महिलांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र महिला लाभार्थ्यांची नावे वगळली जाणार आहेत. लाडक्या बहिणींचा 17 वा आणि 18 हप्ता खात्यात येण्यापूर्वी मंत्री आदित्य तटकरे यांनी ई-केवायसी बाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे की, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी महिला ह्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील आहेत त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया करताना त्यांच्याकडून चूक होणे हे स्वाभाविक आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असल्याने, या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्यासाठी संधी देणे हे गरजेचे आहे असे मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच चूक सुधारण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्यासाठी एकदाच संधी देण्यात आली आहे. यासाठी देखील 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी कराल?
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ई-केवायसीची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुमचा आधारकार्ड वरील क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
- यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि पुढे जा
- यानंतर तुमच्या मोबाइलला वर एक OTP येईल, तो सबमिट करा आणि पुढील पडताळणी पूर्ण करा.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण ई-केवायसीत चूक सुधारण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
- ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्यासाठी सर्वात अगोदर लाडकी बहिण योजनेच्या ह्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- ई-केवायसी करताना होम पेजवर तुम्हाला लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे चुका झाल्या असल्यास, त्यावर क्लिक करा.
- यानंतर लिंकद्वारे एक पेज ओपन होणार आहे, तुम्हाला ह्या पेजवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला आधारकार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये तुमची सर्व योग्य माहिती भरायची आहे.
- ई-केवायसी करताना चुकीची माहिती गेली असेल तर ती एडिट करून नवीन खरी माहिती भरायची आहे.
- यानंतर काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.
- ह्यायानंतर तुमचा फॉर्म एडिट होईल.
Ladki Bahin Yojana: अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून वगळणार
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत ई-केवायसी केल्यानंतर ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिला वयोगटात बसत नाहीत, ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहेत तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला ह्या योजनेचा लाभ घेत असतील तर यापुढे या योजनेच्या नियमानुसार त्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. यामुळे जर तुम्ही अपात्र असूनही ई-केवायसी केली असेल तर यापुढे तुम्हाला मिळणारा लाभ बंद केला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही लाभ घेतला तर कारवाई होणार का?
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत बऱ्याच अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे? यावर मंत्री आदित्य तटकरेंनी माहिती दिली आहे की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशा बोगस लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं मंत्री आदिती तटकरें यांनी सांगितले आहे.
Ladki Bahin Yojana: अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची ई-केवायसी:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्याअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता ई-केवायसी करण्यासाठी शेवटचे 15 दिवस राहिले आहेत. 31 डिसेंबर 2025 ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. अजूनही लाखो महिलांनी ई-केवायसी केलेली नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाभार्थी महिलांनी ई-केवायसी केले नाही तर त्यांना लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यामध्ये अडचणी येत आहे त्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ई-केवायसीची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे.