BEST Mumbai Bharti 2026
BEST Mumbai Bharti 2026: मुंबई BEST मध्ये बस वाहक (कंडक्टर) पदांची भरती, 10वी पास उमेदवारांना मोठी संधी

BEST Mumbai Bharti 2026: मित्रांनो, मुंबईमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या BEST बसमध्ये बस वाहक (कंडक्टर) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमुळे तरुण आणि तरुणींना हक्काचा रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा. या लेखामध्ये आपण पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, वेतन, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करताना लक्षात ठेवायच्या सूचना यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

1) BEST मुंबई भरती 2026 2026: थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
भरती संस्थाबृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)
पदाचे नावबस वाहक (कंडक्टर)
नोकरीचे ठिकाणमुंबई, महाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
शैक्षणिक पात्रताSSC (10वी पास) किमान 50% गुणांसह
आवश्यक परवानावैध बस वाहक परवाना आणि बिल्ला (Badge)
एकूण रिक्त जागा364
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्ज सुरू8 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख29 जुलै 2026 (Till 11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळwww.bestundertaking.com

2) BEST मुंबई भरती 2026 म्हणजे काय?

BEST (Brihanmumbai Electric Supply and Transport Undertaking) ही मुंबई महानगरातील सार्वजनिक वाहतूक आणि वीजपुरवठा सेवा देणारी महत्त्वाची संस्था आहे. दररोज लाखो प्रवासी BEST बस सेवेद्वारे प्रवास करतात. या सेवेमध्ये बस वाहकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

प्रवाशांना तिकीट देणे, प्रवासाशी संबंधित माहिती देणे, नियमांचे पालन करणे आणि प्रवास सुरळीत ठेवणे ही बस वाहकाची प्रमुख जबाबदारी असते. त्यामुळे पात्र आणि प्रशिक्षित उमेदवारांची निवड करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

3) बस वाहक (कंडक्टर) पदांसाठी शैक्षणिक पात्रता:

मित्रांनो, तुम्हाला बेस्ट बसमध्ये बस वाहक (कंडक्टर) पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आवश्यक आहे.

  • दहावी उत्तीर्ण: उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा समकक्ष मान्यताप्राप्त मंडळातून SSC (10वी) उत्तीर्ण असावा. आणि उमेदवाराकडे SSC (10वी) परीक्षा उत्तीर्ण असलेले मार्कशीट असणे आवश्यक आहे.
  • किमान 50% गुण: उमेदवार केवळ दहावी पास असणे पुरेसं नाही तर उमेदवाराला दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तर तो उमेदवार या पदासाठी पात्र ठरवला जाणार नाही.
  • मराठी विषय: सदर परीक्षा वा उच्चतम परीक्षा किमान 100/50 गुणांचा मराठी विषय (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
  • कंडक्टर लायसन्स: उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) जारी केलेले वैध बस वाहक (कंडक्टर) परवाना असणे आवश्यक आहे.
  • बिल्ला (Badge) असणे आवश्यक: बसवाहक (कंडक्टर) परवान्यासोबत अधिकृत बिल्ला (Badge) असणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: एसटी महामंडळात मेगा भरती 2026: 17,742 पदांची मोठी घोषणा! कोणाला मिळणार प्राधान्य? संपूर्ण माहिती

4) शारीरिक पात्रता निकष:

प्रिय मित्रांनो, BEST बसमध्ये बस वाहक (कंडक्टर) नोकरी असल्याने या पदावर काम करताना बराच वेळ उभे राहून काम करावे लागते. यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शारीरिक पात्रता आवश्यक असते. म्हणून महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी आवश्यक उंची व वजन खालील प्रमाणे असणे गरजेचे आहे.

शारीरिक निकषआवश्यक पात्रता
किमान उंची 154 से. मी.
कमाल उंची178 से. मी. पेक्षा जास्त नसावी.
किमान वजन45 कि. ग्रॅ. असणे आवश्यक.

5) अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • दिनांक 29-07-2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्षे पूर्ण ते 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • तसेच सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देखील देण्यात आली आहे. म्हणजेच या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण ते 43 पेक्षा जास्त नसावे. आणि ही सूट SC, ST, VJ(A), NT(B), NT(C), SBC, OBC, EWS, SEBC या प्रवर्गातील उमेदवारांना मिळेल.

6) बस वाहक (कंडक्टर) भरती पदांचा तपशील:

मित्रांनो, BEST बसमध्ये बस वाहक (कंडक्टर) या भरतीमध्ये एकूण 364 पदे भरली जाणार आहेत.

BEST बस वाहक (Bus Conductor) भरती 2026 अंतर्गत 364 रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय वर्गीकरण स्पष्ट करण्यात आले आहे, जे आरक्षण आणि गुणवत्ता-आधारित नियोजनासाठी महत्त्वाचे आहे. भरतीविषयक अद्ययावत तपशिलानुसार, प्रवर्गनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

वर्गआरक्षित पदांची संख्या
अनुसूचित जाती (Scheduled Caste)34
अनुसूचित जमाती (Scheduled Tribe)22
विमुक्त जाती (अ) (Vimukta Jaties) (A)06
भटक्या जमाती (ब) (Nomadic Tribe) (B)06
भटक्या जमाती (क) (Nomadic Tribe) (C)10
विशेष मागासप्रवर्ग (Special Backward Class)05
इतर मागासवर्गीय (Other Backward Class)67
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically Weaker Section)36
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक
(Socially and Economically Backward Class)
36
अराखीव (Open)142
एकूण364

अधिक वाचा: जिओने 2026 अगोदरच आणले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन!

7) भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?

बस वाहक या भरतीमध्ये खालील उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात.

  • दहावी उत्तीर्ण परंतु किमान 50 टक्के गुण असणारा उमेदवार
  • वैध बस वाहक (कंडक्टर) परवाना धारक
  • RTO Badge (बिल्ला) असलेले उमेदवार
  • महाराष्ट्रातील पात्र उमेदवार
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सक्षम उमेदवार

8) BEST मध्ये नोकरी करण्याचे फायदे:

मित्रांनो, BEST मध्ये नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना केवळ वेतनच नव्हे तर अनेक सुविधा मिळू शकतात.

  • मुळ वेतन
  • महागाई भत्ता
  • घरभाडे भत्ता
  • वैद्यकीय भत्ता
  • गणवेश धुलाई भत्ता
  • रजा प्रवास भत्ता
  • रजेचे रोखीकरण
  • उपक्रमाच्या बसमधून प्रवास सुविधा
  • शासकीय नियमांनुसार इतर लाभ

9) अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या सूचना:

मित्रांनो, बसवाहक या भरतीसाठी अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
  • अर्ज भरताना चुकीची माहिती भरू नका.
  • बस वाहक (कंडक्टर) परवाना वैध असणे आवश्यक आहे.
  • मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सक्रिय असावा.
  • अंतिम तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करा.

10) BEST मुंबई भरती 2026 साठी आवश्यक कागदपत्रे:

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना आणि कागदपत्रे पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात.

कागदपत्रतपशील
शैक्षणिक कागदपत्रे10वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
बस वाहक (कंडक्टर) परवानावैध RTO वाहक परवाना
बिल्ला (Badge)RTO कडून जारी केलेला बिल्ला (Badge)
आधार कार्डओळखपत्र म्हणून
पॅन कार्ड (असल्यास)अतिरिक्त ओळखपत्र
शाळा सोडल्याचा दाखलाजन्मतारीख पडताळणीसाठी
जात प्रमाणपत्रलागू असल्यास
जात वैधता प्रमाणपत्रलागू असल्यास
Non-Creamy Layer प्रमाणपत्रOBC/VJNT/SBC उमेदवारांसाठी
EWS प्रमाणपत्रलागू असल्यास
अधिवास प्रमाणपत्रमहाराष्ट्र अधिवास
फोटो आणि स्वाक्षरीरंगीत फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी

टीप: कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या फाईल साईज आणि फॉरमॅटची खात्री करून घ्या.

अधिक वाचा: AI मुळे खरंच नोकऱ्या जाणार आहेत का? जाणून घ्या संपूर्ण नवीन माहिती

11) BEST मुंबई भरती 2026 Salary:

प्रिय मित्रांनो, बेस्ट उपक्रमाअंतर्गत बस वाहक (कंडक्टर) म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीच्या कालावधीत मूळ वेतन 22,060 रुपये इतका पगार दर महिन्याला देण्यात येणार आहे. तसेच याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, रजा प्रवास भत्ता, रजेचे रोखीकरण आणि उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा मिळणार आहे. (एकंदरीत अंदाजे 36,000 रुपये)

12) परीक्षा शुल्क:

  • खुल्या प्रवर्गासाठी रुपये 1000/-
  • राखीव वर्गातील उमेदवारासाठी रुपये 900/-

टीप: उमेदवाराने अर्ज दाखल करताना भरणा केलेले भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

13) परीक्षेचे विषय आणि गुण:

मित्रांनो, बस वाहक भरती पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) या प्रकारची असेल. या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल.

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी)

प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी हि 10 गुणांची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

14) ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

मित्रांनो, बस वाहक पदाच्या भरतीसाठी खालील पद्धतीने ऑनलाईन अर्ज करावा.

  • सर्वात प्रथम BEST च्या अधिकृत संकेतस्थळ www.bestundertaking.com वर जा. आणि होमपेजवरील ‘Recruitments’ टॅबवर क्लिक करा.
  • तिथे Recruitment for the Conductor Position खाली दिलेल्या या लिंकवर क्लिक करा.(https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33178/100842//Index.html)
  • यानंतर नवीन विंडो ओपन होईल. होमपेजवरील New Registration समोरील ‘Click Here’ लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर पुन्हा नवीन विंडो ओपन होईल. आता या पेजवरील सर्व माहिती जसे कि नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी इतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरून नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला Login ID आणि Password मिळेल.
  • आता मिळालेल्या आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा. अर्जामध्ये आवश्यक वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • SSC गुणपत्रक, Bus Conductor Licence, Badge, फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात (Size) आणि निर्धारित फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • सर्व माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • यानंतर अर्जात भरलेली सर्व माहिती पुन्हा तपासा. कुठे चूक आढळल्यास दुरुस्ती करून घ्या.
  • माहिती तपासून खात्री झाल्यानंतर Final Submit वर क्लिक करा. आणि अर्जाची व पेमेंट पावतीची प्रिंट (Printout/PDF) भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

15) अर्ज करताना होणाऱ्या सामान्य चुका:

मित्रांनो, बऱ्याच वेळी अर्ज भरताना आपल्याकडून छोट्या चुका होतात आणि त्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो.

खालील चुका टाळा:

  • चुकीचा मोबाईल नंबर
  • चुकीचा ई-मेल आयडी
  • Expired Licence
  • Badge क्रमांक चुकीचा लिहिणे
  • अस्पष्ट फोटो
  • चुकीची स्वाक्षरी
  • अपूर्ण अर्ज
  • अंतिम मुदतीनंतर अर्ज करण्याचा प्रयत्न

16) ऑनलाईन अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत लिंक:

महत्त्वाची माहितीतारीख आणि अधिकृत लिंक
ऑनलाइन अर्ज सुरू08 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख29 जुलै 2026
शुल्क भरण्याची अंतिम तारीख29 जुलै 2026
परीक्षेची तारीखलवकरच जाहीर केले जाईल.
अधिकृत वेबसाईटwww.bestundertaking.com
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक

17) अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा:

  • सर्व माहिती अचूक भरली आहे का?
  • फोटो आणि स्वाक्षरी योग्य आहेत का?
  • बस वाहक (कंडक्टर) परवाना वैध आहे का?
  • बिल्ला (Badge) क्रमांक बरोबर आहे का?
  • शुल्क भरले आहे का?
  • अर्जाची PDF सेव्ह केली आहे का?

18) प्रतीक्षा यादीची कालमर्यादा:

उपरोक्त निर्देशित अनुशेषाची पदे भरेपर्यंत अथवा कमाल दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत (दोन वर्षाचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षायादी बाद करण्यात येईल)

19) नियुक्ती आणि कायम स्वरूपी नियुक्ती:

निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती बदली तत्वावर ‘बदली बस वाहक’ म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तवणूक, उपस्थिती आणि सेवाभिलेख इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली जाईल.

20) बेस्ट उपक्रम अधिकार:

सादर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः व अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवत आहे. तसेच उमेदवारांची बस वाहक पदावर निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम / निवड अधिकारी यांना राहतील.

माझा वैयक्तिक अनुभव:

मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रातील विविध सरकारी भरती, सरकारी योजना आणि रोजगाराशी संबंधित अधिकृत अधिसूचना नियमितपणे अभ्यासत आहे. या काळात मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली आहे की, अनेक उमेदवार घाईघाईत अर्ज भरतात आणि छोट्या-छोट्या चुका झाल्यामुळे त्यांचा अर्ज बाद होतो.

BEST Mumbai Bharti 2026 ही मुंबईमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या 10वी उत्तीर्ण आणि पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे, आवश्यक पात्रता तपासणे, वैध Bus Conductor Licence व Badge तयार ठेवणे आणि सर्व माहिती अचूक भरणे अत्यंत गरजेचे आहे. तरीही अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन एकदा अवश्य तपासा.

माझा सल्ला:

मित्रांनो, जर तुम्ही BEST Mumbai Bharti 2026 साठी पात्र असाल, तर अंतिम तारखेची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी तुमची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, Bus Conductor Licence, Badge आणि इतर आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या.

ऑनलाइन अर्ज भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा. चुकीचा मोबाईल क्रमांक, ई-मेल, अस्पष्ट फोटो किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड केल्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची PDF प्रत आणि शुल्क भरल्याची पावती सुरक्षित जतन करून ठेवा.

सरकारी नोकरीसाठी सातत्याने तयारी करणे, अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवणे आणि केवळ विश्वासार्ह स्रोतांवरच अवलंबून राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

निष्कर्ष (Conclusion):

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) अंतर्गत निघालेली ही 364 रिक्त पदांची भरती 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. आजच्या काळात पात्र उमेदवारांसाठी BEST उपक्रमामध्ये नोकरीची ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

सुरुवातीला ‘बदली बस वाहक’ म्हणून नियुक्ती होणार असली, तरी चांगल्या कामगिरीच्या जोरावर कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे स्वप्न इथे नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी कोणतीही चूक न करता वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करावी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

1) BEST Mumbai Bharti 2026 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 364 बस वाहक (कंडक्टर) पदे भरली जाणार आहेत.

2) या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार SSC (10वी) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वैध Bus Conductor Licence आणि Badge असणे आवश्यक आहे.

3) अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2026 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) आहे.

4) BEST Bus Conductor चे सुरुवातीचे वेतन किती आहे?
उत्तर: सुरुवातीचे मूलभूत वेतन ₹22,060 प्रति महिना असून विविध भत्त्यांसह एकूण मासिक वेतन अंदाजे ₹36,000 पर्यंत जाऊ शकते.

5) अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे का?
उत्तर: होय. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

6) परीक्षा कोणत्या प्रकारची असेल?
उत्तर: परीक्षा CBT (Computer Based Test) स्वरूपात होईल. त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तसेच मराठी आणि इंग्रजी भाषा या विषयांचा समावेश असेल.

7) महाराष्ट्राबाहेरील उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर: भरतीची पात्रता आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहतील. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

8) अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: 10वीचे गुणपत्रक, Bus Conductor Licence, Badge, आधार कार्ड, फोटो, स्वाक्षरी तसेच लागू असल्यास जात प्रमाणपत्र, EWS, Non-Creamy Layer इत्यादी कागदपत्रे आवश्यक असू शकतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली?

जर हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर तो तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचू शकेल. तसेच अशाच सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

Disclaimer (अस्वीकरण):

मित्रांनो, या लेखामध्ये दिलेली माहिती BEST Mumbai Bharti 2026 संदर्भातील उपलब्ध अधिकृत अधिसूचना आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. माहिती शक्य तितकी अचूक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी भरती प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल, दुरुस्ती किंवा नवीन सूचना जारी होऊ शकतात.

त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती अवश्य तपासा. या लेखाचा उद्देश केवळ माहिती देणे हा असून, अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिकृत अधिसूचनाच ग्राह्य धरावी. या लेखातील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही वैयक्तिक किंवा आर्थिक निर्णयासाठी लेखक किंवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.

Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला डिजिटल मीडियामध्ये 3 वर्षांहून अधिकचा अनुभव असून मला सरकारी भरती, नोकरी विषयक माहिती, करिअर मार्गदर्शक आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल.

डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे. आतापर्यंत मी अनेक लेख आणि Web Stories प्रकाशित केल्या असून माझ्या लेखनाला वाचकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

माझे उद्दिष्ट म्हणजे मराठी वाचकांपर्यंत अचूक, प्रामाणिक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती पोहोचवणे आहे. मी नेहमीच नवीन माहिती पुरवण्याचा आणि वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करतो.

टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

प्रकाशित लेख: 13 जुलै 2026, लेख अद्यतन: 14 जुलै 2026

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *