Vastu Tips For Wall Clock 2026: आपल्या घरातील घड्याळ जर योग्य दिशेला लावलेले नसेल तर त्याचा त्रास व त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागू शकतात. म्हणूनच आपल्या घरातील घड्याळ योग्य दिशेला लावणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
प्रस्तावना:
आपल्या संपूर्ण जीवनामध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला दररोजची आपली कामे घड्याळ पाहून सुरू होतात आणि घड्याळाच्या काट्यावर संपत असतात. आज काल कुणाकडेही पुरेसा वेळ नाही. प्रत्येक जण हा आजच्या धावत्या जगात घड्याळाच्या काट्यावर धावपळ करताना आणि आपले आयुष्य जगताना दिसत आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे का, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळ योग्य दिशेला लावले नाही तर त्याचा आपल्या जीवनात मोठा फटका, नकारात्मक दुष्परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागू शकतात. म्हणूनच आपल्या घरातील घड्याळ हे योग्य दिशेला लावणे अतिशय महत्त्वाचे आहे.
अधिक वाचा: 2026 मध्ये हे ‘4’ मूलांक असलेल्यांचे नशीब चमकणार. सूर्यदेवाची राहणार विशेष कृपा
तुमच्या घरामध्ये असलेले घड्याळ हे फक्त तुम्हाला वेळच सांगत नसते तर हे घड्याळ वास्तुशास्त्रानुसार तुमच्या जीवनाची गती, प्रगती, दशा, दिशा देखील ठरवत असते. वास्तुशास्त्रानुसार, जर घरातील घड्याळ योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने ठेवले नाही तर ते आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करते. जर घरातील घड्याळ चुकीच्या दिशेला ठेवलेले असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा, दुःख, दारिद्र्य, आजारपण आणि मोठ्या संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो.

प्रत्येकाच्या घरात वेळ पाहण्यासाठी घड्याळ हे असतेच असते. आपण घरातील घड्याळ आपल्या आवडीनुसार, सोयीनुसार किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार पाहून घरातील भिंतीवर लावतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार असे करणे हे चुकीचे आहे. कारण वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरातील प्रत्येक दिशेला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही घरातील घड्याळ चुकीच्या दिशेला लावले असेल तर त्याचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर कळत नकळत नकारात्मक परिणाम होत असतो. तसेच याचा आर्थिक परिस्थितीवर देखील मोठा परिणाम होत असतो.
अधिक वाचा: नवीन वर्षात तुमच्या घरात येईल पैसाच पैसा? जाणून घ्या सोप्या वास्तू टिप्स
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या व आपल्या संपूर्ण कुटुंबावर शुभ-अशुभ परिणाम हे होत असतात. आपल्या घरातील वस्तू ह्या केवळ सजावटीसाठी नसतात तर त्यांची दिशा, स्थान आणि त्यांचा आकार यांचा देखील आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. घरातील ठेवण्यात आलेली प्रत्येक वस्तू ही नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जेला सतत आकर्षित करत असते. एखादी वस्तू आपण घरात चुकीच्या दिशेला किंवा ठिकाणी ठेवली असल्यास, याचा वाईट परिणाम आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांवर पडत असतो. तसेच आपल्या घरातील भिंतीवर लावलेल्या घड्याळाचाही शुभ परिणाम पडत असतो.

आपल्या घरातील घड्याळ हे वेळ दाखवण्याबरोबरच घराच्या सौंदर्यात आणि घराच्या वास्तुशास्त्रामध्ये ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. बरेच जण घरांमध्ये भिंतीवर अशा ठिकाणी घड्याळ लावतात जिथे त्यांना वेळ दिसणे सोपे जाईल. म्हणजेच आपण आपल्या सोयीनुसार घरात कोणत्याही भिंतीवर घड्याळ लावतो परंतु वास्तुशास्त्रामध्ये घरातल्या प्रत्येक वस्तू ठेवण्याची दिशा, ठिकाण, आकार हे नियम सांगितलेले आहेत, याचा जर आपण अवलंब केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा, आणि सर्वांचे चांगले आरोग्य राहते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला असावे याचे काही नियम सांगितलेले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळाचा संबंध हा फक्त वेळ पाहण्यापुरता नसून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या प्रगतीशी, आरोग्याशी आणि आनंदाची जोडलेला आहे. आपल्या घरातील घड्याळ हे नुसते वेळ दाखवत नाही तर ते आपल्या घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आणि सर्व सदस्यांच्या प्रगतीचे प्रमाण देखील दर्शवत असते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळ हे योग्य दिशेला लावल्यास आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक परिस्थिती, चांगले आरोग्य आणि प्रगती ही उत्तम प्रकारे संतुलित राहण्यास मदत होत असते. परंतु हेच घड्याळ जर चुकीच्या दिशेने लावल्यास ह्या सर्व बाबींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
अधिक वाचा: कोणत्या लोकांसाठी 2026 हे नवीन वर्ष उत्तम राहील, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या!

आजकाल घड्याळ हे मोबाईल पासून घरातील भिंतीपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरताना पाहत आहोत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घड्याळ असल्याने आजकाल बहुतांशी लोक हातावरील घड्याळ वापरणे बंद करून मोबाईल मधील घड्याळाचा वापर करताना दिसून येत आहेत. आजच्या धावपळीच्या काळातील परिस्थितीमध्ये आपले आयुष्य घड्याळाच्या काट्याशी अतिशय संबंधित झालेले आहे.
बऱ्याच वेळेला आपण घरात सजावट करताना आपण आपल्या सोयीनुसार घड्याळ कुठेही लटकवतो. परंतु आपल्या कळत नकळत झालेली ही चूक आपल्याला खूप नुकसानदायक ठरू शकते. वास्तु तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, घड्याळ आपल्या वेळेशी आणि नशीबाशी संबंधित आहे. म्हणूनच आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थिरता, कुटुंबाची होणारी प्रगती आणि चांगले आरोग्य यासाठी घड्याळाची योग्य दिशा जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
अधिक वाचा: 500 वर्षानंतर खूप दुर्मिळ 5 राजयोग 2026 च्या सुरवातीलाच, 5 राशी होणार मालामाल
आज आपण वास्तुशास्त्रानुसार घड्याळाशी संबंधित नियम जाणून घेऊया ज्यामुळे हे नियम अवलंबून वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता. घड्याळ कोणत्या रंगाचे असावे, त्याचा आकार कसा असावा किंवा घड्याळाची स्थिती कशी असावी प्रत्येक लहान गोष्ट तुमच्या जीवनावर खोलवर परिणाम करते. चला तर वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भिंतीवर घड्याळ लावण्याची सर्वोत्तम दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशेला घड्याळ ठेवल्याने व्यक्तीला त्याच्या कारकिर्दीमध्ये आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतात. जर तुम्ही व्यवसायात करत असाल, तर उत्तर दिशेला घड्याळ ठेवल्याने ग्राहकांना आणि नफ्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. शिवाय, पूर्व दिशेला घड्याळ ठेवल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि कुटुंबाची प्रतिष्ठा देखील वाढते.
जर उत्तर किंवा पूर्वेला जागा नसेल, तर तुम्ही पश्चिम दिशा देखील निवडू शकता, परंतु शेवटचा उपाय म्हणून पश्चिम दिशेला हे ठेवा. पश्चिम दिशेला घड्याळ ठेवल्याने घरात समृद्धी राहते. घड्याळ कधीही धुळीने घाणेरडे होणार नाही याची काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार, तुमचे नशीब खराब होऊ नये म्हणून ते नियमितपणे स्वच्छ करा.
तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ:
घरात कधीही तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ ठेवू नये. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की, बंद असलेले घड्याळ जीवनात प्रगतीमध्ये नेहमी अडथळा निर्माण करत असते. जर घरातील घड्याळ खराब झाले असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे किंवा घरातून काढून टाकावे. बंद घड्याळ आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि आळस वाढवते.
तसेच, तुटलेले किंवा फुटलेले काचेचे घड्याळ घरामध्ये असल्यास त्या घरामध्ये सदैव गरिबी राहते. अशा बंद आणि तुटलेल्या घड्याळांमुळे घरातील लोकांना मानसिक ताण येतो. घड्याळाचा वेळ कधीही वास्तविक वेळेपेक्षा पाठीमागे नसावा याची नेहमी आपण खात्री करून घेत राहावी. तुम्ही घड्याळ योग्य आणि योग्य वेळेपेक्षा 1 किंवा 2 मिनिटे पुढे ठेवू शकता, परंतु ते मागे ठेवणे हे तुमच्या पराभवाचे लक्षण मानले जाते.
घड्याळाचा आकार आणि रंग कोणता असावा?
वास्तुशास्त्रानुसार, गोल असलेले घड्याळ सर्वात प्रभावी मानले जाते कारण ते नेहमी सातत्य दर्शवत असते. चौकोनी असलेले घड्याळ हे कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी चांगले असते कारण ते स्थिरता आणते. पेंडुलम घड्याळ हे बैठकीच्या खोलीसाठी खूप शुभ असतात कारण त्यांचा आवाज वातावरण चैतन्यशील आणि आनंदी ठेवतो.
रंगांचा विचार केला तर, उत्तर दिशेसाठी पांढरे किंवा धातूचे घड्याळ निवडा. पूर्व दिशेसाठी लाकडी किंवा हलके तपकिरी घड्याळ चांगले असते. गडद लाल किंवा काळे घड्याळ शक्यतो टाळावेच, कारण लाल किंवा काळा रंग हा जडपणा आणि रागाचे प्रतीक मानले जातात.
वास्तुशास्त्रानुसार घरातील घड्याळाबाबत विशेष कोणती काळजी घ्यावी:
- कधीही मुख्य गेट किंवा दाराच्या वर घड्याळ लटकवू नये.
- घराच्या नैऋत्य कोपऱ्यात घड्याळ टांगने देखील टाळावे.
- दुसऱ्याने दिलेले जुने किंवा तुटलेले घड्याळ कधीही वापरू नका.
- घड्याळ नेहमी स्वच्छ ठेवा आणि ते धुळीपासून दूर राहील याची काळजी घ्या.
- घड्याळाची बॅटरी संपल्यानंतर लगेच बदला जेणेकरून घड्याळ जास्त काळ बंद राहणार नाही.
- बेडरूममध्ये घड्याळ ठेवताना, झोपताना काचेमध्ये तुमचे प्रतिबिंब दिसणार नाही याची खात्री करा.
घड्याळ आपल्या वेळेचे व्यवस्थापन करते आणि ह्या लहान वास्तु टिप्स तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून समस्या येत असतील तर तुमच्या घरात घड्याळाची दिशा आणि स्थिती तपासा. योग्य दिशेने ठेवलेले घड्याळ तुमच्या नशिबाचे सगळे दरवाजे उघडू शकतात आणि तुमच्या घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धी आणू शकते.
वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, जे निसर्गाच्या उर्जेशी सुसंवाद निर्माण करण्यास मदत करते. या तत्त्वांचे पालन केल्याने केवळ आध्यात्मिक शांती मिळत नाही तर मानसिकदृष्ट्या समाधान, शिस्त आणि आनंद देखील मिळतो. घरातील घड्याळ योग्य दिशेने ठेवून, तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी जलद गतीने वाटचाल करू शकता.
वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व आहे. नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. उत्तर हि दिशा कुबेराची दिशा मानली जाते, म्हणून येथे घड्याळ ठेवल्याने आर्थिक लाभ होण्याची जास्त शक्यता निर्माण होते. पूर्वेकडे घड्याळ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारित होण्यास मदत होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास नेहमी मदत मिळत राहते.
दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ ठेवू नये. कारण वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि येथे घड्याळ ठेवल्याने घराच्या प्रमुख व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दक्षिण दिशेला घड्याळ असल्यास प्रगतीमध्येही अडथळे निर्माण होतात. जर तुमच्या घरात मुख्य दरवाजाच्या वर घड्याळ असेल तर ते ताबडतोब काढून टाका कारण ते नकारात्मक कंपन निर्माण करते.
वास्तुशास्त्र ही पारंपरिक श्रद्धा आहे याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही.
निष्कर्ष (Conclusion):
घरातील घड्याळ हे फक्त वेळ दाखवणारे साधन नसून, वास्तुशास्त्रानुसार ते आपल्या जीवनातील शिस्त, प्रगती आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावलेले घड्याळ घरात सकारात्मकता, आर्थिक स्थिरता आणि मानसिक शांतता निर्माण करण्यास मदत करू शकते.
तथापि, या गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत, त्यामुळे त्यांचा वापर करताना संतुलित दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. योग्य दिशा, स्वच्छता आणि कार्यरत घड्याळ या साध्या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात.
FAQs:
1) घड्याळ कोणत्या दिशेला लावणे सर्वात योग्य आहे?
वास्तुनुसार उत्तर किंवा पूर्व दिशा घड्याळासाठी सर्वात शुभ मानली जाते.
2) दक्षिण दिशेला घड्याळ का लावू नये?
दक्षिण दिशा ही नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानली जाते, त्यामुळे त्या दिशेला घड्याळ टाळावे असे सांगितले जाते.
3) बंद घड्याळ घरात ठेवले तर काय होते?
वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकते, म्हणून ते लगेच दुरुस्त करावे किंवा काढून टाकावे.
4) घड्याळ 1-2 मिनिटे पुढे ठेवणे योग्य आहे का?
हो, काही लोकांच्या मते ते चालते, पण घड्याळ मागे ठेवणे टाळावे.
5) बेडरूममध्ये घड्याळ ठेवणे योग्य आहे का?
हो, पण ते अशा ठिकाणी ठेवावे की झोपताना काचेतील प्रतिबिंब दिसणार नाही.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली?
जर तुम्हाला अशाच प्रकारच्या वास्तु टिप्स, राशी भविष्य, धार्मिक, सरकारी योजना, आरोग्य आणि उपयुक्त माहिती मराठीत वाचायला आवडत असेल तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जरूर शेअर करा. तुमच्या घरात घड्याळ कोणत्या दिशेला आहे? खाली comment करून नक्की सांगा!
Disclaimer (अस्वीकरण): MahaNewss या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दावाही करत नाही. या लेखामध्ये दिलेली माहिती ही वास्तुशास्त्रावर आधारित सामान्य माहिती आहे. यामधील भाकिते आणि उपाय हे विविध स्रोतांवर आधारित असून, याची अचूकता हमखास असेलच असे नाही. तसेच याला कोणताही वैज्ञानिक पुरावा हमखास उपलब्ध असेलच असे नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीचा वापर केल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी लेखक किंवा वेबसाइट जबाबदार राहणार नाही.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, ज्योतिष, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे. 24