Leopard Attack
Leopard Attacks 2025-2026: गोंदिया येथे बिबट्याचा हल्ला: 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, कारणे आणि उपाय

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्यामध्ये एका 4 वर्षे चिमुकल्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. यावर त्या गावातील नागरिक खूप संताप व्यक्त करत आहेत.

प्रस्तावना (Introduction):

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्यांचा वावर लक्षणीय वाढलेला दिसून येत आहे. ग्रामीण तसेच शहरी परिसराच्या जवळपास बिबट्यांचे दर्शन होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत.

विशेषतः शेतजमिनी, उसाचे पीक आणि जंगलालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा संपर्क वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आणि वनविभागानेही वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

हा लेख माहिती व जनजागृतीसाठी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा वावर:

गेल्या 2025 ह्या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याची नोंद आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या बिबट्यांच्या दहशतीच्या आणि हल्ल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. पुणे, रायगड, गोंदिया, अहिल्यानगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर खूप वाढलेला आहे. अनेक खेड्यांमध्ये बिबट्या मुक्त संचार करताना दिसून येत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leopard Attack

अधिक वाचा: साप चावल्यास काय करावे? काय करू नये? कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील खडकी गावातील घटना:

  • गोंदिया जिल्ह्यातील (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील खडकी हे (डोंगरगाव) आहे. खडकी (डोंगरगाव) गावात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अतिशय दुःखनीय घटना घडली. ह्या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसर दुःखीत अंतकरणाने पिळवटून निघाला आहे. बिबट्याने ह्या 4 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला आणि ह्या हल्ल्यांमध्ये त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. ह्या चार वर्षाच्या चिमुकल्याचे नाव हीयांश शिवशंकर रहांगंडाले असे आहे.
  • हा 4 वर्षाचा चिमुकला त्याच्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. अशावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ह्या 4 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्या चिमुकल्याला त्याचा जीव गमवावा लागला. येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत असून शासनाविरुद्ध राग व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.
Leopard Attack
  • गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यातील खडकी ह्या गावातील चार वर्षाच्या हीयांशचा त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात देखत जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. हीयांशच्या आई-वडिलांची अवस्था पाहून संपूर्ण गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
  • या संपूर्ण घटनेचा गावकरी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करून त्या धोकादायक बिबट्याला दिसता क्षणीच मारून टाका अशी गावकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे.
  • गोंदिया जिल्ह्यातील खडकी व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी अनेकदा वन विभागाकडे केली आहे. परंतु वेळेवर योग्य उपाययोजना न केल्याने पुन्हा एकदा एका निष्पाप चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
  • या घटनेमुळे त्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकरी सुद्धा अतिशय हळहळ व्यक्त करत आहेत. याकरिता प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि त्या कुटुंबाला योग्य ती मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अधिक वाचा: 2026 मध्ये काय होणार? बाबा वेंगा यांच्या धक्कादायक भविष्यवाण्या, सत्य की अफवा?

गोंदिया जिल्ह्यामधील तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथील घटना:

Leopard Attacks 2025-2026: विशेष म्हणजे या अगोदर दोन महिन्यापूर्वीच गोंदिया जिल्ह्यामधील तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथील रुची देवानंद पारधी (9 वर्षाच्या) ही तिच्या आई-वडिलांसोबत शेतात गेली असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये रुची देवानंद पारधी ह्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

यामुळे तिरोडा तालुक्यात वारंवार बिबट्यांचे हल्ले होत असल्याने तालुक्यातील सर्वच ठिकाणी बिबट्याच्या दहशतीची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यादरम्यान तेथील ग्रामस्थांनी वन विभागावर आपला राग व्यक्त केला आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात:

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवडी या गावात गोरख जाधव हा तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला होता, सकाळी साडेअकराच्या सुमारास गोरख जाधव विहिरी जवळ जेवण करण्यासाठी बसला असता बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला.

अशावेळी स्वतःला वाचवण्यासाठी गोरख जाधव याने प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्याच्या धडपडीत तो शेतातील विहिरीत पडला आणि बिबट्याने देखील त्याच्यापाठोपाठ विहिरीत उडी मारली. या हल्ल्यामध्ये त्या तरुणाचा आणि बिबट्याचा या दोघांचाही विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात:

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील शेतकरी सुरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. सुरज दिलीप कडलग हे गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते तर त्या चिमुकल्याची आजी गवताची ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्या

चवेळी 4 वर्षीय सिद्धेश सुरज कडलग हा घराच्या दारात उभा होता. अशावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सिद्धेश्वर हल्ला केला आणि ह्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय सिद्धेश जागीच ठार झाला.

पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यात:

पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील आष्टापुर येथील अंजना वाल्मीक कोतवाल ह्या एकदम पहाटे दशक्रियासाठी घराबाहेर निघाल्या होत्या तेव्हाच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या पायावर हल्ला केला. सुरुवातीला अंजना यांना हा कुत्र्याचा हल्ला आहे असा वाटल्याने त्या दगड उचलण्यासाठी खाली वाकल्या असता बिबट्याने त्यांच्या अंगावर पुन्हा झेप घेतली.

अंजना यांनी जोरदार आरडाओरड करत मदतीसाठी हाका मारल्या. त्यांच्या या आरडाओरडीने बिबट्या घाबरला आणि तेथून पळून गेला. यामध्ये अंजना यांच्या पायाला जखम झाली असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.

अधिक वाचा: जिओने 2026 अगोदरच आणले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन!

ठाणे जिल्ह्यातील ठाणे ह्या भागात:

ठाण्यामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट मधील वारली पाडा येथे बिबट्याने भल्या पहाटे हल्ला करून एका पाळीव कुत्र्याचा जागीच ठार केले. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या बिबट्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात:

मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात बिबट्यांचा शिरकाव झाला आहे. येथील पारिजात या इमारतीच्या परिसरामध्ये हा बिबट्या घुसला आणि बिबट्याने येथील तीन नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये ते तिघेही अतिशय गंभीर झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आला आहे. या तीनही जखमींमध्ये एका महिलेचा समावेश देखील आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात:

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी दोन महिन्यांच्या आत मध्ये एका साडेपाच वर्षाच्या मुलीचा, तेरा वर्षाच्या मुलाचा आणि एका वयोवृद्ध आजीचा असा तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी पेटवून दिली आणि आणि रास्ता रोको करून आंदोलन अतिशय तीव्र केले.

तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर ह्या तालुक्यांमध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व अकोले ह्या तालुक्यांमध्येही बिबट्यांचा अक्षरक्ष खूप वावर वाढला आहे. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

बिबट्यांचे हल्ले का वाढत आहेत?

बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होण्यामागे अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • जंगल क्षेत्रात घट: वनतोड, शहरीकरण आणि औद्योगिक विकासामुळे जंगलांचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.
  • अन्नाची कमतरता: जंगलामध्ये नैसर्गिक भक्ष्य (हरिण, ससा इ.) कमी झाल्यामुळे बिबट्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या प्राण्यांकडे (पाळीव जनावरे, कुत्रे) वळावे लागते. त्यामुळे ते गावाजवळ अधिक प्रमाणात दिसू लागतात.
  • शेतजमिनी आणि उसाचे पीक: उसासारखी उंच पिके बिबट्यांसाठी लपण्यासाठी सुरक्षित जागा ठरतात. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क वाढतो आणि काही वेळा हल्ल्यांच्या घटना घडतात.
  • मानवी हस्तक्षेप वाढणे: जंगलाच्या परिसरात मानवी वस्ती वाढल्यामुळे बिबट्यांच्या हालचालींवर परिणाम होतो. रस्ते, बांधकामे आणि इतर प्रकल्पांमुळे त्यांच्या हालचालींचे मार्ग बदलतात.
  • रात्रीच्या वेळेतील हालचाली: बिबट्ये प्रामुख्याने रात्री सक्रिय असतात. गावांमध्ये रात्री प्रकाश कमी असल्यास किंवा लोक एकटे फिरत असल्यास हल्ल्यांचा धोका वाढू शकतो.
  • जागरूकतेचा अभाव: काही वेळा नागरिकांकडून आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळेही अशा घटना घडतात. योग्य माहिती आणि प्रशिक्षणाचा अभाव हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे.

बिबट्यापासून बचावासाठी काय करावे? बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करता येईल याची माहिती पुढे दिली आहे.

बिबट्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

1) शांत राहा: घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे बिबट्याचे लक्ष वेधले जाऊ शकते.

2) डोळ्यात डोळे घालून पाहू नका, पण बिबट्याकडे तोंड ठेवा: बिबट्याकडे पाठ फिरवून पळू नका. त्याच्याकडे पाहून हळूहळू मागे सरका.


3) स्वतःला मोठे दाखवा: स्वताःला त्याच्यापेक्षा आपण ऊंच आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी दोन्हीही हात, पायाच्या टाचा ऊंच करून जोरजोरात ओरडत मागे चालत राहा आणि नंतर तिथून शक्य तितक्या लवकर निघून जा.


4) आवाज करा: जर बिबट्या खूप जवळ असेल तर जोरजोरात ओरडा.


5) मागे हटत राहा: बिबट्या पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत हळूहळू मागे चालत राहा.


6) संरक्षणासाठी वस्तू वापरा: तुमच्या हातात जे काही असेल, जसे की काठी, दगड किंवा फांदी, त्याचा वापर संरक्षणासाठी करा.


7) लवकर दूर जा: बिबट्या दूर गेल्यावर शक्य तितक्या लवकर वाघाच्या ठिकाणापासून दूर जा.


8) जर तुम्ही डोक्याच्या मागच्या भागावर मानवी मुखवटा परिधान केला तर स्वतःला बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवू शकता.

9) जर शेतकरी शेतात जात असतील तर त्यांनी हातात काठी, कोयता, कुऱ्हाड किंवा एखादे हत्यार जवळ ठेवले पाहिजे.

10) उसाच्या किंवा उंच पिकातून जात असताना मोठ्याने आवाज करत किंवा गाणे गात चालले पाहिजे. जेणेंकरून बिबट्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर तो पळून जाईल.

11) रात्री अपरात्री शेतात जात असताना बॅटरी सोबत असावी. जेणेंकरूम बिबट्या उजेडापासून लांब जाईल.

12) दिवसा शेतात काम करत असताना महिलांनी गळ्याभोवती एकादे कापड, ओढणी, स्कार्प गुंडाळावा तसेच पुरुषांनी देखील एखादे कापड, टॉवेल, मफलर गुंढाळवी. कारण हे प्राणी शक्यतो मानेवर हल्ला करतात.

13) दिवसा शेतात एकटे काम करत असताना मोबाईल किंवा रेडिओवर गाणी लावून काम करावे.

14) लहान मुलांना शेतात व घराबाहेर एकट्याला पाठवू नये.

उपाययोजना (वनविभाग आणि शासनाची भूमिका):

बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग आणि शासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. खालील उपाययोजना राबविल्यास अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते:

1) बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे: वनविभागाने संवेदनशील भागांमध्ये कॅमेरे (CCTV / Trap Camera) बसवून बिबट्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवावे. यामुळे बिबट्यांचा वावर आधीच ओळखून योग्य ती खबरदारी घेता येते.

2) रेस्क्यू आणि पकड मोहीम: ज्या भागांमध्ये बिबट्यांचा वारंवार वावर दिसतो, त्या ठिकाणी पिंजरे लावून किंवा तज्ज्ञांच्या मदतीने बिबट्यांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याची कार्यवाही करावी.

3) नागरिकांना सतर्कतेचे प्रशिक्षण: गावकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवून बिबट्यांपासून कसे सुरक्षित राहावे याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शाळा, ग्रामसभा आणि स्थानिक कार्यक्रमांद्वारे माहिती दिली जाऊ शकते.

4) तात्काळ प्रतिसाद पथक (Rapid Response Team): प्रत्येक संवेदनशील भागात वनविभागाचे तातडीने कार्य करणारे पथक तयार असावे, जे हल्ल्याची माहिती मिळताच लगेच घटनास्थळी पोहोचेल.

5) प्रकाश व्यवस्था सुधारणा: गावांमध्ये, शेतांमध्ये आणि रस्त्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था (Street Lights) करणे गरजेचे आहे. उजेडामुळे बिबट्यांचा वावर कमी होण्यास मदत होते.

6) नुकसान भरपाई आणि मदत: हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास शासनाने तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी. यामुळे पीडित कुटुंबाला आधार मिळतो आणि प्रशासनावर विश्वास वाढतो.

7) जंगल संवर्धन आणि अन्नसाखळी पुनर्स्थापना: जंगल क्षेत्र वाढवणे, नैसर्गिक भक्ष्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संतुलन राखणे हे दीर्घकालीन उपाय आहेत. यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वळण्याचा धोका कमी होतो.

8) धोकादायक क्षेत्रांची ओळख: ज्या भागांमध्ये बिबट्यांचे प्रमाण जास्त आहे, ते “High Risk Zone” म्हणून घोषित करून तेथे विशेष सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात.

माझा सल्ला:

सध्याच्या परिस्थितीत बिबट्यांचा वाढता वावर हा केवळ वन्यजीवांचा प्रश्न नसून तो मानव आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन बिघडल्याचा संकेत आहे. त्यामुळे या समस्येकडे फक्त भीती किंवा संतापाच्या दृष्टीने न पाहता, जबाबदारीने आणि समजून घेण्याची गरज आहे.

नागरिकांनी घाबरून जाण्याऐवजी योग्य ती खबरदारी घेणे, तसेच वनविभागाशी सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनानेही तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

निष्कर्ष (Conclusion):

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये बिबट्यांच्या वावरात झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. काही दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी योग्य उपाययोजना आणि जागरूकता यांच्या मदतीने या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

वनविभाग, शासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास अशा घटनांमध्ये निश्चितच घट होऊ शकते. सर्वांनी सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य देणे हीच सध्याच्या काळाची गरज आहे.

FAQs:

1) बिबट्या दिसल्यास काय करावे?
बिबट्या दिसल्यास घाबरून पळू नये. शांत राहून हळूहळू मागे सरकावे आणि आसपासच्या लोकांना सतर्क करावे.

2) बिबट्यांचे हल्ले का वाढत आहेत?
जंगल क्षेत्र कमी होणे, अन्नाची कमतरता आणि मानवी वस्ती वाढणे ही मुख्य कारणे आहेत.

3) बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
मोठ्याने आवाज करणे, गटाने फिरणे, रात्री एकटे न जाणे आणि हातात काठी ठेवणे यासारख्या उपायांनी संरक्षण करता येते.

4) बिबट्याचा वावर कोणत्या ठिकाणी जास्त असतो?
उसाचे पीक, जंगलालगतची गावे आणि शांत परिसर या ठिकाणी बिबट्यांचा वावर जास्त आढळतो.

5) हल्ला झाल्यास शासन मदत देते का?
होय, अशा घटनांमध्ये शासनाकडून नुकसान भरपाई आणि मदत दिली जाते (स्थानिक नियमांनुसार)

ही माहिती तुम्हाला कशी वाटली?

हा महत्त्वाचा लेख आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती कोणाचाही जीव वाचवू शकते. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीकरिता आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या. तुमच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्यास, खाली कमेंट करून आम्हाला सांगा.

Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये दिलेली माहिती ही उपलब्ध बातम्या, स्थानिक अहवाल आणि सामान्य मार्गदर्शन यावर आधारित आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कृपया स्थानिक प्रशासन किंवा वनविभागाशी त्वरित संपर्क साधावा. या लेखाचा उद्देश केवळ माहिती देणे आणि जनजागृती करणे हा आहे.

Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, ग्रामीण समस्या, वन्यजीव सुरक्षा, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *