MSRTC MEGA BHARTI 2026
एसटी महामंडळात मेगा भरती 2026: 17,742 पदांची मोठी घोषणा! कोणाला मिळणार प्राधान्य? संपूर्ण माहिती

MSRTC MEGA BHARTI 2026: एसटी महामंडळामध्ये 17 हजार 742 पदांची मेगा भरतीची घोषणा केली आहे. तरी ‘या’ उमेदवारांना थेट प्राधान्य मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे.

प्रस्तावना (Introduction):

MSRTC MEGA BHARTI 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे स्थायी रहिवासी असाल आणि त्याचबरोबर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची व सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने (MSRTC) तब्बल 17,742 पदांसाठी मेगा भरतीची घोषणा ही केली आहे. याची माहिती स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच विधान परिषदेमध्ये दिली.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती केवळ रिक्त जागा भरण्यासाठी नाही, तर संपूर्ण एसटी महामंडळ अधिक मजबूत आणि आधुनिक बनवण्यासाठी एक मोठा मास्टरप्लॅन आहे.

त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण पुढे तुम्हाला मिळणार आहे पात्रता, प्राधान्य, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटींबाबत संपूर्ण माहिती!

MSRTC MEGA BHARTI 2026

1) MSRTC MEGA BHARTI काय आहे:

मित्रांनो, या भरती करिता अर्ज करण्यापूर्वी MSRTC MEGA BHARTI काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. एसटी महामंडळ सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता आणि या सोबतच आपली सेवा अधिक विस्तारित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. यामध्येच बसेसचा तुटवडा देखील बघायला मिळतो आहे, म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावर चालक आणि वाहक भरतीचा निर्णय घेतला आहे.

ही भरती एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ८ हजार ३०० नव्या बसेससाठी करण्यात येणार आहे. नव्या बसेसची खरेदी केल्यानंतर त्या चालवण्यासाठी चालक आणि वाहकांची गरज आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळात सध्या चालक व वाहकांच्या पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती आवश्यक आहे. त्यासाठी चालक आणि वाहकांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.

2) एसटी महामंडळाची मेगा भरती का महत्त्वाची आहे?

एसटी महामंडळाची मेगा भरती का महत्त्वाची आहे कारण, एसटी महामंडळाचे सतत होणारे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी दळणवळणाची सुविधा अतिशय सुलभ करता येईल.

ह्या एसटी महामंडळाच्या मेगा भरती सुरवातीला काही पदे कंत्राटी स्वरूपात असली तरी भविष्यात ह्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. ही एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

अधिक वाचा: लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची तारीख वाढली, आता ‘ह्या’ तारखेपर्यंत करा अपडेट

3) एसटी महामंडळामध्ये मेगा भरती का केली जात आहे?

MSRTC सध्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आणि बस सेवा वाढवण्यासाठी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे.

  • दरवर्षी 5,000 नवीन बस खरेदीचे लक्ष्य
  • 8,000 बसची प्रक्रिया पूर्ण
  • 3,000 बस लवकरच रस्त्यावर

यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. ही निर्माण झालेली गरज भरून काढण्याकरिता आणि प्रवाशांना योग्य वेळेत चांगली सेवा देण्याकरिता तसेच ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळामध्ये मेगा भरती आवश्यक आहे.

MSRTC MEGA BHARTI 2026

4) MSRTC MEGA BHARTI 2026: पदांचा तपशील आणि आवश्यक माहिती:

एसटी महामंडळाच्या मेगा भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. यामध्ये चालक आणि वाहक या मुख्य पदांव्यतिरिक्त लिपिक, सहाय्यक आणि तांत्रिक पदांचा समावेश आहे. एकूण 17,742 पदे असल्याने इच्छुकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

माहितीचे वर्णनतपशीलवार
योजनेचे/भरतीचे नावMSRTC मेगा भरती २०२६
सरकारमहाराष्ट्र शासन
संबंधित विभागमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ)
एकूण पदे17,742 पदे
प्रमुख पदेचालक, वाहक, लिपिक, सहाय्यक, तांत्रिक पदे
अर्ज पद्धतऑनलाईन (लवकरच सुरू होईल)
अधिकृत वेबसाईटmsrtc.maharashtra.gov.in

एसटी महामंडळाची ही मेगा भरती एसटी महामंडळाला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक पदाचे विशेष महत्त्व आहे. चालक प्रवाशांना योग्य ठिकणी सुरक्षित पोहोचवतात, वाहक प्रवाश्यांचा प्रवास सुखकर करतात आणि लिपिक व तांत्रिक कर्मचारी संपूर्ण प्रणाली व्यवस्थित चालवत असतात.

5) एसटी महामंडळामध्ये मेगा भरतीसाठी कोणते पात्रता व निकष आहेत: (MSRTC Mega Bharti Eligibility Criteria)

प्रिय मित्रानो, एसटी महामंडळामध्ये मेगा भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील. पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी: अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा व्यक्ती हा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच काही पदांसाठी बारावी किंवा पदवीची आवश्यकता असू शकते.
  • वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षांपर्यंत शिथिलता (18 ते 43 वर्षे) देण्यात आली आहे.
  • चालकांसाठी विशेष पात्रता: अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे अवजड वाहन चालक परवाना असणे अनिवार्य आहे. हा परवाना वैध आणि अनुभवासह असणे महत्वाचे आहे.
पदशैक्षणिक पात्रताइतर अटी
चालकइयत्ता 10 वी उत्तीर्णअवजड वाहन चालक परवाना (Heavy License) आणि 1 वर्षाचा अनुभव.
वाहकइयत्ता 10 वी उत्तीर्णवाहक परवाना / बिल्ला (Conductor License / Batch) आणि 1 वर्षाचा अनुभव.
यांत्रिकइयत्ता 10 वी उत्तीर्णITI संबंधित क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान.
लिपिक-टंकलेखकपदवीधरमराठी टायपिंग (30 wpm) आणि इंग्रजी टायपिंग (40 wpm).
सहाय्यकइयत्ता 10 वी उत्तीर्ण

ह्या सर्व पात्रता पूर्ण करणारे उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी लागणारी कागदपत्रे आणि परवाने अद्ययावत आहेत कि नाही याची एकदा खातरजमा करून घ्यावी.

6) एसटी महामंडळामध्ये मेगा भरतीसाठी कुणाला प्राधान्य मिळणार? (MSRTC Mega Bharti Priority Criteria Explained)

2022 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संपाच्या काळात एसटीची सेवा निरंतर सुरु ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांना या भरतीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

ह्या काळात ह्या कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा सरकारचा उद्देश्य असल्याचे दिसून येत आहे. ह्या भरती प्रकियेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यामागील काही महत्त्वाची कारणे:

  • ह्या कर्मचाऱ्यांना आधीच अनुभव आहे.
  • ह्या कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत काम केले आहे.
  • यामुळे सरकार त्यांना स्थिरता देऊ इच्छिते.

अधिक वाचा: 10 लाखांपर्यंत कर्ज कसे मिळेल? पात्रता, फायदे आणि संपूर्ण माहिती

7) एसटी महामंडळात नोकरीचे फायदे (MSRTC Job Benefits)

Maharashtra State Road Transport Corporation मध्ये नोकरी मिळणे म्हणजे फक्त रोजगार नाही, तर सुरक्षित आणि स्थिर करिअरची सुरुवात आहे.

  • सरकारी नोकरीची सुरक्षितता: एसटी महामंडळ हे राज्य सरकारच्या अंतर्गत येते. त्यामुळे खाजगी नोकरीपेक्षा जास्त नोकरीची सुरक्षितता मिळते.
  • नियमित पगार + भत्ते: वेळेवर पगार मिळणे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता म्हणजे आर्थिक स्थिरता मिळते.
  • वैद्यकीय सुविधा: कर्मचारी आणि कुटुंबासाठी उपचार सुविधा मिळते. काही प्रकरणांमध्ये खर्चाची भरपाई मिळते.
  • प्रमोशन आणि करिअर ग्रोथ: अनुभव वाढला की पदोन्नतीची संधी मिळते.
  • फ्री/सवलतीत प्रवास: कर्मचारी आणि काही वेळा कुटुंबाला ST बसमध्ये सवलतीत किंवा मोफत प्रवास
  • पेन्शन आणि निवृत्ती फायदे: निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. तसेच PF आणि Gratuity यामुळे भविष्य सुरक्षित होते.
  • समाजात मान-सन्मान: सरकारी कर्मचारी म्हणून ओळख यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते.
  • कमीतकमी पात्रता: एसटी महामंडळात नोकरीच्या भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
  • आकर्षक वेतन: एसटी महामंडळात ही भरती कंत्राटी तत्त्वावर असून देखील कर्मचाऱ्याला महिन्याला 30,000 रुपयापर्यंत पगार मिळू शकतो.
  • अनुभव: सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या परिवहन संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो

8) एसटी महामंडळात भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे: ( MSRTC Mega Bharti Required Documents)

अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार करून ठेवणे कारण हि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला (LC)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला (डोमिसाईल प्रमाणपत्र)
  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा पदवी गुणपत्रिका
  • चालक परवाना (चालक पदासाठी / Heavy License) आणि बिल्ला (Badge)

वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन केलेली असावी जेणेकरून ती नीट वाचता येतील.

9) एसटी महामंडळात भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (MSRTC Mega Bharti How to apply online)

एसटी महामंडळाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. खालील दिलेल्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता.

  • मित्रांनो, सर्वप्रथम msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. ही एसटी महामंडळाची अधिकृत वेबसाईट आहे.
  • त्या नंतर ‘Recruitment’ किंवा ‘भरती’ या ऑप्शन वर क्लिक करा.
  • ‘MSRTC Mega Bharti 2026’ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा. यासाठी तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर लागेल.
  • आता अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. प्रत्येक कागदपत्रांसाठी योग्य साईज आणि फॉरमॅटचा वापर करा.
  • परीक्षा शुल्क (असल्यास) ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

10) एसटी महामंडळात भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत: (MSRTC Mega Bharti How to apply offline)

  • अर्जदाराला आपल्या नजीकच्या एसटी बस स्थानकात जाऊन सदर भरतीचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत विचारलेली कागदपत्रे जोडावी लागतील.
  • आणि अर्ज बस स्थानकातील अधिकाऱ्याजवळ जमा करावा.
  • ऑफलाईन अर्ज जमा केल्यावर तुम्हाला याची पोचपावती दिली जाईल.

अधिक वाचा: दरमहा ₹3000 पेन्शन! e-Shram Card धारकांसाठी मोठी खुशखबर 2025

11) एसटी महामंडळात भरतीसाठी निवड प्रक्रिया (MSRTC Mega Bharti Selection Process)

  • लेखी परीक्षा (काही पदांसाठी)
  • कौशल्य चाचणी (Driving / Typing)
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम निवड यादी

12) एसटी महामंडळात भरतीसाठी संपर्क तपशील: (MSRTC Mega Bharti Contact Details)

तुम्ही खालील संपर्क तपशिलांवर संपर्क साधू शकता.

  • टोल फ्री नंबर: संपर्क करण्याकरिता टोल फ्री नंबर १८०० २२ १२४९
  • पत्ता: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, मुंबई

टीप: एसटी महामंडळामध्ये 17 हजार 742 पदांची मेगा भरतीची घोषणा केली आहे. अधिकृत जाहिरात येणे बाकी आहे. अधिकृत जाहिरात येताच येथे अपडेट देण्यात येईल. ही माहिती अधिकृत घोषणेवर आधारित असून अंतिम जाहिरातीनुसार बदल होऊ शकतात.

“ही माहिती Maharashtra State Road Transport Corporation कडून जाहीर झालेल्या विधानावर आधारित आहे. अधिकृत जाहिरात येणे बाकी आहे.”

माझा वैयक्तिक अनुभव:

मित्रांनो, आज महाराष्ट्रातील हजारो तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाची ही मेगा भरती अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरू शकते. ही फक्त नोकरी नाही, तर एक स्थिर आणि सुरक्षित भविष्यासाठीची सुरुवात आहे.

एसटी महामंडळ म्हणजे फक्त एक नोकरी नाही, तर अनेक घरांसाठी “आधार” आहे. मी स्वतः अशा अनेक लोकांना पाहिलं आहे ज्यांनी एसटीमध्ये चालक किंवा वाहक म्हणून काम करत आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली.

2022 च्या संपाच्या काळात अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीतही काम सुरू ठेवलं. त्यांची मेहनत आणि समर्पण खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यामुळे यावेळी त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय हा केवळ प्रशासनिक नसून मानवी दृष्टिकोनातूनही योग्य वाटतो.

माझ्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सांगू शकतो अशा मोठ्या भरतीमध्ये फक्त पात्रता पुरेशी नसते, तर योग्य वेळी योग्य माहिती मिळणं आणि तयारी सुरू करणं खूप महत्त्वाचं असतं.

जर तुम्ही आजपासूनच तुमचे Documents Ready ठेवले, Driving License किंवा Technical Skills अपडेट केले आणि नियमितपणे अधिकृत अपडेट्स पाहत राहिलात, तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.

आज अनेक जण “सरकारी नोकरी मिळत नाही” असं म्हणतात, पण खरी गोष्ट अशी आहे की योग्य वेळी योग्य action घेणे आवश्यक असते.

माझा सल्ला:

माझ्या मते, ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे त्यांनी वेळ वाया न घालवता तयारी सुरू करावी. विशेषतः चालक आणि वाहक पदांसाठी स्पर्धा जास्त असणार आहे.

Driving License तयार ठेवा, ITI / Technical Skills अपडेट ठेवा, Documents Ready ठेवा आणि रोज अपडेट चेक करत राहा. कारण ही भरती मोठ्या प्रमाणात आणि जलद होण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष (Conclusion):

एसटी महामंडळाची मेगा भरती 2026 ही केवळ एक भरती प्रक्रिया नसून महाराष्ट्रातील हजारो तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. 17,742 पदांची ही सुवर्णसंधी अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देऊ शकते आणि बेरोजगारीवर मोठा उपाय ठरू शकते.

विशेष म्हणजे, अनुभवी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्राधान्य ही या भरतीची एक महत्त्वाची बाब आहे, ज्यामुळे आधीपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थिर भविष्य मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्याचबरोबर नवीन उमेदवारांसाठीही ही एक उत्तम संधी आहे, ज्यामुळे त्यांना सरकारी नोकरीत प्रवेश मिळू शकतो.

जर तुम्ही पात्र असाल, तर ही संधी अजिबात दवडू नका. आजपासूनच तयारी सुरू करा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अधिकृत जाहिरातीची वाट पाहत सतर्क रहा. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो.

FAQs:

1) एसटी महामंडळात किती जागांसाठी भरती होणार आहे?
मित्रांनो एसटी महामंडळ अंतर्गत एकूण 17,742 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

2) MSRTC Mega Bharti 2026 साठी कोणाला प्राधान्य मिळणार?
2022 संपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरतीसाठी प्राधान्य मिळणार आहे.

3) MSRTC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होणार?
लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

4) किमान शिक्षण किती आवश्यक आहे?
किमान 10 वी पास शिक्षण आवश्यक आहे

5) चालक पदासाठी काय आवश्यक आहे?
१० वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना (Heavy License) असणे आवश्यक आहे.

6) ही नोकरी कायमस्वरूपी आहे का?
सुरुवातीला कंत्राटी, नंतर कायम होण्याची शक्यता आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली?

जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसेच अशाच सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये दिलेली माहिती विविध स्त्रोतांवर आधारित आहे. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी कृपया MSRTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *