Leopard Attack
Leopard Attacks 2025-2026: आई वडिलांच्या डोळ्यातदेखत उचलून नेल, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्यामध्ये (Gondia Leopard Attack) एका 4 वर्षे चिमुकल्याला बिबट्याने घराच्या मागच्या अंगणातून उचलून नेलं आणि प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यावर त्या गावातील नागरिक खूप संताप व्यक्त करत आहेत.

Leopard Attacks 2025-2026: गेल्या 2025 ह्या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या बिबट्यांच्या दहशतीच्या आणि हल्ल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. पुणे, रायगड, गोंदिया, अहिल्यानगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर खूप वाढलेला आहे. अनेक खेड्यांमध्ये बिबट्या मुक्त संचार करताना दिसून येत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्यातील (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील खडकी हे (डोंगरगाव) आहे. खडकी (डोंगरगाव) गावात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अतिशय दुःखनीय घटना घडली. ह्या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसर दुःखीत अंतकरणाने पिळवटून निघाला आहे. बिबट्याने ह्या 4 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला आणि ह्या चार वर्षाच्या चिमुकल्याला घरातून उचलून नेले. ह्या हल्ल्यांमध्ये त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाला. ह्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ह्या चार वर्षाच्या चिमुकल्याचे नाव हीयांश शिवशंकर रहांगंडाले असे आहे.

Leopard Attack

अधिक वाचा: 2026 मध्ये हे ‘4’ मूलांक असलेल्यांचे नशीब चमकणार. सूर्यदेवाची राहणार विशेष कृपा

Leopard Attacks 2025-2026: नुकतेच गोंदिया जिल्ह्यामध्ये (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील खडकी ह्या गावातील एका 4 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याची दुःखदायक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याने घरातील अंगणातून या चार वर्षाच्या चिमुकल्याला उचलून नेल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत असून शासनाविरुद्ध राग व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील खडकी या गावात सकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्याने 4 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करून ह्या चिमुकल्याला घरातून उचलून नेले. हा 4 वर्षाचा चिमुकला त्याच्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. अशावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ह्या 4 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्या चिमुकल्याला त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातदेखत उचलून नेले.

हीयांशच्या आई वडिलांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या हीयांश घेऊन तेथून निघून गेला. यामध्ये त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशावेळी गावकरी त्या बिबट्याच्या मागे धावले परंतु बिबट्याने त्या मुलाला रस्त्यावर सोडून दिले आणि त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू झाला होता. या संपूर्ण घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून वनविभागाबाबत संपूर्ण गावकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

Leopard Attack

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्यामध्ये (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील खडकी ह्या गावातील चार वर्षाच्या हीयांशचा त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात देखत जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. हीयांशच्या आई-वडिलांची अवस्था पाहून संपूर्ण गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या संपूर्ण घटनेचा गावकरी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करून त्या नरभक्षी बिबट्याला दिसता क्षणीच मारून टाका अशी गावकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे.

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्यातील (Gondia Leopard Attack) खडकी व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी अनेकदा वन विभागाकडे केली आहे. परंतु वेळेवर योग्य उपाययोजना न केल्याने पुन्हा एकदा एका निष्पाप चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे त्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकरी सुद्धा अतिशय हळहळ व्यक्त करत आहेत. याकरिता प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि त्या कुटुंबाला योग्य ती मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leopard Attacks 2025-2026: विशेष म्हणजे या अगोदर दोन महिन्यापूर्वीच गोंदिया जिल्ह्यामधील (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथील रुची देवानंद पारधी (9 वर्षाच्या) ही तिच्या आई-वडिलांसोबत शेतात गेली असताना तिच्यावर बिबट्याने प्राण घातक हल्ला केला. यामध्ये रुची देवानंद पारधी ह्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. यामुळे तिरोडा तालुक्यात वारंवार बिबट्यांचे हल्ले होत असल्याने तालुक्यातील सर्वच ठिकाणी बिबट्याच्या दहशतीची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यादरम्यान तेथील ग्रामस्थांनी वन विभागावर आपला राग व्यक्त केला आहे.

अधिक वाचा: शनिची साडेसाती कशी दूर कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leopard Attacks 2025-2026: नाशिकच्या सिन्नर तालुक्यात:

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवडी या गावात गोरख जाधव हा तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला होता, सकाळी साडेअकराच्या सुमारास गोरख जाधव विहिरी जवळ जेवण करण्यासाठी बसला असता बिबट्याने (Leopard Attack) अचानक त्याच्यावर हल्ला केला. अशावेळी स्वतःला वाचवण्यासाठी गोरख जाधव याने प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्याच्या धडपडीत तो शेतातील विहिरीत पडला आणि बिबट्याने देखील त्याच्यापाठोपाठ विहिरीत उडी मारली. या हल्ल्यामध्ये त्या तरुणाचा आणि बिबट्याचा या दोघांचाही विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.

Leopard Attacks 2025-2026: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात:

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये (Leopard Attack) 4 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील शेतकरी सुरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. सुरज दिलीप कडलग हे गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते तर त्या चिमुकल्याची आजी गवताची ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी 4 वर्षीय सिद्धेश सुरज कडलग हा घराच्या दारात उभा होता. अशावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सिद्धेश्वर हल्ला केला आणि ह्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय सिद्धेश जागीच ठार झाला.

Leopard Attacks 2025-2026: पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यात:

पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील आष्टापुर येथील अंजना वाल्मीक कोतवाल ह्या एकदम पहाटे दशक्रियासाठी घराबाहेर निघाल्या होत्या तेव्हाच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या पायावर हल्ला (Leopard Attack) केला. सुरुवातीला अंजना यांना हा कुत्र्याचा हल्ला आहे असा वाटल्याने त्या दगड उचलण्यासाठी खाली वाकल्या असता बिबट्याने त्यांच्या अंगावर पुन्हा झेप घेतली. अंजना यांनी जोरदार आरडाओरड करत मदतीसाठी हाका मारल्या. त्यांच्या या आरडाओरडीने बिबट्या घाबरला आणि तेथून पळून गेला. यामध्ये अंजना यांच्या पायाला जखम झाली असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.

Leopard Attacks 2025-2026: ठाणे जिल्ह्यातील ठाणे ह्या भागात:

ठाण्यामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट मधील वारली पाडा येथे बिबट्याने भल्या पहाटे हल्ला (Leopard Attack) करून एका पाळीव कुत्र्याचा पूर्णपणे फडशा पाडला आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या बिबट्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Leopard Attacks 2025-2026: मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात:

मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात बिबट्यांचा शिरकाव झाला आहे. येथील पारिजात या इमारतीच्या परिसरामध्ये हा बिबट्या घुसला आणि बिबट्याने (Leopard Attack) येथील तीन नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये ते तिघेही अतिशय गंभीर झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आला आहे. या तीनही जखमींमध्ये एका महिलेचा समावेश देखील आहे.

Leopard Attacks 2025-2026: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात:

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी दोन महिन्यांच्या आत मध्ये एका साडेपाच वर्षाच्या मुलीचा, तेरा वर्षाच्या मुलाचा आणि एका वयोवृद्ध आजीचा असा तिघांचा बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी पेटवून दिली आणि आणि रास्ता रोको करून आंदोलन अतिशय तीव्र केले.

तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर ह्या तालुक्यांमध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व अकोले ह्या तालुक्यांमध्येही बिबट्यांचा अक्षरक्ष खूप वावर वाढला आहे. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याचा संपूर्ण मनुष्य जातीला संकट निर्माण झाले आहे. बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करता येईल याची माहिती पुढे दिली आहे.

Leopard Attacks 2025-2026: बिबट्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी?


1) शांत राहा: घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे वाघाचे लक्ष वेधले जाऊ शकते.

2) डोळ्यात डोळे घालून पाहू नका, पण वाघाकडे तोंड ठेवा: वाघाकडे पाठ फिरवून पळू नका. त्याच्याकडे पाहून हळू हळू मागे सरका.


3) स्वतःला मोठे दाखवा: स्वताःला त्याच्यापेक्षा आपण ऊंच आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी दोन्हीही हात, पायाच्या टाचा ऊंच करून जोरजोरात ओरडत मागे चालत राहा आणि नंतर तिथून शक्य तितक्या लवकर निघून जा.


4) आवाज करा: जर वाघ खूप जवळ असेल तर जोरजोरात ओरडा.


5) मागे हटत राहा: वाघ पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत हळू हळू मागे चालत राहा.


6) संरक्षणासाठी वस्तू वापरा: तुमच्या हातात जे काही असेल, जसे की काठी, दगड किंवा फांदी, त्याचा वापर संरक्षणासाठी करा.


7) लवकर दूर जा: वाघ दूर गेल्यावर शक्य तितक्या लवकर वाघाच्या ठिकाणापासून दूर जा.


8) जर तुम्ही डोक्याच्या मागच्या भागावर मानवी मुखवटा परिधान केला तर स्वतःला बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवू शकता.

9) जर शेतकरी शेतात जात असतील तर त्यांनी हातात काठी, कोयता, कुऱ्हाड किंवा एखादे हत्यार जवळ ठेवले पाहिजे.

10) उसाच्या किंवा उंच पिकातून जात असताना मोठ्याने आवाज करत किंवा गाणे गात चालले पाहिजे. जेणेंकरून बिबट्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर तो पळून जाईल.

11) रात्री अपरात्री शेतात जात असताना बॅटरी सोबत असावी. जेणेंकरूम बिबट्या उजेडापासून लांब जाईल.

12) Leopard Attacks 2025-2026: दिवसा शेतात काम करत असताना महिलांनी गळ्याभोवती एकादे कापड, ओढणी, स्कार्प गुंडाळावा तसेच पुरुषांनी देखील एखादे कापड, टॉवेल, मफलर गुंढाळवी. कारण हे प्राणी शक्यतो मानेवर हल्ला करतात.

13) दिवसा शेतात एकटे काम करत असताना मोबाईल किंवा रेडिओवर गाणी लावून काम करावे.

14) Leopard Attack: लहान मुलांना शेतात व घराबाहेर एकट्याला पाठवू नये.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *