Shani Dev Puja 2026: तुमच्या आयुष्यात अचानक समस्या वाढल्या आहेत का? नोकरी, पैसा, आरोग्य सगळं बिघडतंय? तर कदाचित शनिची साडेसाती सुरू झाली असू शकते. सूर्यपुत्र शनिदेव हे न्यायदेवता म्हणजेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना शांत करून साडेसाती कशी दूर करता येईल याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
प्रस्तावना:
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्म आणि न्यायाचे देवता म्हणून मानले जाते, शनिदेवांची वक्रदृष्टी ही अतिशय कठोर मानली जात असली, तरीही जे लोक धार्मिकतेने वागतात त्यांच्यासाठी ती एक वरदानच ठरते. असे म्हटले जाते की, शनिदेव प्रत्येक व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात.
लोकांना शनिच्या साडेसातीची आणि धैय्याची खूप भीती वाटत असते. परंतु काही चांगल्या सवयी आणि कृती ह्या शनिदेवांना आनंदी ठेवतात आणि आपल्या जीवनात येणाऱ्या मोठ्या संकटांना दूर ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना आनंदी ठेवण्यासाठी काय करावे लागेल व कोणत्या कृती कराव्या लागतील हे आपण येथे जाणून घेऊया.
1) शनिदेव कोण आहेत?
शनिदेवांना न्यायदेवता असेही म्हटले जाते. शनिवारचा दिवस हा श्री शनिदेवांना समर्पित आहे.
आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, शनिदेव सर्वांच्या कर्मांचा हिशोब ठेवणारे न्यायदेवता आहेत आणि त्यानुसार प्रत्येकाला फळ देतात. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनिदेवाची साडेसाती, महादशा, शनिदोष असे अनेक प्रकारच्या समस्या असतात.

अधिक वाचा: Lucky Mulank Of 2026: 2026 मध्ये ‘हे’ मूलांक असलेल्यांचे नशीब चमकणार. सूर्यदेवाची राहणार कृपा
2) शनिदेवाची साडेसाती म्हणजे काय? साडेसाती किती वर्षे असते?
साडेसाती म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या राशीवर होणारा प्रभाव होय. शनिदेवाच्या साडेसातीचा कार्यकाल 7.5 वर्षे इतका असतो.
- आपल्या हिंदू समाजामध्ये शनि या ग्रहाला क्रूर ग्रह असे मानले जाते. परंतु शनि हा शत्रू नसून तो आपल्या सर्वांचा मित्र ग्रह आहे. शनिदेव हे ह्या कलयुगाचे न्यायाधीश आहेत आणि ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतात.
- परंपरेनुसार असे मानले जाते की, शनिदोष किंवा शनिदेवाची साडेसाती असल्यास व्यवसायात नुकसान, नोकरीत अडचणी, नको त्या ठिकाणी नोकरीची बदली होणे, कर्ज, कौटुंबिक भांडणे सर्व प्रकारची संकटे, रोग, आर्थिक नुकसान, मानसिक वेदना आणि शारीरिक व्याधी अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
- ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शनिची साडेसाती असताना शनि ग्रह शांत करण्यासाठी व शनिदेवांना आनंदी करण्यासाठी काही उपाय आणि कृती करणे फायदेशीर ठरते. कारण हे उपाय व ही कामे केल्याने शनि देवाकडून आपल्याला चांगले परिणाम मिळतात आणि अशुभ प्रभाव नष्ट होण्यास मदत होत असते.
- ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव हे न्याय देवता आहेत. शनिवार हा शनिदेव आणि काळभैरवाला समर्पित आहे. काही लोकांच्या मते शनिदेवांचा स्वभाव हा अतिशय आक्रमक असल्यामुळे त्यांचा संपूर्ण सजीव सृष्टीवर प्रभाव पडतो.
- शनि देवांची पूजा आणि प्रार्थना जर व्यक्तींनी नियमित पद्धतीने केल्यास अशी मान्यता आहे की, आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होऊ शकते, समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा मिळू शकते आणि आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

अधिक वाचा: नवीन वर्षात तुमच्या घरात येईल पैसाच पैसा? जाणून घ्या सोप्या वास्तू टिप्स
3) Shani Dev Puja 2026: शनिदेवांचा जन्म कसा झाला?
पौराणिक कथेनुसार सूर्य देवाचा विवाह प्रजापती दक्ष यांची कन्या संग्या हिच्याशी झाला होता. संग्याला सूर्य देवापासून यम, यमुना आणि मनू ही मुले झाली. परंतु पत्नी संग्या सूर्य देवाचा प्रताप बऱ्याच काळ सहन होत नव्हता. यामुळे संग्याने सूर्य देवांच्या सेवेसाठी आपली सावली निर्माण करून ती त्यांच्याजवळ सोडली. त्यानंतर काही दिवसांनी ह्या सावली पासून म्हणजेच छाया पासून शनीदेवांचा जन्म झाला.
4) ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची साडेसाती दूर करण्यासाठी व शनिदेवांना आनंदी करण्यासाठी काही उपाय खाली देण्यात आलेले आहेत:
- शनि मंत्राचा नियमित जप करा.
- शनि देवाची नियमित पूजा करावी.
- शनिवारी हनुमानाची पूजा करावी.
- मामा आणि वडीलधारी लोकांचा सन्मान करावा.
- शनिवारी किंवा दररोज बजरंग बाणाचे पाठ करावे.
- शनी मंदिरामध्ये शनि देवाच्या मूर्ती जवळ तेलाचा दिवा लावा.
- शनिवारी काळे तीळ, काळे कपडे, लोखंडाच्या छोट्या वस्तू दान करा.
- कर्मचाऱ्यांना आणि छोट्या नोकरदारांना नेहमी खुश ठेवावे
- शनिवारी रबर, लोखंड अशा वस्तू खरेदी करणे टाळावे.
- राधा आणि कृष्णाची नियमित आराधना करा.
- शनि यंत्राची नियमित पूजा अर्चना करा.
- कुत्र्यांची सेवा करा त्यांना खायला अन्न द्या.
- शनिवार हा शनिदेवाचा असल्याने शनिवारी उपवास करा.
- शनीच्या साडेसातीच्या काळात दारू आणि मांसाहाराचे सेवन टाळावे.
- साडेसातीच्या काळात सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल.
- शनी मंदिरात जाऊन शनि देवांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावे.
- शनिची साडेसाती असलेल्यांनी शनिवारी काळे वस्त्र परिधान करून शनि देवांची पूजा करावी.
- नियमित गरजूंना मदत करा आणि दानधर्म करा त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो.
- शनि देवाला स्वच्छता आणि शिस्त आवडते म्हणून कपडे आणि शरीर स्वच्छ ठेवा आणि सर्व कामांमध्ये शिस्त अमलात आणा.
- शनी ग्रहाची निगडित असलेल्या वस्तूंचे शनिवारी दान करा. (आखे उडीद, लोखंड, तीळ, तेल, तिळाच्या बिया, काळे कपडे इतर)
वरील दिलेले सर्व उपाय हे ज्योतिषशास्त्रानुसार शनिची साडेसाती दूर करण्यासाठी देण्यात आलेले आहेत.
5) खालील शनि मंत्रांचा नियमित जप करावा:
शनि बीज मंत्र:
ॐ शं शनैश्चराय नमः
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः!
“ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्”
दररोज संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी हे मंत्र 108 वेळा जपावे.
धार्मिक ग्रंथांनुसार, शनि देवाची पूजा केल्याने आणि शनि मंत्राचा जप केल्याने मनुष्याच्या जीवनात साडेसातीच्या काळात होणार प्रभाव कमी होण्यास मदत होते.
6) श्री शनि देवाची आरती:
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || १ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || २ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
विक्रमासारिखा हो | शककर्ता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || ३ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || ४ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || ५ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || ६ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
|| श्री शनि अष्टक ||
हेचि दान देगा शनि |
जडो चित्त तुझे चरणी ||
माझे चित्त तुझे चरणी |
शनि माझी कामधेनू |
शनि माझा कल्पतरू ||
शनि सुखाची साऊली |
शनि मायेची माऊली ||
माझी श्रद्धा शनिवरी |
तेचि नेति पैलतिरी ||
मी आहे तुझा दास |
तुझे चरणी माझा वास ||
नवग्रहा मध्ये थोर |
तुझा महिमा अपार ||
तुझी कृपा ज्यासी झाली |
तोचि झाला भाग्यशाली ||
तुझे नाम घेता मुखी |
होई जीवनात सुखी ||
मारुतीची भक्ती करी |
त्यासी शनिदेव तारी ||
भेटी आलो शनिवारी |
माझे दुःख तू निवारी ||
7) नियमित शनि पूजेमुळे अडचणी कशा दूर होतात?
- ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र या दोघांनंतर शनिदेव हे अतिशय जास्त प्रभावशाली ग्रह म्हणून मानले जातात. शनी देवाची साडेसाती, शनिदोष आणि त्याचे होणारे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करण्यात येते.
- धार्मिक ग्रंथांनुसार, शनिची साडेसाती असलेल्या लोकांनी जर नियमितपणे शनिवारी शनि देवाची पूजा केल्यास अशा व्यक्तींच्या आयुष्यामधील सर्व अडचणी, अडथळे दूर होऊ शकतात.
- तसेच त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्यावर अतिशय चांगले परिणाम होऊन त्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे.
8) कठीण काळात शनिदेव कसे देतात साथ?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव हे केवळ शिक्षा देणारेच ग्रह नाहीत तर ते प्रत्येक व्यक्तीच्या योग्य मार्गासाठी मार्गदर्शक म्हणून देखील अत्यंत प्रभावी असे आहेत.
जे आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, संयम आणि सेवेची भावना बाळगतात अशांना शनिदेव त्यांच्या कठोर काळात देखील अतिशय चांगले परिणाम देत असतात, त्या व्यक्तींच्या जीवनातले अडथळे दूर करतात आणि त्यांना सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी शनिदेव सहाय्यक ठरतात.
9) कर्मानुसार शनि देतो फळ – चांगले की वाईट?
अशी मान्यता आहे की, व्यक्तीचे चांगले कर्म चांगले फळ, वाईट कर्म वाईट फळ
- काही लोकांच्या मते, शनि हा अशुभ ग्रह मानला जातो, पण शनि ग्रहाचे परिणाम हे नेहमीच वाईट नसतात, हे त्या व्यक्तीच्या कर्माच्या आधारे देण्यात येतात, जर त्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल तर साडेसातीच्या काळात देखील शनिदेव त्यांना चांगले फळ देतात. जर त्या व्यक्तीचे कर्म वाईट असतील तर शनिदेव त्यांना त्यांच्या कर्मानुसार वाईट फळ देतात.
- शनि देवाची चाल ही अतिशय मंद आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळणारे परिणाम देखील उशिरा मिळतात. मकर आणि कुंभ या दोन्हीही राशींचा स्वामी शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नियमित शनि देवाची पूजा करणे आवश्यक आहे.
- वर दिलेल्या संपूर्ण लेखांमध्ये शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी आणि शनिची साडेसाती दूर करण्यासाठी अतिशय चांगले आणि प्रभावी उपाय दिले आहेत. धार्मिक ग्रंथांनुसार, जर साडेसातीच्या काळात तुम्ही शनिदेवाचे हे उपाय केले तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो.
- जर शनि मंत्रांचा नेहमीच जप केला आणि शनि यंत्राची नियमित पूजा केल्यास त्या व्यक्तीला अतिशय चांगले बदल अनुभवायला मिळतात. यामुळे साडेसातीच्या काळात देखील तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये यश, मानसन्मान, चांगले आरोग्य, कौटुंबिक सुख चांगले मिळते अशी मान्यता आहे.
10) 2026 मध्ये कोणत्या राशींवर साडेसाती आहे?
2026 मध्ये शनि मुख्यत मीन (Pisces) राशीत असेल. त्यामुळे साडेसाती या 3 राशींवर चालू आहे..
- कुंभ रास: शेवटचा टप्पा
- मीन रास: मधला टप्पा
- मेष रास: सुरुवातीचा टप्पा
साडेसाती सर्वांसाठी सारखी नसते. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जन्मकुंडलीवर, कर्मावर आणि इतर ग्रहांच्या स्थिती नुसार अवलंबून असते.
11) 2026 मध्ये शनिची साडेसाती संपूर्ण माहिती:
| रास | साडेसाती टप्पा | कालावधी | काय जाणवू शकते? | काय करणे योग्य? |
| कुंभ | शेवटचा टप्पा | साडेसाती संपत येते | हळूहळू अडचणी कमी होणे, स्थिरता येणे | संयम ठेवा, मेहनत सुरू ठेवा |
| मीन | मधला टप्पा | मध्यम | जबाबदाऱ्या वाढणे, मानसिक ताण | शिस्त, नियोजन आणि संयम आवश्यक |
| मेष | सुरुवातीचा टप्पा | साडेसातीची सुरुवात | अचानक बदल, नवीन आव्हाने | निर्णय काळजीपूर्वक घ्या |
महत्वाची सूचना: साडेसातीचे परिणाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात. हे सर्व ज्योतिषशास्त्रीय मान्यतेवर आधारित अंदाज आहेत.
12) ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीच्या काळात उपाय केल्यानंतर काही लोकांना आलेले अनुभव:
उदाहरण 1: नोकरीतील अडचणी आणि साडेसाती
पुण्यातील एक 30 वर्षीय IT क्षेत्रातील कर्मचारी प्रशांत (नाव बदलून) गेल्या काही महिन्यांपासून नोकरीत सतत अडचणींचा सामना करत होता. वरिष्ठांसोबत वाद, मानसिक ताण वाढणे आणि अचानक प्रोजेक्टमधून काढणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या.
ज्योतिष सल्ल्यानुसार त्याच्या कुंडलीत शनिची साडेसाती सुरू असल्याचे सांगण्यात आले. ज्योतिषशास्त्रानुसार, यानंतर त्याने काही साधे उपाय सुरू केले:
- दर शनिवारी शनि मंत्र जप करणे.
- हनुमान चालीसा पठण करणे.
- काळे तीळ दान करणे.
त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात झाली आणि मनावरचा ताण कमी झाला. त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि कामात स्थिरता आली.
टीप: हा अनुभव वैयक्तिक असून परिणाम व्यक्तिनुसार वेगवेगळे असू शकतात.
उदाहरण 2: आर्थिक अडचणी आणि उपाय
नाशिकमधील एक लहान व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अचानक आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ग्राहक कमी होणे, व्यवसायात मंदी येणे आणि कर्ज वाढणे अशा समस्या वाढल्या. त्यांनी श्रद्धेने खालील उपाय सुरू केले.
- शनिवारी तेलाचा दिवा लावणे.
- गरजूंना अन्नदान करणे.
- काळे कपडे आणि तीळ दान करणे.
त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात झाली आणि त्यांच्या व्यवसायात थोडी सुधारणा दिसू लागली आणि आर्थिक स्थिती स्थिर होऊ लागली.
टीप: हे उपाय श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत.
उदाहरण 3: मानसिक ताण आणि आरोग्य
मुंबईतील एक गृहिणी (वय 40) सतत मानसिक ताण, भीती आणि आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त होती. घरातील वातावरणही तणावपूर्ण झाले होते. त्या गृहिणीने खालील उपाय नियमितपणे केले.
- शनिवारी उपवास करणे.
- रोज 108 वेळा शनि मंत्र जप करणे.
- कुत्र्यांना अन्न देणे.
त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात झाली आणि काही आठवड्यांनंतर तिला मानसिक शांती मिळू लागली आणि तिच्या आरोग्यातही सुधारणा जाणवली.
टीप: हा अनुभव वैयक्तिक आहे आणि सर्वांना समान परिणाम मिळतीलच असे नाही.
माझा वैयक्तिक अनुभव:
प्रिय वाचक मित्रांनो, गेल्या काही वर्षांत मी धार्मिक आणि ज्योतिष विषयांवर लेखन करताना अनेक वाचकांचे अनुभव, प्रतिक्रिया आणि प्रश्न जवळून पाहिले आहेत. विशेषतः साडेसातीच्या या काळाबद्दल लोकांच्या मनात खूप भीती आणि संभ्रम दिसून येतो.
माझ्या निरीक्षणानुसार, साडेसाती सुरू झाली की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बदल होतात. काहींसाठी हे आव्हानात्मक असते, तर काहींसाठी शिकण्याचा आणि प्रगतीचा काळ ठरतो. काही वाचकांनी सांगितले की या काळात त्यांना नोकरीत अडचणी, आर्थिक ताण किंवा मानसिक दबाव जाणवला. तर काहींनी याच काळात नवीन संधी, जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील मोठे निर्णय घेतले.
यावरून मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली ती म्हणजे साडेसाती हा केवळ भीतीचा विषय नाही, तर तो आपल्याला अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवणारा काळ देखील असू शकतो.
माझा सल्ला:
माझ्या मते,
- जीवनात आलेल्या बदलांना घाबरू नका, त्यांना समजून घ्या.
- नियमितता, प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे
- धार्मिक उपाय करत असाल तर ते श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करावे.
- आर्थिक आणि वैयक्तिक निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
- गरजूंना मदत करणे आणि चांगले कर्म करणे हे नेहमीच चांगले कार्य आहे.
महत्वाची नोंद: या लेखातील माहिती ही धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. उपाय आणि अनुभव व्यक्तिनुसार वेगवेगळे असू शकतात. कोणताही निर्णय घेताना आपल्या परिस्थितीनुसार विचार करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष (Conclusion):
शनिदेव हे केवळ कठोर शिक्षा देणारे ग्रह नसून ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. शनिची साडेसाती ही घाबरण्याची गोष्ट नसून ती आपल्या कर्मांचे परीक्षण करणारा एक काळ असतो.
या काळात संयम, प्रामाणिकपणा, सेवा भावना आणि योग्य आचरण ठेवले तर शनिदेवांची कृपा होऊ शकते. तसेच नियमित पूजा, मंत्रजप आणि दानधर्म केल्यास साडेसातीचे अशुभ परिणाम कमी होऊन जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.
म्हणूनच, भीती न बाळगता योग्य उपाय आणि चांगले कर्म यांचा अवलंब केल्यास साडेसाती देखील यश आणि प्रगतीचा मार्ग बनू शकतो.
FAQs:
1) शनिची साडेसाती किती वर्षे असते?
शनिची साडेसाती साधारणपणे 7.5 वर्षांची असते आणि ती तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते.
2) साडेसाती नेहमी वाईट परिणाम देते का?
नाही, साडेसाती नेहमी वाईट परिणाम देत नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार, व्यक्तीच्या कर्मानुसार चांगले परिणाम देखील मिळू शकतात.
3) शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी सोपा उपाय कोणता?
शनिवारी शनि मंत्राचा जप करणे, काळे तीळ दान करणे आणि गरजूंना मदत करणे हे सोपे उपाय आहेत.
4) साडेसातीमध्ये काय टाळावे?
खोटे बोलणे, अन्याय करणे, वडीलधाऱ्यांचा अपमान आणि वाईट सवयी टाळाव्यात.
5) शनिवारी कोणती पूजा करावी?
शनिदेवांची पूजा, हनुमानाची पूजा आणि तेलाचा दिवा लावणे हे शनिवारी विशेष मानले जाते.
6) साडेसातीमध्ये रुद्राक्ष धारण करणे योग्य आहे का?
हो, सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर मानले जाते (ज्योतिष सल्ल्यानुसार).
7) शनिदेवाची साडेसाती कोणत्या राशींवर आहे हे कसे ओळखावे?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि ग्रह तुमच्या जन्मराशीच्या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा साडेसाती सुरू असते असे मानले जाते. तुमच्या कुंडलीचे तज्ज्ञांकडून विश्लेषण करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता.
8) साडेसातीमध्ये हनुमान चालीसा पठण केल्याने काय फायदा होतो?
पौराणिक कथेनुसार, शनिदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की जे भक्त हनुमानाची भक्ती करतील, त्यांना शनिदोष पीडा देणार नाही. म्हणून साडेसातीमध्ये दररोज किंवा शनिवारी हनुमान चालीसा वाचल्याने मानसिक बळ मिळते आणि संकटे दूर होतात.
9) साडेसातीमध्ये कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते?
शनिवारी काळे कपडे, मोहरीचे तेल, लोखंड, काळे उडीद, छत्री आणि चामड्याचे पादत्राणे गरजूंना दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते अशी धार्मिक मान्यता आहे.
10) शनी मंदिरात जाताना कोणती काळजी घ्यावी?
शनी मंदिरात पूजा करताना शनिदेवाच्या डोळ्यात थेट बघू नये, असे शास्त्रात सांगितले जाते. त्यांच्या चरणांकडे पाहून दर्शन घ्यावे आणि शांत चित्ताने प्रार्थना करावी.
11) घरामध्ये शनिदेवाची मूर्ती ठेवणे योग्य आहे का?
सामान्यतः शनिदेव हे उग्र देव मानले जातात, म्हणून त्यांची मूर्ती घरात ठेवण्याऐवजी मंदिरात जाऊन दर्शन घेणे किंवा घरात शनि यंत्राची पूजा करणे अधिक योग्य मानले जाते.
12) शनिदेवाला ‘न्यायदेवता’ का म्हटले जाते?
हिंदू धर्मशास्त्रानुसार, शनिदेव हे आपल्या कर्मांचे फळ देणारे देव आहेत. ते कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करत नाहीत; जो जसे कर्म करतो, त्याला तसाच न्याय देतात.णूनच त्यांना ‘कर्मफलदाता’ किंवा ‘न्यायदेवता’ असे संबोधले जाते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली?
हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जरूर शेअर करा. अशाच धार्मिक, आरोग्य आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा, ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक मान्यतांवर आधारित आहे. यामधील उपाय, मंत्र आणि पूजा पद्धती या सर्वसाधारण माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेल्या आहेत. याची अचूकता किंवा परिणाम याबाबत कोणतीही हमी दिली जात नाही.
वाचकांनी कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या वैयक्तिक श्रद्धा, परिस्थिती आणि गरजेनुसार योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीचा वापर केल्याने उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी लेखक किंवा वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे.