Shani Dev Puja 2026
Shani Dev Puja 2026: शनिची साडेसाती कशी दूर कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Dev Puja 2026: आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. सूर्यपुत्र शनिदेव हे न्यायदेवता म्हणजेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखले जातात. शनिदेवांना शांत करून साडेसाती कशी दूर करता येईल याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Shani Dev Puja 2026: शनिदेवांना कर्म आणि न्यायाचे देवता म्हणून मानले जाते, शनिदेवांची वक्रदृष्टी ही अतिशय कठोर मानली जात असली, तरीही जे लोक धार्मिकतेने वागतात त्यांच्यासाठी ती एक वरदानच ठरते. असे म्हटले जाते की, शनिदेव प्रत्येक व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात. लोकांना शनिच्या साडेसातीची आणि धैय्याची खूप भीती वाटत असते. परंतु काही चांगल्या सवयी आणि कृती ह्या शनिदेवांना आनंदी ठेवतात आणि आपल्या जीवनात येणाऱ्या मोठ्या संकटांना दूर ठेवतात. शनिदेवांना आनंदी ठेवण्यासाठी काय करावे लागेल व कोणत्या कृती कराव्या लागतील हे आपण येथे जाणून घेऊया.

Shani Dev Puja 2026: शनिवारचा दिवस हा श्री शनिदेवांना समर्पित आहे. शनिदेवांना न्यायदेवता असेही म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, शनिदेव सर्वांच्या कर्मांचा हिशोब ठेवतात आणि त्यानुसार प्रत्येकाला फळ देत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनिदेवाची साडेसाती, महादशा, शनिदोष असे अनेक प्रकारच्या समस्या असतात. परंतु जर शनिदेव एखाद्या व्यक्तीवर आनंदी आणि प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही. त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामात यश मिळते.

Shani Dev Puja 2026:

अधिक वाचा: 2026 मध्ये हे ‘4’ मूलांक असलेल्यांचे नशीब चमकणार. सूर्यदेवाची राहणार विशेष कृपा

Shani Dev Puja 2026: आपल्या हिंदू समाजामध्ये शनि या ग्रहाला क्रूर ग्रह असे मानले जाते. परंतु शनि हा शत्रू नसून तो आपल्या सर्वांचा मित्र ग्रह आहे. शनिदेव हे ह्या कलयुगाचे न्यायाधीश आहेत आणि ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनिदोष किंवा शनिदेवाची साडेसाती असल्यास व्यवसायात नुकसान, नोकरीत अडचणी, नको त्या ठिकाणी नोकरीची बदली होणे, कर्ज, कौटुंबिक भांडणे आणि शारीरिक व्याधी अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच शनिची साडेसाती असताना शनि ग्रह शांत करण्यासाठी व शनिदेवांना आनंदी करण्यासाठी काही उपाय आणि कृती करणे फायदेशीर ठरते. कारण हे उपाय व ही कामे केल्याने शनि देवाकडून आपल्याला चांगले परिणाम मिळतात आणि अशुभ प्रभाव नष्ट होण्यास मदत होते.

Shani Dev Puja 2026: शनिदेव हे न्याय देवता आहेत. शनिवार हा शनिदेव आणि काळभैरवाला समर्पित आहे. शनि देवांचा स्वभाव हा अतिशय आक्रमक असल्यामुळे त्यांचा संपूर्ण सजीव सृष्टीवर तत्काळ प्रभाव पडतो. शनिदेवाचे नाव येताच संपूर्ण सजीव सृष्टी मध्ये भीतीचे वातावरण तयार होते. अशी मान्यता आहे की, शनिदेव ज्या लोकांवर नजर ठेवून असतात त्यांच्यावर सर्व प्रकारची संकटे, रोग, आर्थिक नुकसान, मानसिक वेदना, शारीरिक यातना यांचा काळ सुरू होतो.

Shani Dev Puja 2026

Shani Dev Puja 2026: शनि देवांची पूजा आणि प्रार्थना जर व्यक्तींनी नियमित पद्धतीने केल्यास आयुष्यभर शनि देवांची कृपा त्या व्यक्तीवर राहते. आयुष्यात पैशांची कमतरता कधीच भासणार नाही, समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल आणि आरोग्य देखील अतिशय चांगले राहते अशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे.

अधिक वाचा: नवीन वर्षात तुमच्या घरात येईल पैसाच पैसा? जाणून घ्या सोप्या वास्तू टिप्स

Shani Dev Puja 2026: शनिदेवांचा जन्म कसा झाला?

पौराणिक कथेनुसार सूर्य देवाचा विवाह प्रजापती दक्ष यांची कन्या संग्या हिच्याशी झाला होता. संग्याला सूर्य देवापासून यम, यमुना आणि मनू ही मुले झाली. परंतु पत्नी संग्या सूर्य देवाचा प्रताप बऱ्याच काळ सहन होत नव्हता. यामुळे संग्याने सूर्य देवांच्या सेवेसाठी आपली सावली निर्माण करून ती त्यांच्याजवळ सोडली. त्यानंतर काही दिवसांनी ह्या सावली पासून म्हणजेच छाया पासून शनीदेवांचा जन्म झाला.

Shani Dev Puja 2026: शनिची साडेसाती दूर करण्यासाठी व शनिदेवांना आनंदी करण्यासाठी काही उपाय खाली देण्यात आलेले आहेत:

  • शनि मंत्राचा नियमित जप करा.
  • नियमित शनि देवाची पूजा करावी.
  • शनिवारी हनुमानाची पूजा करावी.
  • साडेसातीच्या काळात रात्री दूध पिणे टाळावे.
  • मामा आणि वडीलधारी लोकांचा सन्मान करावा.
  • शनिवारी किंवा दररोज बजरंग बाणाचे पाठ करावे.
  • शनी मंदिरामध्ये शनि देवाच्या मूर्ती जवळ तेलाचा दिवा लावा.
  • शनिवारी काळे तीळ, काळे कपडे, लोखंडाच्या छोट्या वस्तू दान करा.
  • कर्मचाऱ्यांना आणि छोट्या नोकरदारांना नेहमी खुश ठेवावे
  • शनिवारी रबर, लोखंड अशा वस्तू खरेदी करणे टाळावे.
  • राधा आणि कृष्णाची नियमित आराधना करा.
  • शनि यंत्राची नियमित पूजा अर्चना करा.
  • कुत्र्यांची सेवा करा त्यांना खायला अन्न द्या.
  • शनिवार हा शनिदेवाचा असल्याने शनिवारी उपवास करा.
  • शनीच्या साडेसातीच्या काळात दारू आणि मांसाहाराचे सेवन टाळावे.
  • साडेसातीच्या काळात सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल.
  • शनी मंदिरात जाऊन शनि देवांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावे.
  • शनिची साडेसाती असलेल्यांनी शनिवारी काळे वस्त्र परिधान करून शनि देवांची पूजा करावी.
  • नियमित गरजूंना मदत करा आणि दानधर्म करा त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो.
  • शनि देवाला स्वच्छता आणि शिस्त आवडते म्हणून कपडे आणि शरीर स्वच्छ ठेवा आणि सर्व कामांमध्ये शिस्त अमलात आणा.
  • शनी ग्रहाची निगडित असलेल्या वस्तूंचे शनिवारी दान करा. (आखे उडीद, लोखंड, तीळ, तेल, तिळाच्या बिया, काळे कपडे इतर)

Shani Dev Puja 2026: खालील शनि मंत्रांचा नियमित जप करावा:

शनि बीज मंत्र:

ॐ शं शनैश्चराय नमः

ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः!

“ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्”

दररोज संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी हे मंत्र 108 वेळा जपावे.

शनि देवाची पूजा केल्याने आणि शनि मंत्राचा जप केल्याने मनुष्याच्या जीवनातील अडचणी दूर होऊन सुख-समृद्धी येते आणि सुखी आनंदी जीवन होते अशी आपल्या हिंदू धर्मात मान्यता आहे.

Shani Dev Puja 2026: श्री शनि देवाची आरती:

जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || १ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || २ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || ३ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || ४ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || ५ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || ६ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

|| श्री शनि अष्टक ||

हेचि दान देगा शनि |
जडो चित्त तुझे चरणी ||
माझे चित्त तुझे चरणी |
शनि माझी कामधेनू |
शनि माझा कल्पतरू ||
शनि सुखाची साऊली |
शनि मायेची माऊली ||
माझी श्रद्धा शनिवरी |
तेचि नेति पैलतिरी ||
मी आहे तुझा दास |
तुझे चरणी माझा वास ||
नवग्रहा मध्ये थोर |
तुझा महिमा अपार ||
तुझी कृपा ज्यासी झाली |
तोचि झाला भाग्यशाली ||
तुझे नाम घेता मुखी |
होई जीवनात सुखी ||
मारुतीची भक्ती करी |
त्यासी शनिदेव तारी ||
भेटी आलो शनिवारी |
माझे दुःख तू निवारी ||

Shani Dev Puja 2026: सूर्य आणि चंद्र या दोघांनंतर शनिदेव हे अतिशय जास्त प्रभावशालीग्रह म्हणून मानले जातात. शनीची साडेसाती, शनिदोष आणि त्याचे होणारे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करण्यात येते. म्हणूनच शनिची साडेसाती असलेल्या लोकांनी जर नियमितपणे शनिवारी शनि देवाची पूजा केल्यास अशा व्यक्तींच्या आयुष्यामधील सर्व अडचणी, अडथळे दूर होतात. तसेच त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत आणि त्यांच्या आरोग्यावर अतिशय चांगले परिणाम होऊन त्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळते.

Shani Dev Puja 2026: शनिदेव हे केवळ शिक्षा देणारेच ग्रह नाहीत तर ते प्रत्येक व्यक्तीच्या योग्य मार्गासाठी मार्गदर्शक म्हणून देखील अत्यंत प्रभावी असे आहेत. जे आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रामाणिकपणा कठोर परिश्रम संयम आणि सेवेची भावना बाळगतात अशांना शनिदेव त्यांच्या कठोर काळात देखील अतिशय चांगले परिणाम देत असतात, त्या व्यक्तींच्या जीवनातले अडथळे दूर करतात आणि त्यांना सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी शनिदेव सहाय्यक ठरतात.

Shani Dev Puja 2026: शनि हा अशुभ ग्रह मानला जातो, पण शनि ग्रहाचे परिणाम हे नेहमीच वाईट नसतात, हे त्या व्यक्तीच्या कर्माच्या आधारे देण्यात येतात, जर त्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल तर साडेसातीच्या काळात देखील शनिदेव त्यांना चांगले फळ देतात. शनि देवाची चाल ही अतिशय मंद आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळणारे परिणाम देखील उशिरा मिळतात. मकर आणि कुंभ या दोन्हीही राशींचा स्वामी शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नियमित शनि देवाची पूजा करणे आवश्यक आहे.

Shani Dev Puja 2026: वर दिलेल्या संपूर्ण लेखांमध्ये शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी आणि शनिची साडेसाती दूर करण्यासाठी अतिशय चांगले आणि प्रभावी उपाय दिले आहेत. जर साडेसातीच्या काळात तुम्ही शनि देवाचे हे उपाय केले तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला असा फायदा होईल. जर शनि मंत्रांचा नेहमीच जप केला आणि शनि यंत्राची नियमित पूजा केल्यास त्या व्यक्तीला अतिशय चांगले बदल अनुभवायला मिळतात. यामुळे साडेसातीच्या काळात देखील तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये यश, मानसन्मान, चांगले आरोग्य, कौटुंबिक सुख चांगले मिळते.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *