Shani Dev Puja 2026: तुम्हाला सध्या जीवनात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागत आहे का? किंवा नोकरी आणि आरोग्यामध्ये काही चढ-उतार जाणवत आहेत का? तर कदाचित शनीची साडेसाती सुरू झाली असू शकते. सूर्यपुत्र शनीदेव हे न्यायदेवता म्हणजेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करता येईल याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
प्रस्तावना:
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवांना कर्म आणि न्यायाचे देवता म्हणून मानले जाते, शनीदेवांची वक्रदृष्टी ही अतिशय कठोर मानली जात असली, तरी जे लोक धार्मिकतेने वागतात त्यांच्यासाठी ती एक वरदानच ठरते. असे म्हटले जाते की, शनीदेव प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्मानुसार फळ देतात.
लोकांना शनीच्या साडेसातीची आणि धैय्याची खूप भीती वाटत असते. परंतु काही चांगल्या सवयी आणि कृती ह्या शनीदेवांना आनंदी ठेवतात आणि आपल्या जीवनात येणाऱ्या मोठ्या संकटांना दूर ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवांना आनंदी ठेवण्यासाठी काय करावे लागेल व कोणत्या कृती कराव्या लागतील हे आपण येथे जाणून घेऊया.
1) शनीदेव कोण आहेत?
शनीदेवांना न्यायदेवता असेही म्हटले जाते. शनिवार हा श्री शनीदेवांना समर्पित आहे.
आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, शनीदेव सर्वांच्या कर्मांचा हिशोब ठेवणारे न्यायदेवता आहेत आणि त्यानुसार प्रत्येकाला फळ देतात. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनीदेवाची साडेसाती, महादशा, शनीदोष असे अनेक प्रकारच्या समस्या असतात.

अधिक वाचा: नव्या वर्षात ‘या’ मूलांकांवर असणार सूर्य ग्रहाचा प्रभाव; मिळतील प्रगतीच्या संधी
2) शनी साडेसाती म्हणजे काय? साडेसाती किती वर्षे असते?
साडेसाती म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या राशीवर होणारा प्रभाव होय. शनीदेवाच्या साडेसातीचा कालावधी साडेसात (७.५) वर्षांचा असतो.
- शनीला कठोर वाटणारा पण न्याय देणारा ग्रह मानले जाते. परंतु शनी हा शत्रू नसून तो आपल्या सर्वांचा मित्र ग्रह आहे. शनीदेव हे ह्या कलयुगाचे न्यायाधीश आहेत आणि ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतात.
- परंपरेनुसार असे मानले जाते की, शनीदोष किंवा शनीदेवाची साडेसाती असल्यास करिअरमध्ये अनपेक्षित बदल, आर्थिक नियोजनात अडचणी किंवा मानसिक ताण यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
- ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शनीची साडेसाती असताना शनी ग्रह शांत करण्यासाठी व शनीदेवांना आनंदी करण्यासाठी काही उपाय आणि कृती करणे फायदेशीर ठरते. कारण अशी धार्मिक मान्यता आहे की, हे उपाय केल्याने शनीदेवाकडून आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतात. तसेच अशुभ प्रभाव नष्ट होण्यास मदत होत असते.
- ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेव हे न्याय देवता आहेत. शनिवार हा शनीदेव आणि काळभैरवाला समर्पित आहे. काही लोकांच्या मते शनीदेवांचा स्वभाव हा अतिशय आक्रमक असल्यामुळे त्यांचा संपूर्ण सजीव सृष्टीवर प्रभाव पडतो.
- शनीदेवांची पूजा आणि प्रार्थना जर व्यक्तींनी नियमित पद्धतीने केल्यास अशी मान्यता आहे की, आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होऊ शकते, समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा मिळू शकते आणि आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

अधिक वाचा: घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिरतेसाठी जाणून घ्या सोप्या वास्तू टिप्स
3) Shani Dev Puja 2026: शनीदेवांचा जन्म कसा झाला?
पौराणिक कथेनुसार सूर्य देवाचा विवाह प्रजापती दक्ष यांची कन्या संग्या हिच्याशी झाला होता. संग्याला सूर्य देवापासून यम, यमुना आणि मनू ही मुले झाली. परंतु पत्नी संग्या सूर्य देवाचा प्रताप बऱ्याच काळ सहन होत नव्हता. यामुळे संग्याने सूर्य देवांच्या सेवेसाठी आपली सावली निर्माण करून ती त्यांच्याजवळ सोडली. त्यानंतर काही दिवसांनी ह्या सावली पासून म्हणजेच छाया पासून शनीदेवांचा जन्म झाला.
4) ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करावा यासाठी काही उपाय खाली देण्यात आलेले आहेत:
- शनी मंत्राचा नियमित जप करा.
- शनीदेवाची नियमित पूजा करावी.
- शनिवारी हनुमानाची पूजा करावी.
- मामा आणि वडीलधारी लोकांचा सन्मान करावा.
- शनिवारी किंवा दररोज बजरंग बाणाचे पाठ करावे.
- शनी मंदिरामध्ये शनीदेवाच्या मूर्तीजवळ तेलाचा दिवा लावा.
- शनिवारी काळे तीळ, काळे कपडे, लोखंडाच्या छोट्या वस्तू दान करा.
- कर्मचाऱ्यांना आणि छोट्या नोकरदारांना नेहमी खुश ठेवावे
- शनिवारी रबर, लोखंड अशा वस्तू खरेदी करणे टाळावे.
- राधा आणि कृष्णाची नियमित आराधना करा.
- शनी यंत्राची नियमित पूजा अर्चना करा.
- कुत्र्यांची सेवा करा त्यांना खायला अन्न द्या.
- शनिवार हा शनीदेवाचा असल्याने शनिवारी उपवास करा.
- शनीच्या साडेसातीच्या काळात दारू आणि मांसाहाराचे सेवन टाळावे.
- साडेसातीच्या काळात सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल.
- शनी मंदिरात जाऊन शनीदेवांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावे.
- शनीची साडेसाती असलेल्यांनी शनिवारी काळे वस्त्र परिधान करून शनीदेवांची पूजा करावी.
- नियमित गरजूंना मदत करा आणि दानधर्म करा त्यामुळे शनीदेवांचा आशीर्वाद मिळतो.
- शनीदेवाला स्वच्छता आणि शिस्त आवडते म्हणून कपडे आणि शरीर स्वच्छ ठेवा आणि सर्व कामांमध्ये शिस्त अमलात आणा.
- शनी ग्रहाची निगडित असलेल्या वस्तूंचे शनिवारी दान करा. (आखे उडीद, लोखंड, तीळ, तेल, तिळाच्या बिया, काळे कपडे इतर)
वरील दिलेले सर्व उपाय हे ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात आलेले आहेत.
5) खालील शनी मंत्रांचा नियमित जप करावा:
शनी बीज मंत्र:
ॐ शं शनैश्चराय नमः
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः!
“ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्”
दररोज संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी हे मंत्र 108 वेळा जपावे.
धार्मिक ग्रंथांनुसार, शनीदेवाची पूजा केल्याने आणि शनी मंत्राचा जप केल्याने मनुष्याच्या जीवनात साडेसातीच्या काळात होणार प्रभाव कमी होण्यास मदत होते.
6) श्री शनी देवाची आरती:
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || १ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || २ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || ३ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || ४ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || ५ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || ६ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
|| श्री शनी अष्टक ||
हेचि दान देगा शनी |
जडो चित्त तुझे चरणी ||
माझे चित्त तुझे चरणी |
शनी माझी कामधेनू |
शनी माझा कल्पतरू ||
शनी सुखाची साऊली |
शनी मायेची माऊली ||
माझी श्रद्धा शनिवरी |
तेचि नेति पैलतिरी ||
मी आहे तुझा दास |
तुझे चरणी माझा वास ||
नवग्रहा मध्ये थोर |
तुझा महिमा अपार ||
तुझी कृपा ज्यासी झाली |
तोचि झाला भाग्यशाली ||
तुझे नाम घेता मुखी |
होई जीवनात सुखी ||
मारुतीची भक्ती करी |
त्यासी शनीदेव तारी ||
भेटी आलो शनिवारी |
माझे दुःख तू निवारी ||
7) नियमित शनी पूजेमुळे अडचणी दूर होतात का?
- ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र या दोघांनंतर शनीदेव हे अतिशय जास्त प्रभावशाली ग्रह म्हणून मानले जातात. शनी देवाची साडेसाती, शनीदोष आणि त्याचे होणारे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनीदेवाची विशेष पूजा करण्यात येते.
- काही लोकांच्या मते, शनीची साडेसाती असलेल्या लोकांनी जर नियमितपणे शनिवारी शनीदेवाची पूजा केल्यास अशा व्यक्तींना अडचणींचा सामना करण्याचे मानसिक बळ मिळते आणि संकटांची तीव्रता कमी होते.
- तसेच त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होऊ शकते. त्यांच्या आरोग्यावर चांगले परिणाम होऊन काही लोकांना मानसिक आधार मिळाल्याचे वाटते अशी धार्मिक मान्यता आहे.
8) कठीण काळात शनीदेव साथ देतात का?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेव हे केवळ शिक्षा देणारे ग्रह नसून, व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणारे प्रभावी मार्गदर्शक आहेत.
अशी धार्मिक मान्यता आहे की, जे आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, संयम आणि सेवेची भावना बाळगतात अशांना शनीदेव त्यांच्या कठोर काळात देखील अतिशय चांगले परिणाम देत असतात. काही लोकांच्या मते व्यक्तींच्या जीवनातले अडथळे दूर करण्यास मदत करतात. त्यांना सुखी-आनंदी जीवन जगण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी शनीदेव सहाय्यक ठरतात.
9) कर्मानुसार शनी देतो फळ – चांगले की वाईट?
अशी मान्यता आहे की, व्यक्तीचे चांगले कर्म चांगले फळ, वाईट कर्म वाईट फळ
- काही लोकांच्या मते, शनी हा अशुभ ग्रह मानला जातो, पण शनी ग्रहाचे परिणाम हे नेहमीच वाईट नसतात, हे त्या व्यक्तीच्या कर्माच्या आधारे देण्यात येतात, जर त्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल तर साडेसातीच्या काळात देखील शनीदेव त्यांना चांगले फळ देतात. जर त्या व्यक्तीचे कर्म वाईट असतील तर शनीदेव त्यांना त्यांच्या कर्मानुसार वाईट फळ देतात.
- शनीदेवाची चाल ही अतिशय मंद आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळणारे परिणाम देखील उशिरा मिळतात. मकर आणि कुंभ या दोन्हीही राशींचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नियमित शनीदेवाची पूजा करणे आवश्यक आहे.
- साडेसातीच्या काळात मानसिक आधारासाठी पारंपरिक श्रद्धेनुसार प्रचलित उपाय दिले आहेत. धार्मिक ग्रंथांनुसार, जर साडेसातीच्या काळात तुम्ही शनीदेवाचे हे उपाय केले तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो.
- जर शनी मंत्रांचा नेहमीच जप केला आणि शनी यंत्राची नियमित पूजा केल्यास त्या व्यक्तीला अतिशय चांगले बदल अनुभवायला मिळतात. यामुळे साडेसातीच्या काळात देखील तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये यश, मानसन्मान, चांगले आरोग्य, कौटुंबिक सुख चांगले मिळते अशी मान्यता आहे.
10) 2026 मध्ये कोणत्या राशींवर साडेसाती आहे?
2026 मध्ये शनी मुख्यत मीन (Pisces) राशीत असेल. त्यामुळे साडेसाती या 3 राशींवर चालू आहे..
- कुंभ रास: शेवटचा टप्पा
- मीन रास: मधला टप्पा
- मेष रास: सुरुवातीचा टप्पा
साडेसाती सर्वांसाठी सारखी नसते. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जन्मकुंडलीवर, कर्मावर आणि इतर ग्रहांच्या स्थिती नुसार अवलंबून असते.
11) 2026 मध्ये शनीची साडेसाती संपूर्ण माहिती:
| रास | साडेसाती टप्पा | कालावधी | काय जाणवू शकते? | काय करणे योग्य? |
| कुंभ | शेवटचा टप्पा | साडेसाती संपत येते | हळूहळू अडचणी कमी होणे, स्थिरता येणे | संयम ठेवा, मेहनत सुरू ठेवा |
| मीन | मधला टप्पा | मध्यम | जबाबदाऱ्या वाढणे, मानसिक ताण | शिस्त, नियोजन आणि संयम आवश्यक |
| मेष | सुरुवातीचा टप्पा | साडेसातीची सुरुवात | अचानक बदल, नवीन आव्हाने | निर्णय काळजीपूर्वक घ्या |
महत्वाची सूचना: साडेसातीचे परिणाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात. हे सर्व ज्योतिषशास्त्रीय मान्यतेवर आधारित अंदाज आहेत.
12) ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीच्या काळात उपाय केल्यानंतर काही लोकांना आलेले अनुभव:
उदाहरण 1: नोकरीतील अडचणी आणि साडेसाती
पुण्यातील एक 30 वर्षीय IT क्षेत्रातील कर्मचारी उमेश (नाव बदलून) गेल्या काही महिन्यांपासून नोकरीत सतत अडचणींचा सामना करत होता. वरिष्ठांसोबत वाद, मानसिक ताण आणि प्रोजेक्टमध्ये काही अडचणी येणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या.
ज्योतिष सल्ल्यानुसार त्याच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरू असल्याचे सांगण्यात आले. ज्योतिषशास्त्रानुसार, यानंतर त्याने काही साधे उपाय सुरू केले:
- दर शनिवारी शनी मंत्र जप करणे.
- हनुमान चालीसा पठण करणे.
- काळे तीळ दान करणे.
उपाय केल्यावर लगेच चमत्कार झाला नाही, तर उमेशला आधी स्वतःच्या चुका समजल्या, त्याचा स्वभाव शांत झाला आणि संयम ठेवल्यामुळे काही महिन्यांनी परिस्थिती बदलली.
टीप: हा अनुभव वैयक्तिक असून परिणाम व्यक्तिनुसार वेगवेगळे असू शकतात.
उदाहरण 2: आर्थिक अडचणी आणि उपाय
मुंबईतील एक लहान व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अचानक आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ग्राहक कमी होणे, व्यवसायात काही काळ मंदी येणे आणि कर्ज वाढणे अशा समस्या वाढल्या. त्यांनी श्रद्धेने खालील उपाय सुरू केले.
- शनिवारी तेलाचा दिवा लावणे.
- गरजूंना अन्नदान करणे.
- काळे कपडे आणि तीळ दान करणे.
संयम आणि कष्टाने परिस्थिती सुधारली आणि आर्थिकस्थिती स्थिर होऊ लागली.
टीप: हे उपाय श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत.
उदाहरण 3: मानसिक ताण आणि आरोग्य
नागपूरमधील एक गृहिणी (वय 40) सतत मानसिक ताण, भीती आणि आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त होती. घरातील वातावरणही तणावपूर्ण झाले होते. त्या गृहिणीने खालील उपाय नियमितपणे केले.
- शनिवारी उपवास करणे.
- रोज 108 वेळा शनी मंत्र जप करणे.
- कुत्र्यांना अन्न देणे.
यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळू लागले आणि काही आठवड्यांनंतर तिला मानसिक शांती मिळू लागली आणि तिच्या आरोग्यातही सुधारणा होऊ लागली.
टीप: हा अनुभव वैयक्तिक आहे आणि सर्वांना समान परिणाम मिळतीलच असे नाही.
माझा वैयक्तिक अनुभव:
प्रिय वाचक मित्रांनो, गेल्या काही वर्षांत मी धार्मिक आणि ज्योतिष विषयांवर लेखन करताना अनेक वाचकांचे अनुभव, प्रतिक्रिया आणि प्रश्न जवळून पाहिले आहेत. विशेषतः साडेसातीच्या या काळाबद्दल लोकांच्या मनात खूप भीती आणि संभ्रम दिसून येतो.
माझ्या निरीक्षणानुसार, साडेसाती सुरू झाली की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बदल होतात. काहींसाठी हे आव्हानात्मक असते, तर काहींसाठी शिकण्याचा आणि प्रगतीचा काळ ठरतो. काही वाचकांनी सांगितले की या काळात त्यांना नोकरीत अडचणी, आर्थिक ताण किंवा मानसिक दबाव जाणवला. तर काहींनी याच काळात नवीन संधी, जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील मोठे निर्णय घेतले.
यावरून मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली ती म्हणजे साडेसाती हा केवळ भीतीचा विषय नाही, तर तो आपल्याला अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवणारा काळ देखील असू शकतो.
माझा सल्ला:
माझ्या मते,
- जीवनात आलेल्या बदलांना घाबरू नका, त्यांना समजून घ्या.
- नियमितता, प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
- धार्मिक उपाय करत असाल तर ते श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करावे.
- आर्थिक आणि वैयक्तिक निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
- गरजूंना मदत करणे आणि चांगले कर्म करणे हे नेहमीच चांगले कार्य आहे.
महत्वाची नोंद: या लेखातील माहिती ही धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. उपाय आणि अनुभव व्यक्तिनुसार वेगवेगळे असू शकतात. कोणताही निर्णय घेताना आपल्या परिस्थितीनुसार विचार करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष (Conclusion):
शनीदेव हे केवळ कठोर शिक्षा देणारे ग्रह नसून ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. शनीची साडेसाती ही घाबरण्याची गोष्ट नसून ती आपल्या कर्मांचे परीक्षण करणारा एक काळ असतो.
या काळात संयम, प्रामाणिकपणा, सेवा भावना आणि योग्य आचरण ठेवले तर शनीदेवांची कृपा होऊ शकते. तसेच नियमित पूजा, मंत्रजप आणि दानधर्म केल्यास साडेसातीचे अशुभ परिणाम कमी होऊन जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.
म्हणूनच, भीती न बाळगता योग्य उपाय आणि चांगले कर्म यांचा अवलंब केल्यास साडेसाती देखील यश आणि प्रगतीचा मार्ग बनू शकतो.
FAQs:
1) शनीची साडेसाती किती वर्षे असते?
शनीची साडेसाती साधारणपणे 7.5 वर्षांची असते आणि ती तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते.
2) साडेसाती नेहमी वाईट परिणाम देते का?
नाही, साडेसाती नेहमी वाईट परिणाम देत नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार, व्यक्तीच्या कर्मानुसार चांगले परिणाम देखील मिळू शकतात.
3) शनीदेवांना प्रसन्न करण्यासाठी सोपा उपाय कोणता?
शनिवारी शनी मंत्राचा जप करणे, काळे तीळ दान करणे आणि गरजूंना मदत करणे हे सोपे उपाय आहेत.
4) साडेसातीमध्ये काय टाळावे?
खोटे बोलणे, अन्याय करणे, वडीलधाऱ्यांचा अपमान आणि वाईट सवयी टाळाव्यात.
5) शनिवारी कोणती पूजा करावी?
शनीदेवांची पूजा, हनुमानाची पूजा आणि तेलाचा दिवा लावणे हे शनिवारी विशेष मानले जाते.
6) साडेसातीमध्ये रुद्राक्ष धारण करणे योग्य आहे का?
हो, सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर मानले जाते (ज्योतिष सल्ल्यानुसार).
7) शनीदेवाची साडेसाती कोणत्या राशींवर आहे हे कसे ओळखावे?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनी ग्रह तुमच्या जन्मराशीच्या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा साडेसाती सुरू असते असे मानले जाते. तुमच्या कुंडलीचे तज्ज्ञांकडून विश्लेषण करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता.
8) साडेसातीमध्ये हनुमान चालीसा पठण केल्याने काय फायदा होतो?
पौराणिक कथेनुसार, शनीदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की जे भक्त हनुमानाची भक्ती करतील, त्यांना शनीदोष पीडा देणार नाही. म्हणून साडेसातीमध्ये दररोज किंवा शनिवारी हनुमान चालीसा वाचल्याने मानसिक बळ मिळते आणि संकटे दूर होतात.
9) साडेसातीमध्ये कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते?
शनिवारी काळे कपडे, मोहरीचे तेल, लोखंड, काळे उडीद, छत्री आणि चामड्याचे पादत्राणे गरजूंना दान केल्याने शनीदेव प्रसन्न होतात आणि साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते अशी धार्मिक मान्यता आहे.
10) शनी मंदिरात जाताना कोणती काळजी घ्यावी?
शनी मंदिरात पूजा करताना शनीदेवाच्या डोळ्यात थेट बघू नये, असे शास्त्रात सांगितले जाते. त्यांच्या चरणांकडे पाहून दर्शन घ्यावे आणि शांत चित्ताने प्रार्थना करावी.
11) घरामध्ये शनीदेवाची मूर्ती ठेवणे योग्य आहे का?
सामान्यतः शनीदेव हे उग्र देव मानले जातात, म्हणून त्यांची मूर्ती घरात ठेवण्याऐवजी मंदिरात जाऊन दर्शन घेणे किंवा घरात शनी यंत्राची पूजा करणे अधिक योग्य मानले जाते.
12) शनीदेवाला ‘न्यायदेवता’ का म्हटले जाते?
हिंदू धर्मशास्त्रानुसार, शनीदेव हे आपल्या कर्मांचे फळ देणारे देव आहेत. ते कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करत नाहीत; जो जसे कर्म करतो, त्याला तसाच न्याय देतात. म्हणूनच त्यांना ‘कर्मफलदाता’ किंवा ‘न्यायदेवता’ असे संबोधले जाते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली?
हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जरूर शेअर करा. अशाच धार्मिक, आरोग्य आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Sources: पारंपरिक ज्योतिष अभ्यास, उपलब्ध सार्वजनिक माहिती, धार्मिक मान्यता आणि विविध माध्यमांतील संदर्भ यांच्या आधारे हा लेख तयार करण्यात आला आहे. दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.
Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा, ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक मान्यतांवर आधारित आहे. यामधील उपाय, मंत्र आणि पूजा पद्धती या सर्वसाधारण माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेल्या आहेत. याची अचूकता किंवा परिणाम याबाबत कोणतीही हमी दिली जात नाही.
वाचकांनी कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या वैयक्तिक श्रद्धा, परिस्थिती आणि गरजेनुसार योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीचा वापर केल्याने उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी लेखक किंवा वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला डिजिटल मीडियामध्ये ३+ वर्षांचा अनुभव असून मी आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली आणि धर्म या विषयांवर सोप्या, स्पष्ट आणि विश्वसनीय भाषेत माहितीपूर्ण लेखन करतो. आतापर्यंत मी 50+ पेक्षा अधिक लेख आणि वेब स्टोरीज प्रकाशित केल्या असून, माझ्या लेखनाला वाचकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मराठी वाचकांपर्यंत अचूक, प्रामाणिक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट आहे
टीप: ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक ज्योतिष मान्यतांवर आधारित आहे. याकडे वैयक्तिक मार्गदर्शन किंवा निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये.
प्रकाशित लेख: 7 जानेवारी 2026, लेख अद्यतन: 27 मे 2026