Heart Attack Risk in Winter: हिवाळा सुरू झाला की थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपडे, गरम अन्न आणि पेयांकडे वळतो. मात्र, या थंड हवामानाचा आपल्या हृदयावर होणारा परिणाम अनेकदा दुर्लक्षित राहतो. तापमानात अचानक घट झाल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. परिणामी, हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
प्रस्तावना:
काही जणांसाठी हिवाळा हा ऋतू अतिशय आनंदीदायी असतो. हिवाळ्यात थंडीमुळे तापमानात घट होते आणि या ऋतूत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या ऋतूत थंड हवेमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होण्यास सुरुवात होते. कारण नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचे एक ठराविक तापमान असते आणि ते तापमान संतुलित असते.
थंडीमुळे जसजसे तापमान कमी होऊ लागते तसतसे आपले शरीर महत्त्वाच्या अवयवांचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी शरीराची नैसर्गिक प्रतिसाद यंत्रणा सक्रिय होते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

1) कोणत्या वेळेत धोका जास्त असतो?
- हिवाळ्यात थंडीमुळे हृदयाशी संबंधित असणाऱ्या आजारांच्या धोक्याचे प्रमाण जास्त असते. काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, हिवाळ्यामध्ये थंडीमुळे पहाटे 4 ते 10 या वेळेत हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
- कारण या वेळेत शरीराचा रक्तदाब (Blood Pressure) नैसर्गिकरित्या वाढत असतो. काही अभ्यासांमध्ये थंड हवामानाच्या काळात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ दिसून आल्याचे नमूद केले आहे.
- सध्या हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही अधिकृत आरोग्य अहवालांनुसार, जगभरात आणि भारतातही हृदयविकार हे मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक बनले आहे, ज्यामध्ये दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात.
- हिवाळ्यात थंड हवेमुळे तापमानात (Temperature) अचानक घट झाल्याने तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो.
- यामुळे हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात असते.
अधिक वाचा: हिवाळ्यात आरोग्याची कशी घ्याल काळजी? संपूर्ण माहिती वाचा.
2) हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?
- हिवाळ्यात जास्त थंडीमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल हे नेहमीच होत असतात. हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे आपल्या शरीराचे नैसर्गिक तापमान कमी होऊ लागते. हे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपले शरीर अंतर्गत पातळीवर प्रयत्न करते, ज्यामुळे शरीरात काही हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या बदलांमुळे नकळत रक्तदाब वाढू शकतो.
- याच कारणास्तव काही लोकांमध्ये हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका तुलनेने वाढू शकतो. ही जोखीम मुख्यत्वे करून हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
- हिवाळ्यात तापमानात घट झाल्याने हृदयावर अधिक ताण पडतो. यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.
- यामुळे हृदयातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे त्यावर अतिरिक्त ताण येतो.
- या ऋतूत थंड हवेमुळे शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करते. शरीरामध्ये झालेल्या या बदलामुळे शरीरातील नसा आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाबात वाढ होते. म्हणूनच हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. विशेषतः आधीपासून हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका वाढू शकतो.

3) थंडी आणि हृदयविकार: थंडीचा हृदयावर होणारा परिणाम
- हिवाळ्यात सकाळच्या वेळी छातीत अचानक दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात ही लक्षणे हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात.
- इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना दिसते. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे रक्त गोठण्याची (clotting) प्रवृत्ती वाढणे.
- शरीरातील रक्त गोठले की रक्तप्रवाह हा सुरळीत होत नाही. याच कारणाने हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
- हिवाळ्यात खाण्यापिण्यात होणारे बदल आणि शारीरिक हालचाल कमी अशा शरीरात होणारे बदलही हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतात.
- थंड हवामानात काही परिस्थितींमध्ये रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढू शकते, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. यामुळे काही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
- काही परिस्थितींमध्ये रक्त अधिक घट्ट होण्याची प्रवृत्ती वाढू शकते. शरीरास कोणतीही जखम झाल्यावर रक्तस्त्राव थांबण्यासाठी ती आवश्यक असते. परंतु शरीरास कोणतीही जखम नसताना अंतर्गत पातळीवर रक्त घट्ट झाल्यास रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हृदयावर ताण वाढण्याची शक्यता असते.
अधिक वाचा: नसा आणि रक्तवाहिन्या मजबूत ठेवण्यासाठी हे 12 नैसर्गिक पदार्थ, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
4) हिवाळ्यात रक्त गोठण्यामागील कारणे:
- पाणी कमी प्रमाणात पिणे.
- रक्तवाहिन्या आकुंचन पावणे.
- रक्तदाब वाढणे.
- शारीरिक हालचाली कमी होणे.
- घाम कमी येणे.
- हिवाळ्यात जास्त चरबीयुक्त आहार घेणे.
- विटामिन डी ची कमतरता असणे.
- जास्त कोलेस्ट्रॉल आणि खराब आहार.
- मानसिक ताण जास्त घेणे.
- गर्भनिरोधक गोळ्या आणि हार्मोन थेरपी यांवरील औषधे घेणे.
- गर्भधारणा आणि बाळंतपण झाल्यानंतरचा काळ.
- धूम्रपान आणि दारू जास्त प्रमाणात सेवन करणे.
- मधुमेह (डायबिटीज), लठ्ठपणा, हृदयविकार किंवा स्ट्रोक यांसारखे पूर्वी झालेले आजार.
5) हिवाळ्यात थंडीमुळे रक्त गोठण्यापासून कसा बचाव करावा:
- फळे, भाज्या, नट्स, होल ग्रेन्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले पदार्थ नियमित आहारात घ्यावेत.
- हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढू शकते.
- दिवसभरात थोडे थोडे कोमट पाणी पीत राहणे गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पुरेसे पाणी पिण्यामुळे निर्जलीकरण टाळता येते आणि रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
- काही संशोधनांमध्ये लसणातील घटक हृदयाच्या आरोग्यास समर्थन देऊ शकतात असे सूचित करण्यात आले आहे. मात्र याबाबत वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- हिवाळ्यात नियमित सकाळी शारीरिक हालचाल करणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. बाहेर जास्त थंड हवामान असल्यास घरातच योगा किंवा हलकी स्ट्रेचिंग करणे फायदेशीर आहे. ज्यामुळे शारीरिक हालचाल केल्यास शरीर उबदार राहते आणि शरीरातील रक्ताभिसरण नीट होण्यास मदत होते.
- व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता काही अभ्यासांमध्ये हृदयविकाराच्या जोखमीशी संबंधित असल्याचे आढळले आहे. अनेकांसाठी नियमित सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन ‘डी’ मिळण्यास मदत होऊ शकते. मर्यादित प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणे अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
6) योग्य आहार आणि शारीरिक हालचालींची कमतरता ही प्रमुख कारण:
- हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांचा आहार अचानक वाढतो. तसेच हिवाळ्यात दिवस लहान असल्याने लोक फिरणं कमी करतात, व्यायामाचे प्रमाण देखील कमी होतं.
- यामुळे हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी प्रमाणात होतात. अशामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर वाढण्याचे प्रमाण अधिक असते. इतर ऋतूपेक्षा हिवाळ्यात बऱ्याच जणांचे वजन वाढते.
- उन्हाळ्यामध्ये शारीरिक हालचालींमुळे घाम येतो आणि येणाऱ्या या घामामुळे सोडियम व पाणी शरीराबाहेर पडत असते.
- हिवाळ्यात घाम कमी आल्यामुळे उन्हाळ्याच्या तुलनेत शरीरातून पाणी आणि सोडियम कमी प्रमाणात बाहेर पडतात. या कारणास्तव रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, परिणामी हृदयावरचा दाब वाढतो. काही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
- वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात ओट्स, फॅटी फिश (ज्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते), नट्स आणि सीड्स (बादाम, अक्रोड, चिया सीड आणि अळशी) लसूण आणि बेरीज (ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी) यांचा आहारात समावेश करावा.
- ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास, चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास तसेच रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
अधिक वाचा: मीठ कमी असूनही BP का वाढतो? शास्त्रज्ञांचा नवीन खुलासा
7) हिवाळ्यात कोणत्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो:
- यापूर्वी ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आला आहे. तसेच हृदयविकार असलेल्या लोकांना हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी हिवाळ्यात अतिशय सावधानपूर्वक काळजी घेणे गरजेचे असते.
- ज्येष्ठ नागरिकांना देखील हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची संभावना नाकारता येत नाही, त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी देखील हिवाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका तुलनेने अधिक असू शकतो.
- याशिवाय उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना देखील हिवाळ्यात विशेष करून काळजी घेणे गरजेचे आहे.
8) हृदयविकाराची लक्षणे खालील प्रमाणे:
- छातीच्या मध्यभागी अस्वस्थ करणाऱ्या वेदना निर्माण होणे.
- एकाएकी थंड वातावरणात देखील जास्त घाम येणे.
- अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागणे.
- छातीच्या मध्यभागी अस्वस्थता होण्याबरोबरच श्वास घेण्यात अडचण येणे.
- हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात वेदना किंवा अस्वस्थता निर्माण होणे.
- कोणतेही स्पष्ट कारण नसताना मळमळ किंवा उलट्या होणे.
- चक्कर येणे किंवा डोके जड होणे कधीकधी काही प्रकरणांमध्ये व्यक्ती बेशुद्धही पडू शकते.
9) हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
- हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रथम योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात भूक जास्त प्रमाणात लागते त्यामुळे खाण्यावर स्वतः नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेष करून ज्यांना हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते, अशा लोकांनी विशेष काळजी घेऊन हिवाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवावे.
- हिवाळ्यात थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं हे फायदेशीर आहे. हिवाळ्यात जास्त थंड वातावरणात घराबाहेर पडणे टाळावे. हिवाळ्यात जास्त थंड वातावरणात देखील अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे लागल्यास उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडावे.
- हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात यामुळे शारीरिक हालचाली करणे, नियमित व्यायाम करणे आणि योगा करणे ह्याकडे विशेष करून लक्ष द्यावे.
- कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ आहारातून कमी करावे. तेलाचा आणि तुपाचा मर्यादित वापर करावा.
- हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. हंगामी पालेभाज्या आणि फळे नियमित खावीत. ड्रायफूटचेही सेवन हिवाळ्यामध्ये योग्य प्रमाणात करावे.
- हिवाळ्यात उबदार कपडे घालावे. व्यायाम करण्यापूर्वी शरीराला वार्म-अप करावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे घ्यावीत. नियमित पुरेशी झोप घ्यावी. हिवाळ्यात ताणतणाव टाळावा. नियमित कोमट पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे.
काही आरोग्य तज्ञांच्या मते, थंड हवामानामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो.
हा लेख लिहिण्यामागचा उद्देश:
आरोग्यविषयक लेखन करताना मला सातत्याने असे जाणवले आहे की, अनेक लोक हिवाळ्यातील थंडीचा हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम गांभीर्याने घेत नाहीत. लेखनासाठी विविध वैद्यकीय संस्था, संशोधन अहवाल आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अभ्यासताना मला समजले की, थंड हवामानामुळे रक्तदाब वाढणे, रक्तवाहिन्या आकुंचन पावणे आणि हृदयावर अतिरिक्त ताण येणे यांसारखे बदल काही व्यक्तींमध्ये गंभीर ठरू शकतात.
याच कारणामुळे हा लेख लिहिताना मी केवळ माहिती देण्यापेक्षा वाचकांमध्ये योग्य जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. माझ्या मते, योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेसे पाणी पिणे, उबदार राहणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे या साध्या सवयी अनेक हृदयविकारांच्या जोखमी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. एखाद्या लेखामुळे जरी एखादी व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत अधिक सजग झाली, तरी लेखक म्हणून तेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.
लेखकाचा संदेश:
आरोग्यविषयक लेखक म्हणून अभ्यास करत असताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली की, आपण हिवाळ्यात वजनाकडे किंवा त्वचेकडे लक्ष देतो, पण हृदयाकडे दुर्लक्ष करतो. निसर्गाच्या बदलत्या चक्रासोबत आपले शरीरही बदलत असते. थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी आधुनिक जीवनशैलीतील ताणतणाव, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हा धोका अधिक वाढतो.
माझा उद्देश हाच आहे की, ही वैज्ञानिक कारणे मराठीत अगदी साध्या शब्दांत लोकांपर्यंत पोहोचावीत. केवळ घाबरून न जाता, ‘कोमट पाणी पिणे’ किंवा ‘घरातच हलका व्यायाम करणे’ यांसारख्या छोट्या सवयी बदलून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. तुमचे आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे, त्यामुळे या हिवाळ्यात उबदार राहा आणि आपल्या हृदयाची विशेष काळजी घ्या!
निष्कर्ष (Conclusion):
हिवाळ्यात थंड हवामानामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. तापमान कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका इतर ऋतूंप्रमाणे अधिक वाढलेला असतो.
योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि उबदार राहणे या साध्या सवयी अंगीकारल्यास हा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. विशेषतः ज्यांना आधीपासून हृदयविकार, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे त्यांनी हिवाळ्यात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
शेवटी, आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करून आपण हृदयाचे आरोग्य उत्तम राखू शकतो आणि संभाव्य धोके टाळू शकतो. त्यामुळे या हिवाळ्यात आपल्या हृदयाची विशेष काळजी घ्या आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या.
FAQs:
1) हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
2) हिवाळ्यात कोणत्या वेळेत हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?
काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, सकाळी 4 ते 10 या वेळेत हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, कारण या वेळेत रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढलेला असतो.
3) हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?
नियमित व्यायाम, संतुलित आहार, कोमट पाणी पिणे, उबदार कपडे घालणे आणि ताणतणाव टाळणे हे उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत.
4) थंडीमुळे रक्त गोठणे म्हणजे काय?
थंड हवामानात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यास रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढू शकते.
5) हिवाळ्यात कोणत्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?
ज्यांना आधीपासून हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आहे किंवा जे धूम्रपान व मद्यपान करतात, अशा लोकांना धोका अधिक असतो.
6) हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात?
छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, जास्त घाम येणे, हात-पाठ-मान दुखणे, चक्कर येणे ही मुख्य लक्षणे आहेत.
7) हिवाळ्यात कोणते अन्न हृदयासाठी फायदेशीर आहे?
काही संशोधनांनुसार ओट्स, ड्रायफ्रूट्स, फळे, हिरव्या भाज्या, ओमेगा-3 असलेले पदार्थ आणि लसूण हे हृदयाच्या आरोग्यास समर्थन देऊ शकतात. मात्र याबाबत निश्चित निष्कर्ष नाहीत आणि वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली?
हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जरूर शेअर करा. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीकरिता आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Sources: या लेखातील माहिती World Health Organization (WHO), American Heart Association (AHA), British Heart Foundation (BHF), वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित संशोधन आणि सार्वजनिक आरोग्यविषयक उपलब्ध माहितीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. लेखाचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि माहितीपर असून तो वैद्यकीय निदान, उपचार किंवा औषधोपचाराचा पर्याय नाही.
Disclaimer: प्रिय वाचकांनो, हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. हा कोणत्याही प्रकारे वैद्यकीय मताचा पर्याय नाही. लेखक वैद्यकीय तज्ज्ञ नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला डिजिटल मीडियामध्ये 3+ वर्षांचा अनुभव असून मी आरोग्यविषयक विषयांवर सोप्या, अभ्यासपूर्ण आणि संशोधनाधारित पद्धतीने लेखन करणारा लेखक आहे. आतापर्यंत मी 50 पेक्षा अधिक लेख आणि वेब स्टोरीज प्रकाशित केल्या असून माझ्या लेखनाला वाचकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
लेखातील माहिती विविध संशोधन अहवाल, वैद्यकीय संस्थांची सार्वजनिक माहिती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित आहे.
मी नेहमीच वाचकांना सोपी, स्पष्ट आणि विश्वसनीय माहिती देण्यावर भर देतो. माझ्या लेखांमध्ये दिलेली माहिती विविध विश्वसनीय स्त्रोत, वैद्यकीय संस्थांची सार्वजनिक माहिती, संशोधन अहवाल आणि उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तयार केली जाते. लेखाचा उद्देश वाचकांना जागरूक करणे असून तो वैद्यकीय निदान किंवा उपचाराचा पर्याय नाही.
माझे उद्दिष्ट म्हणजे मराठी वाचकांपर्यंत अचूक, प्रामाणिक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती पोहोचवणे आहे. मी नेहमीच नवीन माहिती पुरवण्याचा आणि वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करतो.
टीप: ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रकाशित लेख: 24 डिसेंबर 2025, लेख अद्यतन: 8 जुलै 2026