Ner Nagar Parishad Election 2025
Ner Nagar Parishad Election 2025: लोकवर्गणीतून लढलेला अपक्ष उमेदवार विजयी

Ner Nagar Parishad Election 2025: राहायला घर नाही, खिशात पैसा नाही, रुग्णालयातच राहायचा, कोणतेही राजकीय पाठबळ नाही, तरीदेखील यवतमाळमधील नेर नगरपालिका निवडणुकीत लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशातून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून अपक्ष उमेदवाराने विजय खेचून आणला आहे.

प्रस्तावना (Introduction):

नेर नगरपरिषद निवडणूक 2025 (Ner Nagar Parishad Election 2025) मध्ये एक अत्यंत प्रेरणादायी आणि वेगळी घटना पाहायला मिळाली. पैशांचा पाऊस, मोठे नेते आणि राजकीय पाठबळ या सगळ्या गोष्टींना मागे टाकत, एका साध्या आणि निस्वार्थी कार्यकर्त्याने जनतेच्या बळावर विजय मिळवला.
लोकवर्गणीतून निवडणूक लढवून, कोणतेही आर्थिक साधन नसताना देखील अपक्ष उमेदवाराने मिळवलेला हा विजय आजच्या राजकारणात एक वेगळा संदेश देणारा ठरला आहे.

Ner Nagar Parishad Election 2025: बऱ्याच ठिकाणी बड्या नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का:

  • राज्यातील जवळजवळ नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल हा स्पष्टच होत आलेला आहे. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यात आघाडीवर दिसत आहे. सगळीकडे सर्वच पक्षांचे विजय उमेदवार गुलाल उधळून जल्लोष करताना दिसत आहेत. ह्या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी बड्या नेत्यांना पराभवाचा मोठा धक्काच बसला आहे.
  • बड्या नेत्यांची फौज, गाड्यांचा ताफा, पैशांचा पाऊस निवडणुकीच्या या समीकरणांमध्ये यवतमाळ मधील नेरच्या जनतेने आसमान दाखवले आहे. यवतमाळच्या नेर येथील एका अपक्ष उमेदवार निवडणुकीत जिंकला आहे.
  • नेर येथील लोकांनी गोळा केलेल्या लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशातून विजय खेचून आणला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्लातून हा विजय एक ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

सचिन कैलास कराळे उर्फ जांभा कोण आहे?

  • सचिन कैलास कराळे हा नेहमी लोकांच्या संपर्कात राहणारा, आक्रमक भाषा असलेला, सडपातळ शरीर असलेला आणि नेरमधील जनतेच्या-गोरगरिबांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारा निस्वार्थी कार्यकर्ता आहे. नेरमध्ये सचिन कैलास कराळे यांना जांभा ह्या नावाने ओळखले जाते.
  • सचिन कैलास कराळे उर्फ जांभा हा यवतमाळ मधील नेरच्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, रुग्णांसाठी एक हक्काचा असा त्यांचा सहकारी झालेला आहे. घरदार सोडून नेरमधील जनतेची सेवा करणे, गोरगरिबांना सहकार्य करणे, तेथील रुग्णांना सहकार्य व सेवा करणे असा हा नेरमधील जनतेचा सच्चा कार्यकर्ता झालेला आहे.
  • नेरमधील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सहकार्यासाठी व सेवेसाठी सचिन कैलास कराळे उर्फ जांभा हे 24 तास उपलब्ध असायचे.
Ner Nagar Parishad Election 2025

अधिक वाचा: आता तुमचे वीज बिल येईल अर्धेच! छतावर बसवा सौर पॅनल, सरकार देत आहे 70 टक्के अनुदान

राहायला घर नाही, खिशात पैसा नाही तरीही जांभा झाला नगरसेवक: Ner Nagar Parishad Election 2025

  • यवतमाळ मधील नेर येथून सचिन कैलास कराळे उर्फ जांभा असे ह्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. राहायला घर नाही, खिशात पैसा नाही, स्वतःचे बँकेचे पासबुकही नाही कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नाही केवळ आणि केवळ नेर येथील जनतेच्या सहाय्याने आणि तेथील लोकांनी गोळा केलेल्या लोकवर्गणीच्या पैशातून सचिन कैलास कराळे उर्फ जांभा यांनी हा विजय खेचून आणलेला आहे.
  • सचिन कैलास कराळे उर्फ जांभा या तरुणांनी तेथील प्रस्थापितांचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेला सचिन तेथील जनतेचा दवाखान्यातील सोबती याला नेर येथील जनतेने लोक वर्गणी गोळा करून प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी दाखल करण्यासाठी भाग पाडले आणि नेहमी जनतेने सचिन कैलास कराळे यांना नगरसेवक म्हणून निवडूनही आणले.

सचिन जनतेची, गरिबांची आणि रुग्णांची समाजसेवा करत:

  • सचिन यांना स्वतःचे घर नसल्यामुळे कधी ते ग्रामीण रुग्णालयात तर कधी मित्राच्या हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम करून तेथील जनतेची, गरिबांची आणि रुग्णांची समाजसेवा करत होते. सचिन उर्फ जांभा यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्या कारणामुळे निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा देखील त्यांच्य जवळपास नव्हता.
  • सचिन यांच्या मित्रांनीच त्यांच्यासाठी कपडे शिवून दिले आणि नेरमधील सामान्य जनतेने स्वतःच्या खिशातून पैसा काढून लोकवर्गणी गोळा करून सचिन याना पाठबळ देऊन निवडणूक लढण्यासाठी मदत केली.

सचिन उर्फ जांभा निस्वार्थी कार्यकर्ता ओळख निर्माण:

  • सचिन उर्फ जांभा यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असताना, गरिबी पाचीला पुजलेली असताना, खिशात पैसा नसताना अशा परिस्थितीत कधी ग्रामीण रुग्णालयात तर कधी मित्राच्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचे. यवतमाळमधील नेर मध्ये ‘निस्वार्थी कार्यकर्ता’ म्हणून सचिन यांची ओळख निर्माण झालेली होती.
  • गेली अनेक वर्ष सचिन कराळे यांनी फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यामध्ये स्वतःला झोकून दिलेले होते. विशेष करून जांभा हे रुग्णांच्या सहकार्यासाठी व सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहत होते. दवाखान्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णांना सहकार्य करणे, त्यांची सेवा करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. ह्याच चांगल्या कामाची व सेवेची पोचपावती म्हणून यवतमाळमधील नेर च्या जनतेने त्यांना साथ दिली.
Ner Nagar Parishad Election 2025

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

सचिन कैलास कराळे उर्फ जांभा हे राजकारणात सक्रिय:

गेल्या काही दिवसांपासून सचिन कैलास कराळे उर्फ जांभा हे राजकारणात सक्रिय झाले होते. भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षात सचिन यांनी आपले योगदान देऊन संघटन कौशल्य हे दाखवून दिले होते. परंतु महायुतीच्या राजकीय घडामोडीमध्ये ऐनवेळी भाजपाने सचिन कैलास कराळे यांना उमेदवारी दिली नाही.

मात्र यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढाईचीच असे सचिन उर्फ जांभा यांनी ठरवले होते. नेरमधील या नगर परिषदेच्या निवडणुकीत मदत व सहकार्य करण्यासाठी सचिन यांचे मित्र पुढे आले आणि नेरमधील नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये त्यांची अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्यात आली.

जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढत:

  • नेरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या सचिन उर्फ जांभा यांना ही निवडणूक लढणे काही सोपे नव्हते. शिवसेना शिंदे गट ह्या पक्षाचे सुभाष भोयर हे सचिन कैलास कराळे यांच्या विरोधात होते.
  • सचिन यांच्यासमोर 15 वर्ष राहिलेले नगरसेवक आणि राजकारणातील मोठा अनुभव असलेले शिवसेना शिंदे गटाचे सुभाष भोयर यांचे अतिशय मोठे असे आव्हान होते. सचिन उर्फ जांभा यांनी आजवर केलेल्या नेरमधील जनतेच्या सेवेसमोर सुभाष भोयर यांचा आजवरचा राजकारणाचा अनुभव कमी पडला.
  • जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढत होती. परंतु नेरमधील सर्वसामान्य गरीब जनतेनेच सचिन यांची ही निवडणूक हातात घेतली होती. उमेदवारीचे नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच सचिन उर्फ जांभा यांच्या विजयाची तेथील जनता ही खात्री देत होती.
  • सचिन कैलास कराळे हे कोणत्याही अडलेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून यवतमाळ येथील रुग्णालयात घेऊन जात असत आणि प्राथमिक उपचार होईपर्यंत त्या रुग्णाबरोबर तिथेच थांबत असत. वेळी अवेळी जनतेसाठी व रुग्णांसाठी धावपळ करणे हा सचिन कैलास कराळे यांचा सेवाभाव त्यांच्या या निवडणुकीत त्यांच्या उपयोगी आला.

सचिन यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करायला लावली:

  • सचिन यांचा मित्रपरिवार हा प्रचंड असल्याकारणाने शहराच्या विविध भागात त्यांचे वाढदिवस साजरे होत असत. सचिन कैलास कराळे उर्फ जांभा यांच्या जेवणाची व्यवस्था देखील त्यांचे मित्र करत असत. सचिन यांच्या सामाजिक सेवेला राजकीय पाठबळ मिळावे यासाठी यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत सचिन यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करायला लावली.
  • नेरमधील जनतेच्या, मित्रांच्या सहकार्य आणि सचिन उर्फ जांभा यांनी नेरमधील जनतेची केलेल्या सेवेमुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुभाष भोयर ह्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला.

नेरमधील निवडणुकीचा निकाल प्रस्थापितांना मोठा धक्का:

  • नेरमधील निवडणुकीचा हा निकाल म्हणजेच तेथील प्रस्थापितांना नेरमधील सामान्य जनतेने दिलेला मोठा धक्काच मानला जात आहे. लोकशाहीची ताकद दाखवून देणारी अशी कौतुकास्पद घटना नेरमध्ये घडलेली दिसून येत आहे. ‘निवडणूक ही पैशाने नाही तर जनतेच्या सहकार्याने लढली जाते, हे पुन्हा एकदा सचिन कैलास कराळे उर्फ जांभा यांच्या विजयाने सिद्ध केले आहे.
  • नेरमधील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेने एकत्र येऊन नेरमधील एका अशा निस्वार्थी कार्यकर्त्याला निवडणुकीत जिंकून आणणे ही आजच्या राजकारणातील एक मोठी बदलाची घटना दिसून येत आहे.
  • शिवसेना शिंदे गटाच्या सुभाष भोयर यांचा विजय पक्का वाटत असताना सचिन यांनी नेरमधील जनतेच्या व मित्रांच्या सहकार्याने निवडणुकीमध्ये ताकद लावली होती. राजकारणातील कोणत्याही पक्षाचा मोठा नेता त्यांच्या पाठीशी नसताना, कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा सचिन यांच्यासाठी झालेली नसताना देखील सचिन उर्फ जांभा यांनी विजय निश्चित केला.

जनतेने दिलेल्या आणि मित्रांच्या सहकार्याच्या बळावर निवडणुकीत विजय:

  • सचिन कैलास कराळे हे नेर मधील जनतेचे, गोरगरिबांचे आशीर्वाद घेणे हेच त्यांच्या प्रचाराचे साधन त्यांनी वापरले. आणि ह्याच कारणामुळे नेरमधील जनतेची प्रचंड अशी सहानुभूती सचिन यांच्या पाठीशी उभी राहिली होती.
  • नेरमधील जनतेने दिलेल्या आणि मित्रांच्या सहकार्याच्या बळावरच सचिन यांनी नेर मधील नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला. सचिन यांच्या ह्या विजयामुळे सगळीकडे आनंद व आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
  • सर्वसामान्य जनतेची व समाजाची सदैव सेवा करणाऱ्या एखाद्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला जनता ही कशी विजयी करते याचे एक मोठे उदाहरण यवतमाळ मधील नेरच्या जनतेने दाखवून दिले आहे.

नेरमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या पदाधिकाऱ्यांचा झालेला पराभव:

  • यवतमाळमधील नेर हा मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असताना देखील येथे प्रहार आणि दोन अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
  • नेरमधील प्रभाग क्रमांक 1 मधून सचिन उर्फ जांभा यांनी शिवसेनेचे सुभाष भोईर यांचा पराभव केला आहे. तसेच वार्ड क्रमांक 4 मधून प्रहार जनशक्ती पक्षाचे गौरव नाईकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रितेश चिरडे यांचा पराभव केला आहे.
  • शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली मासाळ यांचा देखील येथे पराभव झालेला आहे. अपक्ष उमेदवार असलेल्या त्रिवेणी रुपेश दुबे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली मासाळ यांचा पराभव केला.

Source: मीडिया रिपोर्ट्सनुसार https://www.youtube.com/watch?v=a7Y058oEZEk

माझा सल्ला:

आजच्या काळात अनेक तरुण राजकारणात येण्याचा विचार करतात, परंतु त्यांना वाटते की पैसा आणि मोठे पाठबळ नसल्यास यश मिळत नाही. मात्र, नेरमधील या घटनेतून एक स्पष्ट संदेश मिळतो. जर तुम्ही खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करत असाल, तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहते. म्हणूनच लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करा, नाव कमवण्यापेक्षा विश्वास कमवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सातत्य ठेवा. यश नक्की मिळेल.

निष्कर्ष (Conclusion):

नेरमधील हा निकाल 2025 (Ner Nagar Parishad Election 2025) केवळ एक निवडणूक विजय नाही, तर लोकशाहीची खरी ताकद दाखवणारा एक आदर्श आहे. जनतेचा विश्वास, निस्वार्थी सेवा आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही मोठी शक्ती पराभूत होऊ शकते, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. हा विजय हेही दाखवतो की, राजकारणात फक्त पैसा आणि सत्ता नव्हे, तर लोकांशी असलेला खरा संबंध अधिक महत्त्वाचा असतो.

FAQs:

1) नेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये कोण विजयी झाला?
अपक्ष उमेदवार सचिन कैलास कराळे उर्फ जांभा यांनी विजय मिळवला.

2) त्यांनी निवडणूक कशी लढवली?
त्यांनी लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातून निवडणूक लढवली.

3) त्यांच्याकडे राजकीय पाठबळ होते का?
नाही, ते पूर्णपणे अपक्ष उमेदवार होते.

4) त्यांच्या विजयामागचे मुख्य कारण काय होते?
त्यांच्या निस्वार्थी समाजसेवेचा आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा मोठा वाटा होता.

5) या घटनेतून काय शिकायला मिळते?
लोकशाहीत जनतेचा विश्वास आणि समर्थन हेच सर्वात मोठे बळ आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली?

तुम्हाला हा प्रेरणादायी लेख आवडला असेल तर आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि खऱ्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मते अशा अपक्ष उमेदवारांना संधी मिळायला हवी का? आम्हाला जरूर कळवा.

Disclaimer (अस्वीकरण): या लेखातील माहिती विविध सार्वजनिक स्रोत, स्थानिक अहवाल आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. या माहितीचा उद्देश फक्त सामान्य माहिती देणे हा आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत पुष्टी किंवा कायदेशीर जबाबदारी यासाठी लेखक किंवा वेबसाइट जबाबदार राहणार नाही. वाचकांनी आवश्यकतेनुसार संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करावी.

Author: नमस्कार, माझे नाव मनोज आहे. मला आरोग्य, सरकारी योजना, व्यवसाय कल्पना, जीवनशैली, धर्म, इतर माहिती आणि ताज्या बातम्यांशी संबंधित विषयांवर लेख लिहिण्याचा 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. मी नेहमीच सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सोप्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक वाचकाला अचूक बातम्या आणि उपयुक्त माहिती मिळेल. डिजिटल मीडियासाठी तथ्यात्मक आणि वापरकर्ता-अनुकूल माहिती लिहिणे ही माझी प्राथमिकता आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Instagram

नवीन लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *